Bigg Boss 18: ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वातील अखेर पहिलं एलिमिनेशन झालं. गेल्या आठवड्यात एकूण १० जण नॉमिनेट झाले आहेत. यामध्ये तजिंदर बग्गा, मुस्कान बामने, रजत दलाल, चाहत पांडे, श्रुतिका अर्जुन, हेमा शर्मा, शिल्पा शिरोडकर, करण वीर मेहरा, एलिस कौशिक आणि अविनाश मिश्रा यांचा समावेश होता. यापैकी हेमा शर्मा घराबाहेर झाली. ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वातून बेघर होणारी हेमा ही पहिली सदस्य आहे. सध्या हेमा वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत आली आहे. हेमाच्या पूर्वाश्रमीच्या पतीने तिच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत.

‘बिग बॉस १८’मधून बाहेर झालेली हेमा शर्मा ‘व्हायरल भाभी’ म्हणून लोकप्रिय आहे. हेमाचा पूर्वाश्रमीचा युगांडाचा पती एनआरआय गौरव सक्सेनाने स्वतःचं युट्यूब चॅनेल सुरू केलं आहे. ‘गौरव की कहानी’ असं युट्यूब चॅनेलचं नाव असून यावर अनेक व्हिडीओ शेअर करत आहे. या व्हिडीओमधून गौरवने ‘व्हायरल भाभी’वर अनेक गंभीर आरोप केले आहेत. सुरुवातीला गौरवने दावा केला आहे की, हेमा त्याला मुलाला भेटू देत आहे. याआधीही हेमाचं लग्न झालं होतं. त्यापासून तिला एक मुलगा आहे. त्या मुलाला देखील पहिला पतीला भेटू देत नाही. आता तसंच काहीस माझ्याबरोबर झालं आहे. हेमा मला माझ्या मुलापासून दूर करत आहे. शिवाय ती मुलांवर चांगले संस्कार करत नाहीये.

हेही वाचा- Bigg Boss 18: दोन वेळा घटस्फोट झालेल्या करणवीर मेहरावर ‘या’ अभिनेत्रीचा जीव जडला, सलमान खानला म्हणाली…

पुढे गौरवने सांगितलं की, हेमाने अडीच कोटींच्या २ BHK फ्लॅटच्या बदल्यात दोन वर्षांच्या मुलाला भेटण्याची परवानगी दिली आहे. पण, आधीपासून मी प्रत्येक महिन्याला तिला खूप पैसे देत आहे. यामध्ये सध्याच्या घराच्या भाड्याचा देखील समावेश आहे. त्यामुळे मी एवढा महागडा फ्लॅट खरेदी करू शकत नाही. परवडणाऱ्या भागात घर देण्याची मी ऑफर दिली होती. पण, हेमाने ती सुद्धा ऑफर नाकारली. मी हेमावर मार्च २०२४ पर्यंत दरमहा ३ ते ४ लाख खर्च करत होतो. त्यानंतर एप्रिल २०२४ पासून दरमहा १ लाख रुपये देत होतो. कारण एप्रिल महिन्याच्या मध्येच दोघं विभक्त झालो. पण, आजपर्यंत मी हेमा राहत असलेल्या घराचं भाडं देत आहे.

हेही वाचा – Video: अभिनेता शशांक केतकरने पुन्हा अस्वच्छतेबाबत उठवला आवाज; म्हणाला, “बघू निर्लज्ज कोण आहे”

त्यानंतर गौरवने एक घटना सांगितली. तो म्हणाला, जेव्हा मी माझ्या मुलाच्या वाढदिवसानिमित्ताने युगांडाहून भारतात आलो होतो. तेव्हा हेमाने मला मुलाला पाहण्यासाठी पण नकार दिला. यावेळी एका डिलीव्हरी बॉयला हेमाला भेटवस्तू देण्यासाठी बोलावलं.

हेही वाचा – कन्नड सुपरस्टार किच्चा सुदीपच्या आईचं निधन, वयाच्या ८६व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

दरम्यान, गौरवने दिलेल्या माहितीनुसार, हेमाने त्याच्याविरोधात घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली आहे. तसंच हेमा न सांगता ‘बिग बॉस’मध्ये मुलांना सोडून गेली आहे. ती सहानुभूती मिळवण्यासाठी गेली आहे, असं गौरव म्हणाला.