Bigg Boss 18: ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वातील घरात वातावरण सध्या फारच तापलं आहे. दोन ग्रुप पडले आहेत. ज्यामध्ये सातत्याने वाद होतं आहेत. ७ नोव्हेंबरच्या भागात नुसताच राडा पाहायला मिळाला. टाइम गॉडच्या टास्कदरम्यान जोरात वाद झाले. सारा अरफीन खानने विवियन डिसेना, ईशा सिंहवर वस्तू फेकून मारल्या. तर अविनाश मिश्राची थेट कॉलर पकडली. यावेळी विवियनच्या ग्रुपवर टीका करताना साराची जीभ घसरली. नेमकं काय घडलं? आणि एकता कपूर विवियनला काय म्हणाली? जाणून घ्या…

करणवीर मेहरा, रजत दलाल, श्रुतिका अर्जुन, दिग्विजय सिंह राठी, चाहत पांडे, सारा अरफीन खान हे टाइम गॉडसाठी उमेदवार होते. या सहा सदस्यांना टाइम गॉड होण्यासाठी टाइम ऑफ गॉड स्टाफ एका हाताने धरून ठेवायचा होता. दुसरा हात त्याला लावायला नव्हता. तसंच स्टाफ पकडून ठेवलेला हात उचलायचा नव्हता. यावेळी टाइम ऑफ गॉड स्टाफवरून हात सुटल्यामुळे सर्वात आधी चाहत, श्रुतिका बाद झाली. त्यानंतर स्टाफचा पुढचा भाग हातात तुटून आल्यामुळे रजत दलाल बाहेर झाला. याच वेळी साराने स्वतःचा हात दुसऱ्या ठिकाणी ठेवल्यामुळे तिला विवियनने बाद केलं. त्यामुळे साराचा पाराच चढला. त्यानंतर तिने घर डोक्यावर घेतलं.

Bigg Boss 18 Rupali Bhosle fire on Vivian dsena
Bigg Boss 18: रुपाली भोसले भडकली ‘बिग बॉस १८’मधील ‘या’ सदस्यावर; सिद्धार्थ शुक्लाचा उल्लेख करत म्हणाली, “हा अहंकार…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
bigg boss marathi dhananjay powar share netizen post
“निक्की-अरबाजचे फालतू चाळे तासभर TV वर दाखवून…”, Bigg Boss फेम धनंजय पोवारने शेअर केलेली पोस्ट चर्चेत
R Madhavan Dubai Home Video
आर माधवनचं दुबईतील घर पाहिलंत का? मराठमोळ्या पत्नीबरोबर दिवाळीची पूजा, सरिताच्या मराठी लूकने वेधलं लक्ष
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
tharla tar mag fame monika dabade announce pregnancy
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्री लग्नाच्या ९ वर्षांनंतर होणार आई! फोटो शेअर करत दिली गुडन्यूज; होतोय शुभेच्छांचा वर्षाव
Bigg Boss Marathi Ankita Walawalkar Meets Suraj Chavan
अखेर भेट झालीच! होणाऱ्या नवऱ्यासह अंकिता पोहोचली बारामतीला; सूरजच्या गावच्या शेतात बसून मारला ‘या’ पदार्थावर ताव
Veena Jagtap
“तू मरत का नाहीस?” बिग बॉसनंतर करावा लागलेला ट्रोलिंगचा सामना; अभिनेत्री म्हणाली, “तुमच्या घरीही…”

हेही वाचा – “अशीच वेडी राहा…” म्हणत शिवानी सोनारने आईला ५०व्या वाढदिवसाच्या दिल्या हटके शुभेच्छा, होणारा नवरा अंबर गणपुळे कमेंट करत म्हणाला…

‘बिग बॉस’ पक्षपाती असल्याचा आरोप करत साराने विवियनवर वस्तू फेकून मारली. त्यानंतर साराने ईशाचे केस खेचत तिला उशी फेकून मारली. शिवाय अविनाशला देखील मारल्याचं तो म्हणाला. यामुळे घरात राडाच झाला. पण यावेळी दुसऱ्या बाजूला टाइम गॉडचा टास्क सुरळीत सुरू होता. काही वेळानंतर दिग्विजय आणि करणकडून टाइफ ऑफ गॉड स्टाफ तुटला आणि अखेर पुन्हा एकदा विवियनकडे टाइम गॉडची जबाबदारी ‘बिग बॉस’ने दिली आहे. पण, आता वीकेंड वारला विवियनवर एकता कपूर भडकल्याचं दिसत आहे.

‘दी साबरमती रिपोर्ट’ चित्रपटाच्या प्रमोशननिमित्ताने एकता कपूरने शुक्रवारीचा वीकेंड वार होस्ट केला आहे. यावेळी तिने विवियनला चांगलंच झापलं. याचा प्रोमो सध्या व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये एकता विवियनला म्हणते की, विवियन मला एवढा तर हक्क आहे की, तुला लाँच केल्यानंतर मी स्वतः तुला प्रश्न विचारू शकते. तू ८-१० वर्ष काम केलं, मग काय झालं? घरातील सर्वांनी तुला डोक्यावर चढवलं पाहिजे? तेव्हा विवियन म्हणाला, “मी असं कधीच बोललो नाही.” यावर एकता म्हणाली की, या कामाचा गर्व तू कोणाला दाखवत आहेस? विवियन तू घरातील चर्चेतून पळ काढतो. जर तुला असंच करायचं आहे. तर मग तू ८ वर्षानंतर ‘बिग बॉस’मध्ये का आला?

हेही वाचा – ‘आई कुठे काय करते’नंतर ‘स्टार प्रवाह’वरील ‘ही’ लोकप्रिय मालिका होणार बंद; तीन वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर केलं अधिराज्य

हेही वाचा – ‘आई कुठे काय करते’ फेम रुपाली भोसलेने स्वतःसाठी नाही तर ‘या’ व्यक्तीसाठी खरेदी केली आलिशान गाडी, म्हणाली, “ती गाडी माझी नसून…”

दरम्यान, या पाचव्या आठवड्यात चाहत पांडे, सारा अरफीन खान, अरफीन खान, तजिंदर बग्गा हे चार सदस्य घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले आहेत. या चार सदस्यांमधून अरफीन खान एलिमिनेट झाल्याचं समोर आलं आहे.

Story img Loader