Bigg Boss 18: ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाच्या येणाऱ्या वीकेंडच्या वारमध्ये सलमान खान नसणार आहे. सलमान खानच्या ऐवजी फराह खान घरातील सदस्यांची चांगलीच शाळा घेणार आहे. आठवड्याभरात बऱ्याच गोष्टी घडल्या, कोणी कोणाच्या वैयक्तिक आयुष्यावर टीका केली, तर कोणी शारिरीक हिंसा केली. यावरून फराह खानने सदस्यांना चांगलंच झापलं आहे. याचे प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
या वीकेंडच्या वारला ‘फराह की अदालत’ होणार आहे. यावेळीच फराह खान तजिंदर बग्गासह ईशा सिंहवर भडकलेली पाहायला मिळाली. तजिंदर बग्गाने करणवीर मेहराच्या मामावरून एक विधान केलं होतं. त्यावर फराह खानने तजिंदरसह ईशा सिंहच्या ग्रुपला चांगलंच सुनावलं.
फराह खान म्हणाली, “बग्गाजी, करणचे मामा पीएमओमध्ये बाथरुम साफ करत असतील. ही कमेंट बरोबर की नाही हे सांगा.” तेव्हा तजिंदर बग्गा म्हणाला, “नाही.” त्यानंतर फराह म्हणाली की, जर ईशा करणने ही कमेंट तुमच्यापैकी कोणावर केली असती तर सगळं घर खाली आलं असतं. फक्त करणचं बोलणं, करणमागून चुगली, तुला करणचं वेड लागलं आहे का? हा करणवीर मेहरा शो झाला आहे. शेवटच्या वेळेस मी असं पाहिलं होतं की, अशाप्रकारे एका सदस्याला टार्गेट केलं जात होतं तो म्हणजे सिद्धार्थ शुक्ला आणि तो शो जिंकला.”
#WeekendKaVaar Promo: KV's fan Farah Khan called Bigg Boss 18 "The Karan Veer Mehra Show", and compared him with Sidharth Shuklapic.twitter.com/bvb2CcU71u
— #BiggBoss_Tak? (@BiggBoss_Tak) December 6, 2024
दरम्यान, या नवव्या आठवड्यात घरातील सदस्यांनी सहा जणांना घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट केलं. यामध्ये करणवीर मेहरा, शिल्पा शिरोडकर, चुम दरांग, दिग्विजय राठी, कशिश कपूर आणि सारा अरफीन खान यांचा समावेश आहे. या सहा जणांमधून कोण घराबाहेर होणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.