Bigg Boss 18 Grand Finale Live Updates : छोट्या पडद्यावरील वादग्रस्त रिअ‍ॅलिटी शो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘बिग बॉस’चं यंदा १८वं पर्व. ६ ऑक्टोबर २०२४पासून ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाला सुरुवात झाली. एक नवीन आणि अनोखी थीम या पर्वात पाहायला मिळाली. ‘टाइम का तांडव’ असं थीमचं नाव आहे. भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमानकाळ यावर आधारित ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाची थीम होती. ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वात एकूण १८ सदस्यांनी सहभाग घेतला. या १८ सदस्यांबरोबर एक गाढवसुद्धा होतं. पण काही दिवसांनी या गाढवाला बाहेर काढण्यात आलं.

चाहत पांडे, शेहजादा धामी, अविनाश मिश्रा, शिल्पा शिरोडकर, तजिंदर बग्गा, श्रुतिका अर्जुन, नायरा बनर्जी, चुम दरांग, करणवीर मेहरा, रजत दलाल, मुस्कान बामणे, अरफीन खान, सारा अरफीन खान, हेमा शर्मा, गुणरत्न सदावर्ते, ईशा सिंह, विवियन डिसेना आणि एलिस कौशिक या १८ सदस्यांनी ६ ऑक्टोबरला ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री घेतली. पहिल्या दिवसांपासूनच या १८ सदस्यांमध्ये वाद पाहायला मिळाले. त्यानंतर दिवाळीच्या मुहूर्तावर दिग्विजय सिंह राठी आणि कशिश कपूर यांची ‘वाइल्ड कार्ड’ एन्ट्री झाली. मग काही दिवसांनंतर एडिन रोज, यामिनी मल्होत्रा आणि आदिती मिस्त्री या हॉट आणि ग्लॅमरस मुलींनी ‘वाइल्ड कार्ड’ एन्ट्री केली. पण अंतिम आठवड्यापर्यंत या पाच वाइल्ड कार्डपैकी कोणीही पोहोचू शकलं नाही. आता विवियन डिसेना, करणवीर मेहरा, चुम दरांग, रजत दलाल, अविनाश मिश्रा आणि ईशा सिंह या टॉप-६ सदस्यांमधून कोण ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा महाअंतिम विजेता ठरतोय? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. ‘बिग बॉस’च्या महाअंतिम सोहळ्याचे प्रत्येक अपडेट्स जाणून घ्या…

Bigg Boss 18 Grand Finale LIVE,  19 January 2025 | ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाची ट्रॉफी कोण उचलणार?

Live Updates
20:00 (IST) 19 Jan 2025

चाहत्यांचा पाठिंबा पाहून अविनाश मिश्रा भारावला, आई-वडिलांचा 'तो' व्हिडीओ पाहताच अभिनेत्याचे अश्रू अनावर

'बिग बॉस'च्या १८व्या पर्व आज प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. रात्री ९.३० वाजल्यापासून महाअंतिम सोहळ्याला सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी महाअंतिम सोहळ्यातील प्रोमो व्हायरल झाले आहेत. नुकताच अविनाश मिश्राचा प्रोमो समोर आला आहे. ज्यामध्ये अविनाश चाहत्यांचा पाठिंबा पाहून भारावून गेला. एवढंच नाहीतर आई-वडिलांचा व्हिडीओ पाहताच रडू लागला.

19:39 (IST) 19 Jan 2025
करणवीर मेहरा 'बिग बॉस १८'चा विजेता व्हावा - शिल्पा शिरोडकर

'बिग बॉस'च्या १८व्या पर्वाचा महाअंतिम सोहळ्याला आपल्या आवडत्या सदस्याला पाठिंबा देण्यासाठी अनेक कलाकार उपस्थित राहिले आहेत. यंदाच्या पर्वात सहभागी झालेली शिल्पा शिरोडकर 'बिग बॉस'च्या सेटवर पोहोचली आहे. तिने करणवीर मेहरा 'बिग बॉस १८'चा विजेता व्हावा, अशी इच्छा व्यक्त केली आहे.

18:49 (IST) 19 Jan 2025
ईशा सिंहनंतर चुम दरांग झाली एविक्ट?

'बिग बॉस'च्या १८व्या पर्वाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाल्यामुळे सतत नवनवीन अपडेट्स समोर येत आहेत. ईशा सिंह सहाव्या स्थानावरून बाद झाल्यानंतर आता आणखीन सदस्य 'बिग बॉस'च्या स्पर्धेतून बाहेर गेल्याची माहिती मिळत आहे. 'बिग बॉस तक' या एक्स अकाउंटवरून दिलेल्या माहितीनुसार, महाअंतिम सोहळ्यातील दुसरं एविक्शन झालं आहे. ईशा सिंहनंतर चुम दरांगला पाचव्या स्थानावरून 'बिग बॉस'च्या घराचा निरोप घ्यावा लागला आहे. रजत दलाल, अविनाश मिश्रा, करणवीर मेहरा आणि विवियन डिसेना टॉप-४ सदस्य ठरले आहेत.

18:26 (IST) 19 Jan 2025
'बिग बॉस १८'ला मिळाले टॉप-५ सदस्य, कोण झालं एविक्ट?

'बिग बॉस'च्या १८व्या पर्वाच्या महाअंतिम सोहळ्याच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून मोठी अपडेट समोर आली आहे. ईशा सिंह एविक्ट झाल्याचं समोर आलं आहे. टॉप-५मध्ये आता अविनाश मिश्रा, चुम दरांग, करणवीर मेहरा, रजत दलाल आणि विवियन डिसेना हे सदस्य आहेत.

18:24 (IST) 19 Jan 2025

चुम दरांगला पाठिंबा देण्यासाठी आली चाहत पांडे

'बिग बॉस'च्या १८व्या पर्वाच्या ट्रॉफीवर चुम दरांगचं नाव कोरलं जावं, अशी इच्छा चाहत पांडेने व्यक्त केली आहे.

18:21 (IST) 19 Jan 2025

महाअंतिम सोहळ्यातील परफॉर्मन्सचे काही खास क्षण

'बिग बॉस'च्या १८व्या पर्वाच्या महाअंतिम सोहळ्याला अवघे काही तास बाकी आहेत. पण त्यापूर्वी परफॉर्मन्सचे फोटो, व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

18:19 (IST) 19 Jan 2025
महाअंतिम सोहळ्यात रजत दलाल-चाहत पांडेचा डान्स

रजत दलाल आणि चाहत पांडेने आपल्या जबरदस्त परफॉर्मन्सने पुन्हा एकदा जिंकली चाहत्यांनी मनं

18:09 (IST) 19 Jan 2025

करण-चुम आणि अविनाश-ईशा यांचा रोमँटिक डान्स

करणवीर मेहरा-चुम दरांग आणि अविनाश मिश्रा-ईशा सिंह यांनी शाहीद कपूरच्या 'तेरी बातों में उजाला जिया' गाण्यावर केला डान्स, पाहा व्हिडीओ

18:04 (IST) 19 Jan 2025

“ये बंधन तो…”, करण-विवियनचा शिल्पासह जबरदस्त परफॉर्मन्स, पाहा व्हिडीओ

बिग बॉसच्या महाअंतिम सोहळ्यात शिल्पा शिरोडकरचा करणवीर मेहरा आणि विवियन डिसेनाबरोबर जबरदस्त डान्स. ज्यामध्ये शिल्पा पुन्हा एकदा राजमाता आणि तिचे करण-अर्जुन पाहायला मिळत आहे.

Bigg Boss 18 Grand Finale LIVE

'बिग बॉस १८' ग्रँड फिनाले लाईव्ह अपडेट्स

Story img Loader