Bigg Boss 18: ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वातील नवव्या आठवड्यातील वीकेंड वार विशेष असणार आहे. कारण सलमान खानच्या जागी फराह खान होस्ट करताना पाहायला मिळणार आहे. यावेळी फराह खानने रजत दलालला चांगलंच झापलं. महत्त्वाचं म्हणजे फराह खानने रजतला शारिरीक हिंसेसंदर्भात शेवटची ताकीद दिली आहे. याचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे.
‘बिग बॉस १८’च्या ६ डिसेंबरच्या भागात मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळालं. अविनाश मिश्रा आणि रजत दलाल दिग्विजय राठीच्या अंगावर धावून शारिरीक हिंसा करताना दिसले. याच कारण होती ईशा सिंह. ‘बिग बॉस’ने घरातील पुरुष सदस्यांना पार्ले-जी टास्क दिला होता. यामध्ये पुरुषांना हृदयच्या आकाराचे बिस्किट बनवून महिला सदस्यांना इम्प्रेस करायचं होतं. या टास्कमध्ये दिग्विजय जिंकला. त्यानंतर बिस्किट खाण्यावरून दिग्विजय आणि ईशामध्ये वाद झाले. या वादात काही वेळानंतर अविनाश मिश्रा आला. मग हा वाद वाढतच गेला.
ईशा, अविनाश आणि दिग्विजयच्या वादात सारा अरफीन खानने उडी मारली. त्यामुळे रजत दलाल देखील तिच्या मागोमाग आला. दिग्विजयने ईशाला बोलल्यामुळे रजत शारिरीक हिंसा करताना दिसला. यावेळी विवियन डिसेना आणि करणवीर मेहराने सगळ्यांना मागे केलं. याचवरून फराह खान रजत दलालवर भडकली आणि तिने थेट घराबाहेर काढण्याची ताकीद दिली.
फराह खान रजतला म्हणाली, “तुला आता एक थेट ताकीद देते. जर अजून एकदा फिजिकल फाइट झाली तर तू थेट शो बाहेर होशील.” त्यानंतर रजत घरात सतत महिलांच्या सुरक्षेबाबत बोलत असतो. त्यावरून फराहने चांगलंच झापलं. तिने घरातील सर्व महिना विचारलं, “तुम्हाला या घरात सुरक्षित राहण्यासाठी याची गरज आहे का?” तर सर्व महिला सदस्य म्हणाल्या की, आम्हाला गरज नाहीये. तेव्हा फराह रजतला म्हणाली, “ऐक, कोणालाही तुझी मदत नकोय. तू स्वतःला सांभाळलं.”
हेही वाचा – गरिबांचा रणवीर सिंह म्हणणाऱ्यांना सिद्धार्थ जाधवने दिलं सडेतोड उत्तर, म्हणाला, “माझ्यासाठी ट्रोलिंग…”
दरम्यान, या आठवड्यात घरातील सदस्यांनी सहा जणांना घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट केलं. यामध्ये करणवीर मेहरा, शिल्पा शिरोडकर, चुम दरांग, दिग्विजय राठी, कशिश कपूर आणि सारा अरफीन खान यांचा समावेश आहे. या सहा जणांमधून कोण घराबाहेर होणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.