Bigg Boss 18: ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा १२वा आठवडा सुरू झाला आहे. आता फक्त तीन आठवडे ‘बिग बॉस’च्या महाअंतिम सोहळ्यासाठी राहिले आहेत. १९ जानेवारीला यंदाच्या पर्वाचा महाअंतिम सोहळा रंगणार असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे सध्या ‘बिग बॉस’मध्ये मिड वीक एविक्शन, डबल एविक्शन पाहायला मिळत आहे. म्हणूनच घरातील सर्व सदस्यांमध्ये चांगलीच चुरस दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काही दिवसांपूर्वी २० डिसेंबरच्या भागात, मिड वीक एविक्शन झालं. यावेळी दिग्विजय सिंह राठी घराबाहेर झाला. दुर्दैव म्हणजे, प्रेक्षकांच्या मतांनुसार नॉमिनेट झालेल्या आठ सदस्यांमध्ये दिग्विजय टॉप-५मध्ये होता. त्यामुळे तो सुरक्षित झाला असता. पण, श्रुतिका अर्जुनने लावलेल्या क्रमामुळे आणि घरातील सदस्यांच्या मतांमुळे दिग्विजय एविक्ट झाला. दिग्विजयच्या अचानक जाण्याने करणवीर मेहरा, चुम दरांग, चाहत पांडे, शिल्पा शिरोडकर भावुक झालेले पाहायला मिळाले. मग घरातील काही सदस्य श्रुतिकामुळे दिग्विजय गेला, असा आरोप करू लागले. यावरून वीकेंडच्या वारला सलमान खानने चांगलंच सुनावलं. यामध्ये फक्त श्रुतिका चुकीची नसून करणवीर, चुमदेखील तितकेच चुकीच असल्याचं सांगितलं. त्यांनी दिग्विजयला सुरक्षित करण्यासाठी कोणतीही हालचाल केली नाही, असं सलमान म्हणाला.

हेही वाचा – Video: अखेर ‘बिग बॉस मराठी ४’ विजेता अक्षय केळकरची गर्लफ्रेंड ‘रमा’ आली समोर, अभिनेत्याने व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना दिला सुखद धक्का

दिग्विजय राठीनंतर २२ डिसेंबरच्या वीकेंड वारला डबल एविक्शन पार पडलं. चाहत पांडे, ईशा सिंह, एडिन रोज आणि यामिनी मल्होत्रा या चौघी घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाल्या होत्या. यामधील एडिन आणि यामिनी एविक्ट झाल्या. यामुळे कशिश कपूर भावुक झाली. एडिन आणि यामिनीचं नाव ऐकताच कशिशचे अश्रू अनावर झाले. ती ढसाढसा रडत एडिनला म्हणाली, “इथे प्रत्येकजण साप आहेत.”

हेही वाचा – वरुण धवनच्या घरात घुसली होती चाहती, प्रसंग सांगत अभिनेता म्हणाला, “एका पॉवरफुल व्यक्तीची ती पत्नी होती अन्…”

करणवीर-चुमला दिला लग्नाचा सल्ला

त्यानंतर घराबाहेर जाताना दोघींनी इतर सदस्यांची भेट घेतली. यावेळी यामिनी चुम दरांगला भेटताना करणवीरला म्हणाली, “लग्न करा, याहून चांगली मुलगी भेटणार नाही.” तसंच यामिनी अविनाशला मिठी मारून म्हणाली की, टॉपमध्ये पोहोचून दाखव. तर रजतला म्हणाली, “तू जिंकून ये.” मग करणने एडिनला उचलून आणि अविनाशने यामिनीला उचलून दरवाजापर्यंत नेलं. अशी हसत-खेळत एडिन रोज आणि यामिनीची एक्झिट झाली.

हेही वाचा – Video: “मला लागली कुणाची उचकी…”, योगिता चव्हाणची ठसकेबाज लावणी; नेटकऱ्यांकडून होतंय भरभरून कौतुक, म्हणाले…

‘बिग बॉस’च्या घरात आता कोण-कोण?

आता ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वात ११ सदस्य राहिले आहेत. करणवीर मेहरा, चुम दरांग, शिल्पा शिरोडकर, चाहत पांडे, सारा अरफीन खान, कशिश कपूर, श्रुतिका अर्जुन, रजत दलाल, अविनाश मिश्रा, ईशा सिंह आणि विवियन डिसेना यामधील कोण-कोण महाअंतिम फेरीपर्यंत टिकून राहतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss 18 edin rose yamini malhotra is evicted from salman khan show after digvijay rathee evicted pps