Bigg Boss 18 Grand Finale: ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा आज १९, जानेवारीला महाअंतिम सोहळा रंगणार आहे. ६ ऑक्टोबर २०२४पासून सुरू झालेलं हे पर्व चांगलंच गाजलं. या पर्वात बऱ्याच नव्या गोष्टी घडल्या. भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमानकाळ यावर आधारित ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाची थीम होती. या पर्वाच्या पहिल्याच दिवशी टॉप-२ सदस्य जाहीर करण्यात आले. विवियन डिसेना आणि एलिस कौशिक हे दोन ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचे टॉप-२ सदस्य असल्याची घोषणा सलमान खानने केली. पण ‘बिग बॉस’ची भविष्यवाणी तंतोतंत खरी ठरली नाही. एलिस कौशिक काही आठवड्यात एविक्ट झाली. आता विवियन डिसेना राहिला आहे; जो टॉप-२ सदस्यांपैकी एक होतो की नाही? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा उल्लेख केल्यानंतर काही सदस्यांची नावं चटकन तोंडावर येतील. तसंच घरात झालेली नाती डोळ्यांसमोर येतील. त्यापैकी एक म्हणजे शिल्पा शिरोडकर, करणवीर मेहरा आणि विवियन डिसेना यांच्यातील आई-मुलाचं सुंदर नातं. हे नातं ५०-५० दिवसांसाठी असल्याचं म्हटलं तरी ते अजूनही तितकंच सुंदर असल्याचं महाअंतिम सोहळ्यातील परफॉर्मन्समध्ये पाहायला मिळालं.
हेही वाचा – Bigg Boss 18: “तुला गर्लफ्रेंड नाहीतर…”, चुम दरांगने करणवीर मेहराची उडवली खिल्ली, पाहा व्हिडीओ
शिल्पा, करण आणि विवियनच्या परफॉर्मन्सचा व्हिडीओ ‘कलर्स टीव्ही’च्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये शिल्पा पुन्हा एकदा राजमाता आणि तिचे करण-अर्जुन पाहायला मिळत आहे. यावेळी या त्रिकुटाने ‘करण-अर्जुन’ चित्रपटातील ‘ये बंधन तो…’ या गाण्यावर परफॉर्मन्स केला. शेवटी दोघांनी शिल्पाला ‘गेमर शिल्पा’ असा टॅग दिला.
शिल्पा, करण आणि विवियनचा परफॉर्मन्स पाहून बऱ्याच कलाकार मंडळींसह चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. शिल्पाची बहीण नम्रता शिरोडकर म्हणाली, “तू माझी बिग बॉस आहेस.”
हेही वाचा – ‘येड लागलं प्रेमाचं’ मालिकेत ‘या’ लोकप्रिय अभिनेत्याची एन्ट्री, ‘बिग बॉस मराठी’शी आहे खास कनेक्शन
दरम्यान, आपल्या आवडत्या सदस्याला जिंकवण्यासाठी चाहते भरभरून व्होटिंग करताना दिसत आहेत. ‘बिग बॉस खबरी’नुसार, शनिवारी ११.४० वाजेपर्यंत विवियन डिसेनाला सर्वाधिक व्होटिंग मिळत असल्याचं पाहायला मिळालं. विवियनला ३० टक्के, करणला २९ टक्के, रजतला २५ टक्के, चुमला १० टक्के, अविनाशला ४ टक्के आणि ईशा २ टक्के व्होटिंग मिळालं आहे.