Bigg Boss 18: ‘बिग बॉस’चं १८वं पर्व संपून तीन दिवस झाले आहेत. तरीही या पर्वाची क्रेझ पाहायला मिळत आहे. ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वात झळकलेले सदस्य सध्या खूप चर्चेत आहेत. सतत त्यांचे व्हिडीओ व्हायरल होतं आहेत. नुकताच चुम दरांगचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये अरुणाचल प्रदेशची चुम दरांग मराठीत संवाद साधताना पाहायला मिळाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा महाअंतिम सोहळा १९ जानेवारीला पार पडला. विवियन डिसेना, करणवीर मेहरा, अविनाश मिश्रा, चुम दरांग, ईशा सिंह आणि रजत दलाल हे सहा सदस्य अंतिम फेरीपर्यंत पोहोचले होते. यावेळी चुम दरांग टॉप-५ पर्यंत पोहोचली. ईशा सिंहनंतर प्रेक्षकांच्या कमी मतांमुळे ती बाहेर झाली. तिच्या पाठोपाठ अविनाश मिश्रा आणि रजत दलाल एविक्ट झाला. विवियन आणि करण यांच्यामध्ये कोण ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा विजेता होणार याची धाकधूक प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळाली. अखेर करणवीर मेहराने बाजी मारली. ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाच्या ट्रॉफीवर करणने स्वतःचं नाव कोरलं. यावेळी सलमान खानने करणचं नाव विजेता म्हणून घोषित केल्यानंतर चुम दरांग आनंदात उड्या मारताना पाहायला मिळाली. शोबाहेर आल्यानंतर करण आणि चुम सोशल मीडियावर लाइव्ह आले होते.

त्यानंतर नुकतीच चुम दरांग पिवळ्या ड्रेसमध्ये दिसली. यावेळी पापाराझींनी तिला विचारलं, “कशी आहेस?” तर चुम म्हणाली, “खूप छान.” मग तिला विचारलं, “काल रात्री पार्टी झाली. त्यामध्ये तू दिसली नाही. काय कारण होतं?” तर चुम म्हणाली, “बोलावं नाही तर कसं जाऊ.” हे बोलल्यानंतर ती हसू लागली. पुढे म्हणाली, “ती दुसरी टीम आहे ना.”

दरम्यान, विवियन डिसेना आणि त्याची पत्नी नूरन अलीने सक्सेस पार्टी आयोजित केली होती. या सक्सेस पार्टीला अविनाश मिश्रा, ईशा सिंह, यामिनी मल्होत्रा, एडिन रोज, चाहत पांडे, अरफीन खान, सारा खान, हेमा शर्मा, मुस्कान बामने, मुनव्वर फारुकी, अंकिता लोखंडे, विकी जैन असे अनेक कलाकार पाहायला मिळाले. पण या पार्टीला विवियनने करणवीर मेहरा, शिल्पा शिरोडकर, चुम दरांग, दिग्विजय सिंह राठी, श्रुतिका अर्जुन यांना आमंत्रण दिलं नव्हतं.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss 18 chum darang talking in marathi language video viral pps