Bigg Boss 18: ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा सातवा आठवडा सुरू आहे. नुकताच सातव्या आठवड्यातील ‘टाइम गॉड’चा टास्क पार पडला. सर्वात आधी ‘टाइम गॉड’ होण्यासाठी टॉचर टास्क देण्यात आला होता. ज्यामध्ये घरातील सर्व पुरुष सदस्यांना जेलमध्ये टाकलं होतं. महिला सदस्यांना पुरुषांना जेलमधून स्वतःहून बाहेर येण्यासाठी टॉचर करायचं होतं. या टास्कमध्ये फक्त विवियन डिसेना जेल बाहेर आला. त्याने त्याच्या जागी एलिस कौशिकला जेलमध्ये पाठवलं आणि लगेचच एलिसने ईशा सिंहला तिच्या जागी जेलमध्ये पाठवलं. तसंच अविनाश मिश्रा, करणवीर मेहरा, तजिंदर बग्गा आणि दिग्विजय सिंह राठी हे जेलमध्ये तग धरून राहिले. त्यामुळे या चौघांसह ईशा सिंह ‘टाइम गॉड’ होण्याच्या स्पर्धेत होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काल, २१ नोव्हेंबरला ‘टाइम गॉड’ होण्यासाठीचा दुसरा टास्क पार पडला. या टास्कमध्ये ‘टाइम गॉड’ होण्यासाठी उमेदवार असलेल्या पाच जणांना आपलं ठाम मत मांडायचं होतं. या टास्कमध्ये दिग्विजय सिंह राठीने बाजी मारली आणि तो सातव्या आठवड्यातील नवा ‘टाइम गॉड’ झाला आहे. दिग्विजयला ‘टाइम गॉड’ केल्याचा निर्णय विवियनाच्या टीमला पटलेला नाही. त्यामुळे विवियनसह अविनाश मिश्राने बंड केल्याचं पाहायला मिळत आहे.

हेही वाचा – Video: केळवणासाठीची रेश्मा शिंदेची हटके एन्ट्री पाहिलीत का? आशुतोष गोखलेने व्हिडीओ केला शेअर

दिग्विजय ‘टाइम गॉड’ असेपर्यंत विवियन डिसेनासह अविनाशने घरातील कामं करण्याची मनाई केली आहे. यामुळे दिग्विजयने कामं न करणाऱ्या सदस्यांना जेवण मिळणार नाही असा निर्णय घेतला आहे. यावरून दिग्विजय आणि विवियन, अविनाशमध्ये राडा झाल्याचा प्रोमो समोर आला आहे.

दुसऱ्याबाजूला ‘टाइम गॉड’ होताच दिग्विजयला ‘बिग बॉस’ने विशेष अधिकार दिला आहे. टाइम लाइन बदलून कशिश कपूरला नॉमिनेशनपासून सुरक्षित करण्याचा अधिकार दिग्विजयला दिला आहे. पण आता दिग्विजय या अधिकाराचा वापर करतो की नाही? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

हेही वाचा – Video: आता गौतमी पाटील अलका कुबल, सई ताम्हणकर अन् शिव ठाकरेबरोबर झळकणार, ‘त्या’ व्हिडीओमुळे रंगली चर्चा

हेही वाचा – “लाज लज्जा सोडून, कोणाची ही तमा न बाळगता…”, समीर परांजपेसाठी लोकप्रिय दिग्दर्शकाने लिहिलेली पोस्ट होतेय व्हायरल, वाचा

दरम्यान, सातव्या आठवड्यात घराबाहेर जाण्यासाठी एकूण सात सदस्य नॉमिनेट झाले आहेत. करणवीर मेहरा, विवियन डिसेना, दिग्विजय राठी, अविनाश मिश्रा, चाहत पांडे, कशिश कपूर आणि एलिस कौशिक हे सात सदस्य नॉमिनेट झाले आहेत. या सात सदस्यांमधून कोण घराबाहेर जाणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss 18 digvijay singh rathee new time god watch new promo pps