Bigg Boss 18 Grand Finale Highlights : बिग बॉसच्या १८ व्या सीझनचा ग्रँड फिनाले नुकताच पार पडला. ६ ऑक्टोबर २०२४पासून ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाला सुरुवात झाली होती. यंदा महाअंतिम सोहळ्यापर्यंत विवियन डिसेना, करणवीर मेहरा, चुम दरांग, रजत दलाल, अविनाश मिश्रा आणि ईशा सिंह हे सहा सदस्य पोहोचले होते. या टॉप-६ सदस्यांमधून कोण ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा महाअंतिम विजेता ठरतोय, याकडे सगळ्या चाहत्यांचं लक्ष लागलं होतं. अखेर यात करणवीर मेहराने बाजी मारली आहे. ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाच्या झगमगत्या ट्रॉफीवर करणने आपलं नाव कोरलं आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
यंदा एक नवीन आणि अनोखी थीम प्रेक्षकांना मिळाली. ‘टाइम का तांडव’ असं थीमचं नाव होतं. भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमानकाळ यावर आधारित ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाची थीम होती. ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वात एकूण १८ सदस्यांनी सहभाग घेतला. या १८ सदस्यांबरोबर एक गाढवसुद्धा होतं. पण काही दिवसांनी या गाढवाला बाहेर काढण्यात आलं.
चाहत पांडे, शेहजादा धामी, अविनाश मिश्रा, शिल्पा शिरोडकर, तजिंदर बग्गा, श्रुतिका अर्जुन, नायरा बनर्जी, चुम दरांग, करणवीर मेहरा, रजत दलाल, मुस्कान बामणे, अरफीन खान, सारा अरफीन खान, हेमा शर्मा, गुणरत्न सदावर्ते, ईशा सिंह, विवियन डिसेना आणि एलिस कौशिक या १८ सदस्यांनी ६ ऑक्टोबरला ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री घेतली. पहिल्या दिवसांपासूनच या १८ सदस्यांमध्ये वाद पाहायला मिळाले. त्यानंतर दिवाळीच्या मुहूर्तावर दिग्विजय सिंह राठी आणि कशिश कपूर यांची ‘वाइल्ड कार्ड’ एन्ट्री झाली. मग काही दिवसांनंतर एडिन रोज, यामिनी मल्होत्रा आणि आदिती मिस्त्री या हॉट आणि ग्लॅमरस मुलींनी ‘वाइल्ड कार्ड’ एन्ट्री केली. पण अंतिम आठवड्यापर्यंत या पाच वाइल्ड कार्डपैकी कोणीही पोहोचू शकलं नाही.
Bigg Boss 18 Grand Finale Winner, 19 January 2025 | ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा विजेता ठरला करणवीर
‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा विजेता ठरला करणवीर मेहरा
अखेर सलमान खानने ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा विजेता जाहीर केला आहे. करणवीर मेहरा ‘बिग बॉस १८’चा विजेता ठरला आहे. यंदाच्या पर्वाच्या ट्रॉफीवर करणचं नाव कोरलं असून त्याला ५० लाखांचा धनादेश बक्षीस स्वरुपात मिळाला आहे.
‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाच्या शर्यतीतून आता रजत दलाल बाहेर झाला आहे. याची घोषणा सलमान खानने केली. सलमान टॉप-२ सदस्य जाहीर करताना म्हणाला की, मला स्वतःला आश्चर्य वाटतं आहे. पण हे प्रेक्षकांचं मत आहे.
सलमान खानच्या मते ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वातील ‘हा’ सदस्य होता सर्वात जास्त अॅक्टिव्ह
सलमान खानच्या मते अविनाश मिश्रा ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वातला सर्वात अॅक्टिव्ह आणि अष्टपैलू सदस्य असल्याचं त्यानं सांगितलं.
‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचे ‘हे’ ठरले टॉप-३ सदस्य
‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचे टॉप-३ सदस्य विवियन डिसेना, रजत दलाल आणि करणवीर मेहरा ठरले आहेत. त्यामुळे आता या तिघांपैकी कोण ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा विजेता ठरणार? याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
सलमान खान आणि आमिर खानची मस्ती
‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाच्या महाअंतिम सोहळ्याला सलमान खान आणि आमिर खानची मस्ती पाहायला मिळाली. यावेळी दोघं एकमेकांची खिल्ली उडवताना पाहायला मिळाले. एकमेकांचा फोन घेऊन सलमान आणि आमिर मस्ती करताना दिसले.
‘लव्हयापा’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेता आमिर खान, जुनैद खान आणि खुशी कपूर ‘बिग बॉस १८’ महाअंतिम सोहळ्याला उपस्थित राहिले. यावेळी जुनैद आणि खुशी ‘बिग बॉस’च्या घरात गेले आणि त्यांनी टॉप-३ सदस्य जाहीर केले. अविनाश मिश्रा एविक्ट झाला. तर रजत दलाल, विवियन डिसेना आणि करणवीर मेहरा हे टॉप-३ सदस्य ठरले.
महाअंतिम सोहळ्यात सलमान खान सतत चाहत पांडेला बॉयफ्रेंडवरून चिडवत होता. यावेळी चाहत पांडेने पुन्हा एकदा सलमान खानला लग्नाची मागणी घातली. “तुम्ही माझ्याशी लग्न करा,” असं चाहत म्हणाली. तेव्हा सलमानने रजत दलालचं नाव घेतलं. पण रजतने हात जोडले आणि नको म्हणाला. त्यानंतर चाहत सलमानला म्हणाली, “तुम्ही माझ्या आईला भेटा.” एवढंच नव्हे तर चाहत सलमानला “आय लव्ह यू” म्हणताना दिसली.
‘बिग बॉस १८’च्या महाअंतिम सोहळ्याला ‘लाफ्टर शेफ्स’च्या कलाकारांनी खास उपस्थिती
‘बिग बॉस १८’च्या महाअंतिम सोहळ्याला ‘लाफ्टर शेफ्स’च्या कलाकारांनी खास उपस्थिती लावली होती. अभिषेक, विक्की जैन, एल्विश यादव, मनारा चोप्रा आणि अंकिता लोखंडे महाअंतिम सोहळ्यात पोहोचले. यावेळी मनाराने ‘रजत चाट’ बनवलं; ज्याची रेसिपी शिल्पा शिरोडकरने सांगितली.
‘बिग बॉस’चं १८वं पर्व सुरुवातीला वकील गुणरत्न सदावर्तेंनी चांगलंच गाजवलं. पण महाअंतिम सोहळ्याला सदावर्ते गैरहजर राहिले. तसंच वाइल्ड कार्ड म्हणून सहभागी झालेला दिग्विजय राठीसुद्धा महाअंतिम सोहळ्याला अनुपस्थित आहे.
‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वातील टॉप-४ सदस्य कोण?
ईशा सिंहनंतर चुम दरांग एविक्ट झाली आहे. यावेळी चुम घरातून बाहेर घेऊन येण्यासाठी तिची आई गेली होती. बाहेर आल्यानंतर चुमला सलमानने विचारलं की, ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा विजेता कोण व्हायला पाहिजे? तेव्हा चुम म्हणाली, “मनापासून करणवीर मेहरा विजयी व्हायला पाहिजे. करण ट्रॉफी घरीच यायला पाहिजे. पण चाहत्यांचा व्हिडीओ पाहून रजत दलाल जिंकण्याची शक्यताही वाटतं आहे. तसंच माझ्या स्वप्नातही रजत आला होता.”
ईशा सिंहनंतर अविनाश मिश्रा होईल बाहेर; चाहत पांडे, अरफीन खानचं वक्तव्य
सलमान खानने चाहतला विचारलं की, ईशा सिंहनंतर कोणता सदस्य घराबाहेर होईल. तेव्हा चाहत म्हणाली, “‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाच्या स्पर्धेतून अविनाश मिश्रा बाद होईल.” तसंच अरफीन खानने देखील अविनाशचं नाव घेतलं.
‘स्काई फोर्स’ चित्रपटाच्या निमित्ताने वीर पहारिया ‘बिग बॉस १८’च्या घरात पोहोचला होता. यावेळी वीरच्या हातून मिशन एलिमिशन पार पडलं आणि ईशा सिंह एलिमिनेट झाली. वीर पहारियाबरोबर ईशा ‘बिग बॉस’च्या घराबाहेर आली. त्यानंतर ईशा म्हणाली की, मला इतक्या सुंदर मुलाबरोबर बाहेर यायला मिळालं. याचा मला आनंद झाला. माझ्यानंतर करणवीर मेहरा बाहेर यायला पाहिजे, अशी भावना तिने व्यक्त केली.
सलमान खानने रजत दलालच्या आईला ‘गुल्लू’ नाव कोणी दिलं असं विचारलं? तेव्हा रजतची आई म्हणाली, “त्याच्या आजीने नाव ठेवलं.”
गेले १५ वर्ष सलमान खान ‘बिग बॉस’ होस्ट करत आहे. त्यामुळे महाअंतिम सोहळ्याच्या सुरुवातीला सलमानने आतापर्यंतच्या प्रवासाचं थोडक्यात वर्णन केलं. त्यानंतर सलमानने मंचावर उपस्थितीत असलेल्या ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वातील एविक्टेड झालेल्या सदस्यांशी संवाद साधला. यावेळी सलमानने पुन्हा चाहत पांडेची बॉयफ्रेंडवरून खिल्ली उडवली. तसंच व्हायरल झालेला पुलवाला व्हिडीओ पाहिला का? असं सलमानने चाहतला विचारलं. तेव्हा चाहत म्हणाली की, नाही. त्यानंतर सलमान म्हणाला, “मी तो पुलवाला व्हिडीओ पाहिला.”
‘बिग बॉस १८’च्या महाअंतिम सोहळ्याला ‘अशी’ झाली सुरुवात, टॉप-६ सदस्य गेले भारावून
६ ऑक्टोबरपासून सुरू झालेला ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा प्रवास आज संपणार आहे. ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा महाअंतिम सोहळ्याला सुरुवात झाली आहे. ही सुरुवात टॉप-६ सदस्यांना प्रोत्साहान देत झाली. विवियन डिसेना, ईशा सिंह, अविनाश मिश्रा, करणवीर मेहरा, चुम दरांग आणि रजत दलाल हे ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचे टॉप-६ सदस्य आहे. याच सदस्यांना चाहत्यांकडून आणि कुटुंबाकडून मिळत असलेला पाठिंबा, याचा व्हिडीओ दाखवून महाअंतिम सोहळ्याची सुरुवात झाली आहे. हे व्हिडीओ पाहून प्रत्येक सदस्य भारावून गेले आहेत.
‘बिग बॉस १८’चा महाअंतिम सोहळा सुरू होण्यासाठी अवघे काही मिनिटं
लवकरच सुरू होणार बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित ‘बिग बॉस १८’चा महाअंतिम सोहळा
चाहत्यांचा पाठिंबा पाहून अविनाश मिश्रा भारावला, आई-वडिलांचा ‘तो’ व्हिडीओ पाहताच अभिनेत्याचे अश्रू अनावर
‘बिग बॉस’च्या १८व्या पर्व आज प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. रात्री ९.३० वाजल्यापासून महाअंतिम सोहळ्याला सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी महाअंतिम सोहळ्यातील प्रोमो व्हायरल झाले आहेत. नुकताच अविनाश मिश्राचा प्रोमो समोर आला आहे. ज्यामध्ये अविनाश चाहत्यांचा पाठिंबा पाहून भारावून गेला. एवढंच नाहीतर आई-वडिलांचा व्हिडीओ पाहताच रडू लागला.
‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा महाअंतिम सोहळ्याला आपल्या आवडत्या सदस्याला पाठिंबा देण्यासाठी अनेक कलाकार उपस्थित राहिले आहेत. यंदाच्या पर्वात सहभागी झालेली शिल्पा शिरोडकर ‘बिग बॉस’च्या सेटवर पोहोचली आहे. तिने करणवीर मेहरा ‘बिग बॉस १८’चा विजेता व्हावा, अशी इच्छा व्यक्त केली आहे.
‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाल्यामुळे सतत नवनवीन अपडेट्स समोर येत आहेत. ईशा सिंह सहाव्या स्थानावरून बाद झाल्यानंतर आता आणखीन सदस्य ‘बिग बॉस’च्या स्पर्धेतून बाहेर गेल्याची माहिती मिळत आहे. ‘बिग बॉस तक’ या एक्स अकाउंटवरून दिलेल्या माहितीनुसार, महाअंतिम सोहळ्यातील दुसरं एविक्शन झालं आहे. ईशा सिंहनंतर चुम दरांगला पाचव्या स्थानावरून ‘बिग बॉस’च्या घराचा निरोप घ्यावा लागला आहे. रजत दलाल, अविनाश मिश्रा, करणवीर मेहरा आणि विवियन डिसेना टॉप-४ सदस्य ठरले आहेत.
‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाच्या महाअंतिम सोहळ्याच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून मोठी अपडेट समोर आली आहे. ईशा सिंह एविक्ट झाल्याचं समोर आलं आहे. टॉप-५मध्ये आता अविनाश मिश्रा, चुम दरांग, करणवीर मेहरा, रजत दलाल आणि विवियन डिसेना हे सदस्य आहेत.
चुम दरांगला पाठिंबा देण्यासाठी आली चाहत पांडे
‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाच्या ट्रॉफीवर चुम दरांगचं नाव कोरलं जावं, अशी इच्छा चाहत पांडेने व्यक्त केली आहे.
महाअंतिम सोहळ्यातील परफॉर्मन्सचे काही खास क्षण
‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाच्या महाअंतिम सोहळ्याला अवघे काही तास बाकी आहेत. पण त्यापूर्वी परफॉर्मन्सचे फोटो, व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.
रजत दलाल आणि चाहत पांडेने आपल्या जबरदस्त परफॉर्मन्सने पुन्हा एकदा जिंकली चाहत्यांनी मनं
करणवीर मेहरा अन् अविनाश मिश्राचा हटके स्वॅग
करणवीर मेहरा आणि अविनाश मिश्राचा भन्नाट डान्स
करण-चुम आणि अविनाश-ईशा यांचा रोमँटिक डान्स
करणवीर मेहरा-चुम दरांग आणि अविनाश मिश्रा-ईशा सिंह यांनी शाहीद कपूरच्या ‘तेरी बातों में उजाला जिया’ गाण्यावर केला डान्स, पाहा व्हिडीओ
“ये बंधन तो…”, करण-विवियनचा शिल्पासह जबरदस्त परफॉर्मन्स, पाहा व्हिडीओ
बिग बॉसच्या महाअंतिम सोहळ्यात शिल्पा शिरोडकरचा करणवीर मेहरा आणि विवियन डिसेनाबरोबर जबरदस्त डान्स. ज्यामध्ये शिल्पा पुन्हा एकदा राजमाता आणि तिचे करण-अर्जुन पाहायला मिळत आहे.