Bigg Boss 18: ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाच्या महाअंतिम सोहळ्याला अवघे काही आठवडे बाकी आहेत. त्यामुळेच मिड एविक्शन, डबल एविक्शन होतं आहे. सध्या १२वा आठवडा सुरू आहे. या आठवड्यात कशिश कपूरने अविनाश मिश्रावर अनेक गंभीर आरोप केले. त्यावरूनच सलमान खानने वीकेंडच्या वारला ईशा सिंहची शाळा घेतली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
काही दिवसांपूर्वी अविनाश मिश्रा आणि कशिश कपूर एकमेकांबरोबर फ्लट करताना दिसले. यावेळी अविनाश कशिशला म्हणाला होता की, शोमध्ये फ्लेव्हरची कमी आहे. प्रेक्षकांना नवीन फ्लेव्हर खूप आवडेल. तर रोमँटिक अँगल बनवू. हा मुद्दा या आठवड्यातील नॉमिनेशन टास्क पार पडल्यानंतर पुन्हा समोर आला. सारा खान आणि रजत दलाल यामध्ये मध्यस्थी करून अविनाशला जाब विचारला. यावेळी आरोप-प्रत्यारोप केले गेले. अखेर दोघांनी एकमेकांबरोबर फ्लट करत असल्याचं कबुल केलं. पण, यादरम्यान ईशा सिंह नाराज झाली. तिने अविनाशला अनेक प्रश्न विचारले. यामुळे अविनाशचा राग अनावर झाला होता. त्याने बॉटल फोडली, खुर्ची फेकून दिली.
यासंपूर्ण प्रकरणावरून सलमान खानने वीकेंडच्या वारला ईशा सिंहला सुनावलं. सलमान म्हणाला की, तू अविनाशसाठी १२ दिवसांत घराबाहेर जाण्यासाठी तयार होती. तर कशिशने केलेल्या आरोपानंतर तू त्याच्या पाठिशी का उभी नव्हतीस? अविनाश तुझं हातचं बाहुलं झालं आहे. तुझ्यानुसार तू त्या बाहुल्याची चावी फिरवत असतेस. याच वेळी सलमानने ईशाला वैयक्तिक प्रश्न विचारला की, तुझा घराबाहेर बॉयफ्रेंड आहे का? तेव्हा ईशा म्हणाली, “नाही.” मग सलमान म्हणाला की, तू शिल्पा म्हणाली होतीस, तुझा घराबाहेर बॉयफ्रेंड आहे वगैरे? ईशा म्हणाली, “नाही सर, कोणीही बॉयफ्रेंड नाही.” पुढे सलमानने विचारलं, “बॉयफ्रेंड नसेल. पण जवळचा मित्र असेल ना? जो मला ओळखतं असेल. जो खूप शांत, शालीन असेल. जेव्हा या घरात आलीस तेव्हा शेवटचा फोन कोणाला केला होतास?” हे ऐकताच ईशा लाजली आणि म्हणाली, “शालीन…तो माझा चांगला मित्र आहे.”
#BiggBoss18 Tomorrow pic.twitter.com/AgARjL4Enc
— BiggBoss24x7 (@BB24x7_) December 27, 2024
हेही वाचा – Video: सलमान खानचा ५९वा वाढदिवस जामनगरमध्ये जल्लोषात साजरा, अंबानींनी आयोजित केलेली खास पार्टी, पाहा व्हिडीओ
दरम्यान, गेल्या आठवड्यात मिड वीक एविक्शन आणि डबल एविक्शन पाहायला मिळालं. मिड वीक एविक्शनमध्ये दिग्विजय सिंह राठी घराबाहेर झाला. त्यानंतर डबल एविक्शनमध्ये एडिन रोज, यामिनी मल्होत्रा बेघर झाल्या. दिग्विजय, एडिन, यामिनी हे तिन्ही वाइल्ड कार्ड सदस्य होते. आता वाइल्ड कार्ड सदस्यांमधील एकजण म्हणजे कशिश सध्या ‘बिग बॉस’मध्ये पाहायला मिळत आहे.