Bigg Boss 18: ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वात फक्त सहा सदस्य राहिले आहेत. विवियन डिसेना, करणवीर मेहरा, चुम दरांग, अविनाश मिश्रा, ईशा सिंह आणि रजत दलाल या सहा जणांमधून एकजण ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा विजेता होणार आहे. त्यामुळे आपल्या आवडत्या सदस्याला विजयी करण्यासाठी प्रेक्षक भरभरून व्होटिंग देत आहेत. तसंच सदस्यांच्या कुटुंबातील मंडळी सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना व्होट करण्यासाठी आवाहन करताना दिसत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उद्या, १९ जानेवारीला ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे. त्याआधी आणखी एक पत्रकार परिषद पार पडली. पण या परिषदेत पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरं सदस्यांचे समर्थक देताना पाहायला मिळत आहेत. यावेळी ईशा सिंहला पाठिंबा देण्यासाठी तिचा भाऊ रुद्राक्ष उपस्थित राहिला. त्याने पत्रकारांच्या प्रश्नांची जबरदस्त उत्तर दिल्याचं पाहायला मिळत आहे. याचा प्रोमो नुकताच समोर आला आहे.

हेही वाचा – ‘देवमाणूस’ फेम किरण गायकवाडने लग्नानंतरचा बायकोचा पहिला वाढदिवस ‘असा’ केला साजरा, फोटो शेअर करत म्हणाला…

‘कलर्स टीव्ही’च्या सोशल मीडियावर पत्रकार परिषदेचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. यामध्ये एक पत्रकार रुद्राक्षला विचारतो की, रुद्राक्ष एक असा गुण सांग, ज्यामुळे ईशाने ‘बिग बॉस’ जिंकलं पाहिजे. त्यावर रुद्राक्ष सडेतोड उत्तर देत म्हणाला, “मी एक नाही, तर पाच गुण सांगेल. पहिला, तिचा प्राधान्यक्रम सुरुवातीपासून ठरलेला आहे. तिचं इतरांबरोबरचं नातं कधीही बदलेलं नाही. आज इकडे आहे, तर उद्या तिकडे नाही.”

त्यानंतर ‘बिग बॉस’च्या ११व्या पर्वाची विजेती शिल्पा शिंदेने ईशावर खोचक टीका केली. यावर ईशा सिंहच्या भावाने शिल्पा शिंदेला चांगलाच टोला लगावला. रुद्राक्ष म्हणाला, “हे ईशाचं खच्चीकरण करण्यासाठी आले आहेत. तर त्या मुलीने काय करायचं?” त्यावर शिल्पा म्हणते की, ईशा तुला आता तुझा भाऊ घरी घेऊन जाईल. हे ऐकून रुद्रांश संतापतो आणि म्हणतो, “तुम्ही तुमच्या सदस्याला घरी घेऊन जा. मी इथे बसलो आहे. करणला पाठिंबा देण्यासाठी तीन जण बसले आहेत. पण मी एकटा यांच्यासाठी पुरेसा आहे.”

हेही वाचा – Bigg Boss 18: रजत दलालला पाठिंबा देण्यासाठी ‘बिग बॉस’च्या घरात पोहोचला एल्विश यादव, पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तर देत म्हणाला, “डंके की चोट पे…”

हेही वाचा – “तब्बल ९० दिवसानंतर मिळणारं पेमेंटही…”, मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत, मुख्यमंत्री फडणवीसांना म्हणाला…

दरम्यान, ‘बिग बॉस खबरी’च्या माहितीनुसार व्होटिंगमध्ये करणवीर मेहरा अव्वल स्थानावर आहे. शनिवारी सकाळी ११ वाजेपर्यंत करणवीर मेहराला ३१ टक्के, विवियन डिसेनाला २८ टक्के, रजत दलालला २५ टक्के, चुम दरांगला १० टक्के, अविनाश मिश्राला ४ टक्के आणि ईशा सिंहला २ टक्के व्होटिंग मिळालं आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss 18 eisha singh brother rudraksh singh slam to shilpa shinde pps