Bigg Boss 18 : हिंदी ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाची सुरुवात होऊन दोन दिवस उलटले आहेत. पहिल्या दिवसापासून ‘बिग बॉस’च्या घरातील सदस्यांमध्ये वाद होताना दिसत आहेत. पहिल्या दिवशी ‘बिग बॉस’ने राशनसाठी टास्क दिला. हा टास्क सदस्य योग्यरित्या खेळू शकले नाहीत. त्यामुळे राशन कमी मिळालं. पण या राशनवर अधिकार जेलमध्ये असलेल्या सदस्यांना देण्यात आला.

सध्या जेलमध्ये हेमा शर्मा आणि तजिंदर पाल सिंह बग्गा आहेत. या दोघांना ‘बिग बॉस’ने नुकतेच दोन पर्याय दिले होते. एक म्हणजे जेलमध्ये राहून राशनवर अधिकार मिळवायचा आणि दुसरा पर्यात जेल बाहेर येऊन इतर सदस्यांप्रमाणे राहायचं. दोघांनी पहिला पर्याय निवडला आणि हेमा, तजिंदर सध्या आपल्या मर्जीने इतर सदस्यांना राशन देत आहेत. अशातच या पर्वातील पहिली नॉमिनेशन प्रक्रिया होणार आहे. याचा प्रोमो नुकताच समोर आला आहे.

हेही वाचा – सूरज चव्हाण जिंकल्यावर केलेल्या ‘त्या’ पोस्टमुळे अभिनेता झाला ट्रोल, म्हणाला, “आई बहिणीवरून शिव्या देणाऱ्यांनी आधी…”

‘कलर्स टीव्ही’ने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये नॉमिनेशन प्रक्रिया पाहायला मिळत आहे. यावेळी करण मेहरा गुणरत्न सदावर्तेंना नॉमिनेट करतो. तो म्हणतो, “हे खेळता दिसत नाहीत. जास्त करून झोपून असतात.” हे ऐकून गुणरत्न सदावर्ते उत्तर देत म्हणतात, “यांचं नाव काय आहे? हां, करण मेहरा. यांना मी जास्त पाहिलं नाही.” तेव्हा करण मेहरा म्हणतो, “तुमचंही नाव इथे कोणालाच माहित नव्हतं.” तेव्हा गुणरत्न सदावर्तेंचा पारा चढतो. ते म्हणतात की, नाही माहीत, ठीक आहे ना. डंके की चोट पे बोलत आहे. त्यावेळेस करण म्हणतो, “आता तुम्हाला डंके की चोट पे दाखवतो.” त्यानंतर विवियन डिसेना चाहत पांडेला नॉमिनेट करतो. यावेळी विवियन आणि चाहतमध्येदेखील वाद होतात.

हेही वाचा – आलिया भट्टच्या लाडक्या लेकीला आवडतं ‘नाटू-नाटू’ गाणं, आईबरोबर ‘अशी’ नाचते, पाहा व्हिडीओ

हेही वाचा – “तुझी लायकी किती, उंची किती…”, पंढरीनाथ कांबळेवर टीका करताना अभिजीत बिचुकलेंची जीभ घसरली; म्हणाले, “ज्याला गेली २५ वर्ष…”

‘बिग बॉस १८’मधील १८ स्पर्धक

‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वात १८ स्पर्धकांसह एक गाढव सहभागी झालं आहे. चाहत पांडे, शेहजादा धामी, अविनाश मिश्रा, शिल्पा शिरोडकर, तेजिंदर पाल सिंह बग्गा, श्रुतिका अर्जुन, नायरा बनर्जी, चुम दरंग, करण मेहरा, रजत दलाल, मुस्कार बामने, अरफीन खान, सारा अरफीन खान, ईशा सिंह, हेमा शर्मा, विवियन डिसेना, एलिस कौशिक आणि गुणरत्न सदावर्ते हे १८ सदस्य सहभागी झाले आहेत.