Bigg Boss 18 : ‘बिग बॉस मराठी’नंतर हिंदी ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाला जबरदस्त सुरुवात झाली आहे. या पर्वात १८ सदस्यांसह एका गाढवाने ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री घेतली आहे. तसंच यंदाच्या पर्वात दोन मराठी चेहरे देखील सहभागी झाले आहेत. एक म्हणजे अभिनेत्री शिल्पा शिरोडकर आणि दुसरे अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते. त्यामुळे सध्या हे दोन मराठी चेहरे चर्चेत आहेत.

‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाच्या पहिल्या दिवसापासून वाद पाहायला मिळत आहेत. कोणाचे जेवणावरून वाद होतं आहेत, तर कोणाचे बेडवरून तू तू में में होत आहे. या पर्वाच्या पहिल्या टास्कमध्ये सदस्य योग्यरित्या खेळू शकले नाहीत. त्यामुळे राशन देखील कमीप्रमाणात मिळालं. अशातच तिसऱ्याच दिवशी ‘बिग बॉस’च्या मोठ्या नियमाचं उल्लंघन झाल्याचं समोर आलं आहे. याचा प्रोमो सध्या व्हायरल झाला आहे.

हेही वाचा – निक्की तांबोळीने अरबाजबद्दल अप्रत्यक्षरित्या दिली प्रेमाची कबुली, लाजत केली ‘ही’ कृती अन् म्हणाली, “हे प्रेम…”

‘कलर्स टीव्ही’च्या सोशल मीडियावर हा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. यामध्ये गुणरत्न सदावर्ते जेलबाहेर बसून जेलमध्ये असलेल्या ‘व्हायरल भाभी’ म्हणजेच हेमाला नंबर देताना दिसत आहेत. यावेळी हेमा सदावर्ते यांनी सांगितलेला नंबर टिकलीच्या पाकिटवर नेल पॉलिशने लिहिताना पाहायला मिळत आहे. नंबर लिहिताना हेमा शर्मा म्हणाली, “गुणरत्न यांनी वीआयपी नंबर घेऊन ठेवला आहे.” तितक्यात बिग बॉस म्हणाले, “सर्वांनाच माहीत आहे, घरात काहीही लिहिण्यास मनाई आहे. तर हे असं करणं घराचा नियम उल्लंघन नाही का?” त्यानंतर गुणरत्न सदावर्ते म्हणतात की, मी त्याची चिंता करत नाही. कारण मी डाकूच्या खानदानातून आलो आहे आणि माझ्यासमोर अडचणी आल्या तर त्या कशा दूर करायच्या हे माहीत आहे. मला कायदा माहीत आहे.

हेही वाचा – Video: शूट करत असताना अचानक प्रसिद्ध गायिकेवर पडला सेट अन् मग…; व्हिडीओ झाला व्हायरल

‘बिग बॉस १८’मधील १८ स्पर्धक

‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वात १८ स्पर्धकांसह एक गाढव सहभागी झालं आहे. चाहत पांडे, शेहजादा धामी, अविनाश मिश्रा, शिल्पा शिरोडकर, तेजिंदर पाल सिंह बग्गा, श्रुतिका अर्जुन, नायरा बनर्जी, चुम दरंग, करण मेहरा, रजत दलाल, मुस्कार बामने, अरफीन खान, सारा अरफीन खान, ईशा सिंह, हेमा शर्मा, विवियन डिसेना, एलिस कौशिक आणि गुणरत्न सदावर्ते हे १८ सदस्य सहभागी झाले आहेत.