Bigg Boss 18: नुकतंच ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वात मिड एविक्शन पार पडला. यावेळी वाइल्ड कार्ड म्हणून आलेला दिग्विजय सिंह राठी घराबाहेर झाला. पण, घरातील सदस्यांच्या मतांनी दिग्विजय एविक्ट झाला. नाहीतर दिग्विजय नॉमिनेट झालेल्या आठ सदस्यांमध्ये प्रेक्षकांच्या मतांनी टॉप-५मध्ये होता. याचाच अर्थ दिग्विजय बेघर झाला नसता. पण, घरातील सदस्यांच्या बहुमताने तो एविक्ट झाला आणि त्यानंतर भावनिक वातावरण पाहायला मिळालं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिग्विजय राठी बेघर झाल्यानंतर करणवीर मेहरा, शिल्पा शिरोडकर, चुम दरांग, चाहत पांडे हे सदस्य भावुक झालेले दिसले. चाहत पांडे तर ढसाढसा रडताना पाहायला मिळाली. यावेळी घरातील बऱ्याच सदस्यांचं म्हणणं होतं की, दिग्विजय श्रुतिका अर्जुनमुळे घराबाहेर झाला. श्रुतिकाने तिचा निर्णय बदलला असता तर दिग्विजय एविक्ट झाला नसता. त्यामुळे घरातील सदस्य श्रुतिकावर सतत आरोप करत असल्यामुळे ती देखील खचून गेली. त्यानंतर कुठल्याही गोष्टीमध्ये ती सहभाग घेताना दिसली नाही.

हेही वाचा – ‘बिग बॉस मराठी ५’ फेम निक्की तांबोळी ‘या’ लोकप्रिय कार्यक्रमात झळकणार, सोबतीला असणार उषा नाडकर्णींसह प्रसिद्ध कलाकार

२१ डिसेंबरच्या वीकेंडच्या वारला सलमान खानने दिग्विजय राठीच्या एविक्शनवरून सगळ्यांचा आरसा दाखवला. फक्त श्रुतिकालाच नाहीतर शिल्पा शिरोडकर, चुम दरांग, करणवीर मेहरा यांनादेखील सलमानने सुनावलं. तेव्हा श्रुतिकाने ‘बिग बॉस’च्या घरात राहू शकत नसल्याचं सांगितलं. पण, यावेळी सलमानने तिला पुन्हा समजावलं.

हेही वाचा – “प्रत्येक जन्मी मला तुझा बाबा होऊ दे”, सलील कुलकर्णींची लेकीसाठी सुंदर पोस्ट, म्हणाले, “माझ्या जीवाची सावली…”

‘बिग बॉस’च्या घरात दिग्विजय राठीची चांगली मैत्री झाली ती म्हणजे करणवीर मेहरा, चुम दरांग आणि चाहत पांडे यांच्याशी त्याचे सूर जुळले. पण, या तिघांपैकी कोणीही त्याला ‘बिग बॉस १८’चा विजयी होईल असं वाटतं नाही. दिग्विजय म्हणाला, “बिग बॉसच्या ट्रॉफीचा जो कोणी हक्कदार आहे तो विवियन डिसेना आहे. कारण तो लाडका आहे.” दिग्विजयने हा एकप्रकारे टोमणा मारला आहे.

हेही वाचा – Pushpa 2 Box Office Collection Day 17: ‘पुष्पा २’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर अजूनही जोरदार घोडदौड सुरुच; शनिवारी केली ‘इतक्या’ कोटींची कमाई

दरम्यान, दिग्विजय सिंह राठीनंतर डबल एविक्शन झाल्याचं म्हटलं जात आहे. एडिन रोज आणि यामिनी मल्होत्रा ‘बिग बॉस १८’मधून बाहेर झाल्याचं समोर आलं आहे. पण, अद्याप याची अधिकृत घोषणा झालेली नाही.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss 18 digvijay singh rathee says who will win the show pps