Bigg Boss 18 : सलमान खान होस्ट करत असलेला ‘बिग बॉस’चा १८ वा सीझन आता अंतिम टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. येत्या काही वेळात या पर्वाचा विजेता स्पर्धक कोण आहे याची माहिती प्रेक्षकांना मिळेल. यंदा या खेळात विवियन डिसेना, करणवीर मेहरा, अविनाश मिश्रा, रजत दलाल, ईशा सिंह आणि चुम दरांग हे सहा स्पर्धक फायनलिस्ट ठरले आहेत. या सहा जणांचे चाहते व समर्थक बाहेरुन प्रेक्षकांचा मोठ्या संख्येने पाठिंबा मिळावा यासाठी खूप प्रयत्न करत आहेत.

‘बिग बॉस’च्या अठराव्या पर्वात फायनलिस्ट ठरलेल्या सहा स्पर्धकांपैकी रजत दलालला पहिल्या दिवसांपासून आधीच्या पर्वाचा विजेता आणि प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादव सपोर्ट करत असल्याचं पाहायला मिळालं आहे. फिनालेपूर्वी एल्विश यादवने इन्स्टाग्रामवर लाइव्ह सेशन घेत एक मोठी घोषणा केली आहे.

रजत दलालला काही करुन हा सीझन जिंकवा, यासाठी त्याला भरभरून व्होट करा. जर, रजत जिंकला तर १०१ चाहत्यांना आयफोन १६ प्रो मॅक्स दिले जातील अशी घोषणा एल्विशने केलेली आहे. या १०१ आयफोनची किंमत तब्बल १.५ कोटी होते. त्यामुळे जर, रजत जिंकला तर, दिलेल्या शब्दाप्रमाणे एल्विशला त्याच्या चाहत्यांना तब्बल १.५ कोटींचं गिफ्ट द्यावं लागणार आहे. त्यामुळे आता एल्विश यादवचे फॅन्स सुद्धा रजतला व्होट करु लागले आहेत.

एल्विश आपल्या मित्राला पाठिंबा देण्यासाठी ‘बिग बॉस’च्या घरात सुद्धा आला होता. आता एवढ्या सपोर्टनंतर रजत खरंच जिंकतो की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, प्रेक्षकांना ‘बिग बॉस १८’चा फिनाले रात्री ९.३० वाजता सुरू होणार आहे. हा सोहळा प्रेक्षकांना कलर्स टीव्ही आणि जिओ सिनेमावर लाइव्ह पाहता येणार आहे. आता विवियन डिसेना, करणवीर मेहरा, अविनाश मिश्रा, रजत दलाल, ईशा सिंह आणि चुम दरांग हे सहा जणांपैकी कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Story img Loader