Bigg Boss 18 : हिंदी ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाची सुरुवात होऊन दोन दिवस उलटले आहेत. पहिल्या दिवसापासून ‘बिग बॉस’च्या घरातील सदस्यांमध्ये वाद होताना दिसत आहेत. पहिल्या दिवशी ‘बिग बॉस’ने राशनसाठी टास्क दिला. हा टास्क सदस्य योग्यरित्या खेळू शकले नाहीत. त्यामुळे राशन कमी मिळालं. पण या राशनवर अधिकार जेलमध्ये असलेल्या सदस्यांना देण्यात आला.

सध्या जेलमध्ये हेमा शर्मा आणि तजिंदर पाल सिंह बग्गा आहेत. या दोघांना ‘बिग बॉस’ने नुकतेच दोन पर्याय दिले होते. एक म्हणजे जेलमध्ये राहून राशनवर अधिकार मिळवायचा आणि दुसरा पर्यात जेल बाहेर येऊन इतर सदस्यांप्रमाणे राहायचं. दोघांनी पहिला पर्याय निवडला आणि हेमा, तजिंदर सध्या आपल्या मर्जीने इतर सदस्यांना राशन देत आहेत. अशातच या पर्वातील पहिली नॉमिनेशन प्रक्रिया होणार आहे. याचा प्रोमो नुकताच समोर आला आहे.

shilpa shirodkar on namrata shirodka mahesh babu
Bigg Boss 18 : शिल्पा शिरोडकरने बहीण नम्रता व तिचा पती महेश बाबूकडून पाठिंबा न मिळण्याबद्दल सोडलं मौन; म्हणाली, “मला…”
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Rakesh Roshan
‘कहो ना प्यार है’नंतर राकेश रोशन यांच्यावर झालेला गोळीबार; अंडरवर्ल्डचा होता संबंध, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाले, “हृतिकने त्यांच्या पैशातून…”
Bigg Boss 18 Shilpa Shirodkar Husband Sent Letter watch promo
Bigg Boss 18: “मी नीट झोपतंही नाहीये, जेवणाची चव गेलीये…”, शिल्पा शिरोडकरने ढसाढसा रडत वाचलं नवऱ्याचं पत्र, पाहा व्हिडीओ
Bigg Boss 18 Shilpa Shirodkar Evicted From Salman Khan Show
Bigg Boss 18: महाअंतिम सोहळ्याच्या चार दिवसाआधी झालं मिड वीक एविक्शन, ‘ही’ मराठमोळी सदस्य झाली घराबाहेर
Bigg Boss Marathi Fame Yogita Chavan Dance Video
‘झुमका गिरा रे…’, ५९ वर्षांपूर्वीच्या लोकप्रिय गाण्यावर Bigg Boss फेम योगिता चव्हाणचा जबरदस्त डान्स! पतीची खास कमेंट
Guardian Minister Controversy
Manikrao Kokate : पालकमंत्री पदाचा तिढा कधी सुटणार? अजित पवार गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, “आता निर्णय…”
punjab kings new captain announced in 18 big boss
‘पंजाब किंग्ज’च्या नव्या कर्णधाराचे नाव ‘बिग बॉस १८’ मध्ये झाले जाहीर; ‘या’ स्टार खेळाडूकडे सोपवली धुरा

हेही वाचा – सूरज चव्हाण जिंकल्यावर केलेल्या ‘त्या’ पोस्टमुळे अभिनेता झाला ट्रोल, म्हणाला, “आई बहिणीवरून शिव्या देणाऱ्यांनी आधी…”

‘कलर्स टीव्ही’ने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये नॉमिनेशन प्रक्रिया पाहायला मिळत आहे. यावेळी करण मेहरा गुणरत्न सदावर्तेंना नॉमिनेट करतो. तो म्हणतो, “हे खेळात दिसत नाहीत. जास्त करून झोपून असतात.” हे ऐकून गुणरत्न सदावर्ते उत्तर देत म्हणतात, “यांचं नाव काय आहे? हां, करण मेहरा. यांना मी जास्त पाहिलं नाही.” तेव्हा करण मेहरा म्हणतो, “तुमचंही नाव इथे कोणालाच माहित नव्हतं.” तेव्हा गुणरत्न सदावर्तेंचा पारा चढतो. ते म्हणतात की, नाही माहीत, ठीक आहे ना. डंके की चोट पे बोलत आहे. त्यावेळेस करण म्हणतो, “आता तुम्हाला डंके की चोट पे दाखवतो.” त्यानंतर विवियन डिसेना चाहत पांडेला नॉमिनेट करतो. यावेळी विवियन आणि चाहतमध्येदेखील वाद होतात.

हेही वाचा – आलिया भट्टच्या लाडक्या लेकीला आवडतं ‘नाटू-नाटू’ गाणं, आईबरोबर ‘अशी’ नाचते, पाहा व्हिडीओ

हेही वाचा – “तुझी लायकी किती, उंची किती…”, पंढरीनाथ कांबळेवर टीका करताना अभिजीत बिचुकलेंची जीभ घसरली; म्हणाले, “ज्याला गेली २५ वर्ष…”

‘बिग बॉस १८’मधील १८ स्पर्धक

‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वात १८ स्पर्धकांसह एक गाढव सहभागी झालं आहे. चाहत पांडे, शेहजादा धामी, अविनाश मिश्रा, शिल्पा शिरोडकर, तेजिंदर पाल सिंह बग्गा, श्रुतिका अर्जुन, नायरा बनर्जी, चुम दरंग, करण मेहरा, रजत दलाल, मुस्कार बामने, अरफीन खान, सारा अरफीन खान, ईशा सिंह, हेमा शर्मा, विवियन डिसेना, एलिस कौशिक आणि गुणरत्न सदावर्ते हे १८ सदस्य सहभागी झाले आहेत.

Story img Loader