Bigg Boss 18: दिवाळीच्या मुहूर्तावर ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वात दोन मोठे धमाके झाले. ते म्हणजे दोन वाइल्ड कार्ड सदस्याची दमदार एन्ट्री पाहायला मिळाली. ‘स्प्लिट्सविला’च्या १५व्या पर्वात झळकलेले दिग्विजय सिंह राठी आणि कशिश कपूर वाइल्ड कार्ड म्हणून सहभागी झाले. दिग्विजय आणि कशिश ‘बिग बॉस’च्या घरात येऊन १५ दिवस झाले असतील तितक्यात दुसऱ्या बाजूला दिग्विजयच्या गर्लफ्रेंडने ब्रेकअपची घोषणा केली आहे.

‘स्प्लिट्सविला’च्या १५व्या पर्वात दिग्विजय सिंह राठीचं उन्नती तोमरवर प्रेम जडलं. या शोमध्ये दिग्विजय आणि उन्नती एकत्र खेळत होते. पण काही काळानंतर उन्नती शो बाहेर झाली आणि त्यामुळे दिग्विजयला कशिश कपूरला जोडीदार म्हणून निवडावं लागलं. त्यानंतर दिग्विजय आणि कशिश पॉवर कपल झाले. महाअंतिम फेरीपर्यंत पोहोचले. पण यामध्ये ट्विस्ट आला.

हेही वाचा – Video: “काजू आकाराने छोटा असला तरी त्याचा भाव…”, ‘लाखात एक…’ फेम नितीश चव्हाणने महेश जाधवला वाढदिवसाच्या दिल्या खास शुभेच्छा

महाअंतिम फेरीआधी कपल्सला खेळ आणि पैसे या दोन पर्यायांपैकी एक पर्याय निवडायचा होता. यावेळी दिग्विजयने खेळ पर्याय निवडला. मात्र, कशिशने पैसे हा पर्याय निवडला आणि यामुळे दिग्विजयचं ‘स्प्लिट्सविला १५’ जिंकण्याचं स्वप्न अधुर राहिलं. असं असलं तरी ‘स्प्लिट्सविला १५’मुळे दिग्विजयला मनासारखा जोडीदार मिळाल्याचा खूप आनंद होता. शो संपल्यानंतरही दोघं सतत फिरताना दिसले. नेहमी दिग्विजय आणि उन्नती सोशल मीडियावर एकत्र व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असतं. पण दिग्विजय ‘बिग बॉस १८’मध्ये गेल्यापासून दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. आता तर थेट उन्नतीने सोशल मीडियावर पोस्ट करत ब्रेकअपची घोषणा केली आहे.

हेही वाचा – “ना पैसे होते, ना धंद्याची अक्कल…”, लेखिका, अभिनेत्री मधुगंधा कुलकर्णीच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली…

उन्नती तोमरने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली. ज्यामध्ये लिहिलं की, सगळ्यांना हाय, माझी एक विनंती आहे की, दिग्विजय संदर्भातील रील किंवा पोस्टमध्ये मला मेन्शन करू नका. तसंच डिनतीला समर्थन देण्यात वेळ घालवू नका. आमच्या दोघांना वेगवेगळं समर्थन करा. दिग्विजयच्या पीआर टीमकडून मला दुर्लक्ष केलं जात आहे, हे तुम्ही बघतचं आहात. त्यामुळे प्लीज मला स्पॅम करू नका. दिग्विजय संदर्भातील कोणत्याही गोष्टी असू दे मला मेन्शन करू नका.

पुढे उन्नतीने लिहिलं, “मी दिग्विजयला समर्थन देऊ इच्छिते. पण दिग्विजयचा टीमला वाटतं नाहीये की, मी त्याला समर्थन द्यावं. हेच कारण आहे. अधिकृतरित्या माझ्याकडून बरंच काही झालं आहे. पण आता बसं झालं. मला देखील स्वाभिमान आहे; जो मी बऱ्याच काळापासून गमावला होता.”

हेही वाचा – Bigg Boss 18: अनंत अंबानीच्या लग्नानंतर जगप्रसिद्ध कार्दशियन बहिणी पुन्हा येणार भारतात, सलमान खानच्या शोमध्ये होणार सहभागी?

उन्नती तोमरच्या या इन्स्टाग्राम स्टोरीमुळे दिग्विजयबरोबर तिने ब्रेकअप केल्याचं म्हटलं जात आहे. एप्रिलमध्येच ‘स्प्लिट्सविला १५’मुळे दिग्विजय आणि उन्नती एकत्र आले होते. पण अवघ्या सात महिन्यात ‘बिग बॉस १८’मुळे दोघं दुरावले आहेत.

Story img Loader