Bigg Boss 18 : हिंदी ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा सध्या पहिलाच आठवडा सुरू आहे. हे पर्व सुरू होऊन चार दिवस उलटले आहेत. पण घरातील १८ सदस्यांनी पहिल्या दिवसापासून चांगलंच गाजवलं आहे. या १८ सदस्यांमधून सगळ्यात चर्चेत असलेले सदस्य म्हणजे अॅड. गुणरत्न सदावर्ते.
पहिल्या दिवशी गुणरत्न सदावर्ते इतर सदस्यांमध्ये जास्त मिसळताना दिसले नाही. पण हळूहळू त्यांची इतर सदस्यांशी मैत्री होतं गेली. सगळ्यात घट्ट मैत्री सदावर्ते यांची भाजप नेते तजिंदर पाल सिंह बग्गा यांच्याशी झाली. सध्या तजिंदग बग्गा ‘बिग बॉस’च्या जेलमधून असून सदावर्ते सातत्याने बग्गा यांना जेल बाहेर काढण्यासाठी आवाज उठवत आहेत. चौथ्या दिवशी गुणरत्न सदावर्तेंचा हटके अंदाज पाहायला मिळाला.
सदावर्तेंनी चौथ्या दिवशी दीड लाखांचा हिरेजडीत काळा रंगाचा सूट परिधान केला होता. हा सूट परिधान करून त्यांनी जबरदस्त स्वॅगमध्ये घरात एन्ट्री केली. ‘जिसकी बीवी मोटी उसका भी बड़ा नाम है’ गाणं गात, डान्स करत त्यांनी घरात एन्ट्री केली. त्यानंतर गुणरत्न सदावर्तेंना पाहून इतर सदस्य जोरजोरात ओरडू लागले. ‘आय एम अ डिस्को डान्सर’ हे गाणं गाताना इतर सदस्य दिसले. मग नेहमीप्रमाणे सदावर्ते तजिंदर बग्गा यांना भेटण्यासाठी जेलच्या येथे गेले. तेव्हा देखील सदावर्ते थिरकताना पाहायला मिळाले.
Guys… pls.. VOTE ?️ for This guy?? #GunaratnaSadavarte ?? He’s too entertaining, UNIQUE and unintentionally funny + DON Vibes?? He deserves to be on TOP5??? #GunratanSadavarte @BeingSalmanKhan #Biggboss18 #biggboss #bb18 #abhiya pic.twitter.com/qAQcan4d7H
— Kelly1313? (@Kelly131339867) October 10, 2024
यादरम्यान, शहजाद गुणरत्न सदावर्तेंबद्दल इतर सदस्यांशी बोलताना दिसला. तेव्हा त्याने सांगितलं की, सदावर्तेंनी घातलेला सूट दीड लाखांचा आहे. हे सर्व त्यांनी नॅशनल टेलिव्हिजनवर सांगितलं आहे. दुसऱ्याबाजूला सदावर्ते सूटवर असलेल्या हिऱ्यांविषयी हेमाला सांगताना दिसले.
Full support ?? to #GunratanSadavarte #BigBoss18 #BB18 #BB18LiveFeed pic.twitter.com/XtoiB3wope
— vivek karmalkar (@vivek_karmalkar) October 11, 2024
दरम्यान, पहिल्याच आठवड्यात गुणरत्न सदावर्ते ‘बिग बॉस’च्या घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले आहेत. त्यांच्यासह करण मेहरा, अविनाश मिश्रा, मुस्कान बामने आणि चाहत पांडे नॉमिनेट झाली आहे. आता या पाच सदस्यांपैकी कोण पहिल्याच आठवड्यात ‘बिग बॉस’च्या घराचा निरोप घेतंय? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.