Bigg Boss 18: ६ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाच्या फिनालेला चार आठवडे बाकी आहेत. १९ जानेवारीला ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा ग्रँड फिनाले होणार आहे. अशातच, फिनालेच्या चार आठवड्यांआधी मिड वीक एविक्शन झालं आहे. यामुळे घरातील सगळ्या सदस्यांना धक्का बसला आहे. नेमकं काय झालं? आणि कोण घराबाहेर गेलं? जाणून घ्या…

१९ डिसेंबरच्या भागात पुन्हा नव्याने नॉमिनेशन प्रक्रिया पार पडली. या नॉमिनेशन प्रक्रियेबरोबरच रेशन टास्क देण्यात आला होता. यावेळी ‘टाइम गॉड’ श्रुतिका अर्जुनकडे महत्त्वाचे अधिकार देण्यात आले होते. ‘बिग बॉस’ने एक नॉमिनेटेड आणि दुसरा सुरक्षित असलेल्या सदस्याची जोडी केली होती. या सदस्यांना टोपलीमधलं रेशन श्रुतिकाला विकायचं होतं. श्रुतिका ज्या सदस्याचं रेशन खरेदी करेल त्या सदस्याला एक संधी दिली होती. ते म्हणजे नॉमिनेट झालेल्या सदस्यांमधील एकाला सुरक्षित करून दुसऱ्याला नॉमिनेट करण्याचा अधिकार होता. पण, यावेळी श्रुतिकाने आपल्या आवडत्या सदस्यांना संधी दिली. त्यामुळे अविनाश मिश्रा, रजत दलाल, चाहत पांडे, विवियन डिसेना, दिग्विजय राठी, ईशा सिंह, शिल्पा शिरोडकर आणि करणवीर मेहरा घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले. पण, पुढे एक ट्विस्ट आला.

kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक फोन आला तर..”, रहिवाश्यांचा संताप, वैयक्तिक वाद विकोपाला!
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Shah Rukh Khan Son Abram and Aishwarya Rai daughter performance
Video : आराध्या-अबरामचा शाळेत एकत्र परफॉर्मन्स! शाहरुख खान व ऐश्वर्या रायचा आनंद गगनात मावेना, ‘त्या’ कृतीने वेधलं लक्ष
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
shahrukh khan Abhishek bachchan dance with children video viral
आराध्या-अबरामचा मंचावर, तर विद्यार्थ्यांबरोबर शाहरुख खान अन् अभिषेक बच्चनचा जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ
bigg boss marathi jahnavi killekar and suraj chavan
“घन:श्यामवर कोणीच विश्वास ठेऊ नये, तो प्रचंड…”, जान्हवीने स्पष्टच सांगितलं; सूरज चव्हाणच्या लग्नाबद्दल म्हणाली…
sai tamhankar arrange diwali pahat for loved ones
मुंबईत ४५ व्या मजल्यावर आहे सईचं आलिशान घर! लेकीच्या घरी आली लाडकी आई; ‘द इलेव्हन्थ प्लेस’मध्ये रंगली दिवाळी पहाट
Indrayani serial shooting is going on in the cold of Nashik
‘इंद्रायणी’ मालिकेचं नाशिकच्या कडाक्याच्या थंडीत सुरू आहे शूटिंग, अनुभव सांगत सांची भोईर म्हणाली, “थंडीमुळे दातखीळ….”

हेही वाचा – ‘इंद्रायणी’ मालिकेचं नाशिकच्या कडाक्याच्या थंडीत सुरू आहे शूटिंग, अनुभव सांगत सांची भोईर म्हणाली, “थंडीमुळे दातखीळ….”

…म्हणून सर्व सदस्य झाले नॉमिनेट

नॉमिनेशन आणि रेशन टास्कनंतर श्रुतिकाने ‘बिग बॉस’ला विचारलं की, गरजेचं रेशन खरेदी केलं आहे. पण, तूप, कॉफी वगैरे दुसऱ्या टोपलीमध्ये आहे. तर ते घेऊ शकतो का? जर तुम्ही नाही म्हणालात तर मी स्टोअर रुममध्ये ठेऊन देते. यानंतर ‘बिग बॉस’ने श्रुतिका सतत निर्णय बदलत असल्यामुळे मोठा निर्णय घेतला. ते म्हणजे घरातील सर्व सदस्यांना नॉमिनेट केलं.

त्यानंतर श्रुतिकाला नॉमिनेट झालेल्या घरातील सर्व सदस्यांची रॅकिंग करण्याचा अधिकार दिला. तेव्हा श्रुतिकाने रजत दलाल, अविनाश मिश्रा, चुम दरांग, करणवीर मेहरा, सारा अरफीन खान, शिल्पा शिरोडकर, विवियन डिसेना, चाहत पांडे, कशिश कपूर, ईशा सिंह, दिग्विजय राठी, एडिन रोज, यामिनी मल्होत्रा अशी अनुक्रमे रॅकिंग केली. मग, ‘बिग बॉस’ने शेवटच्या सहा सदस्यांमधून एकजण घराबाहेर जाणार असल्याचं जाहीर केलं. यावेळी शेवट्याच्या सहा सदस्यांमधून कोणा एकाला एविक्ट करायचं? हे घरातील सदस्य ठरवणार होते. शेवटच्या सहा सदस्यांमध्ये चाहत, कशिश, ईशा, दिग्विजय, एडिन, यामिनी होते. यावेळी घराबाहेर जाण्यासाठी सर्वाधिक मतं दिग्विजयला मिळाली. त्यामुळे दिग्विजय बेघर झाला आहे.

हेही वाचा – Year Ender 2024: यंदा बॉलीवूडच्या कोण-कोणत्या सेलिब्रिटींच्या घरी पाळणा हलला, जाणून घ्या…

दिग्विजयच्या अचानक घराबाहेर जाण्याने घरातील सगळ्या सदस्यांना धक्का बसला. दिग्विजयच्या जाण्याने शिल्पा शिरोडकर, चाहत पांडे, चुम दरांग, ईशा सिंह, करणवीर मेहरा भावुक झाले. याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

हेही वाचा – “मला तुझी सासू असल्याचा खूप अभिमान…”, अंकिता लोखंडेला वाढदिवसानिमित्ताने सासूबाईकडून मिळालं खास गिफ्ट, म्हणाल्या…

दरम्यान, अचानक दिग्विजय सिंह राठी घराबाहेर पडल्यामुळे चाहत्यांमध्ये नाराजी पसरली आहे. अनफेअर एविक्शन असल्याचं चाहते म्हणत आहेत.

Story img Loader