‘बिग बॉस'(Bigg Boss) हा शो दरवर्षी विविध स्पर्धकांसह प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. दरवर्षी नवीन स्पर्धक त्यांच्या वेगळ्या अंदाजामुळे प्रेक्षकांचे मन जिंकताना दिसतात. या शोची बदलत्या वर्षानुसार थीमदेखील बदलत राहते. मात्र, या शोच्या होस्टिंगची धुरा वर्षानुवर्षे सलमान खानने सांभाळली आहे. या शोच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी तो मोठ्या खुबीने पार पाडतो. प्रसंगी त्याने काही स्पर्धकांना त्यांच्या गैरवर्तणुकीमुळे घराबाहेर काढल्याचेदेखील पाहायला मिळाले आहे. जे उत्तम पद्धतीने आपला खेळ खेळतात, त्यांचे कौतुक करतानादेखील तो दिसतो. आता ‘बिग बॉस १८’मध्ये सहभागी झालेली हेमा शर्माने सलमान खानबाबत केलेले वक्तव्य सध्या चर्चेत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘बिग बॉस १८’फेम व्हायरल भाभीचे वक्तव्य चर्चेत

हेमा शर्मा ही ‘बिग बॉस १८’मध्ये सहभागी झाली होती. मात्र, ती सध्या शोमधून बाहेर पडली आहे. आता तिने सलमान खानबद्दल वक्तव्य केलेला एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. फिल्मीज्ञान (Filmygyan) ने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती म्हणते, “लोक असे बऱ्याचदा म्हणत असतात की सलमान खानला जर तुम्ही चॅलेंज दिले तर तुमचे करिअर बनू शकत नाही. मात्र, मी असा एक इतिहास तयार केला आहे की माझे करिअर असे होईल, जसे आजपर्यंत कोणाचे बनले असेल किंवा भविष्यात बनेल”, व्हिडीओच्या शेवटी ती बिग बॉस आणि सलमान खानला धन्यवाद म्हणताना दिसत आहे.

नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात कमेंट केल्याचे पाहायला मिळत आहे. “आधी करिअर बनव, मग इतिहास तयार कर”, “प्रसिद्ध होण्यासाठीसुद्धा तुला सलमान खानचे नाव घ्यावे लागत आहे”, अशा प्रकारच्या कमेंट केल्याचे पाहायला मिळत आहे.

इन्स्टाग्राम

हेमा शर्मा ही व्हायरल भाभी म्हणून सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे. सोशल मीडियावर तिची मोठी फॅन फॉलोइंग आहे. ती तिच्या सोशल मीडियावरील कंटेंटसाठी लोकप्रिय आहे. याबरोबरच, हेमा शर्माने २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘यमला पगला दिवाना :फिर से’ या चित्रपटात भूमिका साकारली होती. ‘वन डे: जस्टिस डिलिव्हर्ड’ (One Day: Justice Delivered), ‘दबंग ३’ या चित्रपटांत तिने काम केले आहे. नुकतीच ती ‘बिग बॉस १८’मध्ये सहभागी झाल्याने मोठ्या प्रमाणात चर्चेत होती. याबरोबरच हेमा शर्मा ऊर्फ व्हायरल भाभी तिच्या वैयक्तिक आयुष्यावर केलेल्या वक्तव्यामुळेदेखील चर्चेत आहे.

हेही वाचा: “अशीच वेडी राहा…” म्हणत शिवानी सोनारने आईला ५०व्या वाढदिवसाच्या दिल्या हटके शुभेच्छा, होणारा नवरा अंबर गणपुळे कमेंट करत म्हणाला…

सलमान खान गेल्या काही दिवसांपासून बिश्नोई गँगने दिलेल्या धमक्यांमुळे मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. बिश्नोई गँगने त्याला जीवे मारण्याची धमकी दिली आहे, यामुळे त्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss 18 fame hema sharma aka viral bhabhi says people often said if you challenge salman khan your career will not be made netizen reacts nsp