Bigg Boss 18 : ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचे तीन दिवस झाले आहेत. या तीन दिवसांतच सदस्यांमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून वाद होतं आहेत. पहिल्या दिवशी राशनसाठी टास्क पार पडला. यावेळी सदस्यांनी टास्क योग्यरित्या न खेळल्यामुळे राशन कमी मिळालं. त्यानंतर नुकतीच यंदाच्या पर्वातील पहिली नॉमिनेशन प्रक्रिया पार पडली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नॉमिनेशन प्रक्रियेत एकूण पाच सदस्यांना ‘बिग बॉस’च्या घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट करण्यात आलं. चाहत पांडे, गुणरत्न सदावर्ते, करण मेहरा, अविनाश मिश्रा आणि मुस्कान बामने या पाच जणांना घरातील इतर सदस्यांनी नॉमिनेट केलं. त्यामुळे पहिल्याच आठवड्यात या पाच सदस्यांपैकी कोण घराबाहेर होतंय? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अशातच गुणरत्न सदावर्तेंनी ‘बिग बॉस’च्या घरात गोंधळ घातल्याचा प्रोमो समोर आला आहे. नेमकं काय घडलं आहे? जाणून घ्या…

हेही वाचा – रतन टाटांच्या निधनानंतर बॉलीवूड कलाकारांनी केला शोक व्यक्त, सलमान खानसह प्रियांका चोप्राने केल्या भावुक पोस्ट, म्हणाले…

सध्या ‘बिग बॉस’च्या घरातील जेलमध्ये तजिंदर पाल सिंह बग्गा आणि हेमा शर्मा आहे. पण आता दुसरा सदस्य जेलमध्ये जाणार आहे. हा सदस्य कोण असणार आहे? याची निवड करण्याचा विशेष अधिकार ‘बिग बॉस’ने करण मेहरा, अविनाश मिश्रा आणि ईशा सिंह यांना दिला आहे. या तिघांनी एकमताने जेलमध्ये जाणारा तिसरा सदस्य गुणरत्न सदावर्ते असल्याचं ठरवलं आहे. त्यामुळे सदावर्ते यांनी घरात गोंधळ घातला आहे.

‘कलर्स टीव्ही’ने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये अविनाश म्हणतो की, आम्ही निर्णय घेतला आहे. आम्ही गुणरत्न सदावर्ते यांना जेलमध्ये टाकू इच्छितो. तेव्हा सदावर्ते म्हणतात, “मला ही शिक्षा मान्य नाहीये.” त्यानंतर सदावर्ते जोरजोरात ओरडून बोलतात की, टॉर्चरचा प्रश्न नाहीये. भूमिकेचा प्रश्न आहे. मी कोर्टमध्येदेखील अशीच भूमिका मांडतो. मी अन्न आणि पाणी त्याग केलं आहे. यावेळी ईशा गुणरत्न यांना समजवते. “हे ‘बिग बॉस’चं घर आहे. इथे टास्क करावा लागले.” पण, गुणरत्न काही ऐकत नाहीत. ते म्हणतात, “मी माझी प्रतिमा खराब करू देणार नाही… मला सरकार घाबरतं…मी अन्याय सहन करू शकत नाही, हे आधीच सांगितलं होतं. बाजूला व्हा”, म्हणत सदावर्ते जोरात ओरडताना दिसत आहेत.

हेही वाचा – Bigg Boss 18 : तिसऱ्याच दिवशी ‘व्हायरल भाभी’ने ‘बिग बॉस’चा मोडला मोठा नियम; गुणरत्न सदावर्ते म्हणाले, “मी त्याची चिंता करत नाही…“

दरम्यान, आता करण, अविनाश आणि ईशाने घेतलेला निर्णय गुणरत्न सदावर्ते मान्य करतात की नाही? ते जेलमध्ये जातात की नाही? हे आता येत्या भागात स्पष्ट होणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss 18 gunaratna sadavarte caused chaos in bigg boss house as he was going to jail pps