Bigg Boss 18 : ‘बिग बॉस’च्या १८व्या सध्या प्रचंड गोंधळ सुरू आहे. पुरेस रेशन मिळत नसल्यामुळे घरातील सदस्य संतापलेले पाहायला मिळत आहेत. अशातच ‘बिग बॉस’ने घरातील सदस्यांना एक पर्याय दिला. रेशन पाहिजे असेल तर पाच नॉमिनेट असलेल्या सदस्यांपैकी दोन जणांना जेलमध्ये टाकावं लागेल किंवा एकाला घराबाहेर काढावं लागेल. या प्रक्रियेदरम्यान घरात राडाच झाला. यावेळी अविनाशने माइंड कोच अरफीन खान आणि अभिनेता करण मेहराच्या प्रोफेशनविषयी भाष्य केलं. एवढंच नव्हे तर अविनाश चुमवर देखील धावून गेला. त्यामुळे घरातील १० सदस्यांनी आपल्या बहुमताने अविनाशला घराबाहेर काढण्याचा निर्णय घेतला. तो घराबाहेर गेला. पण, १७ ऑक्टोबरच्या भागात एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अविनाश मिश्रा ‘बिग बॉस’च्या घराबाहेर नाही तर जेलमध्ये गेला. महत्त्वाचं म्हणजे त्याला रेशन वाटपाचा अधिकार दिला. पण, अविनाश बदला घेण्याच्या हेतूने परत आल्यामुळे त्याने आपल्या गटात असलेल्या सदस्यांव्यतिरिक्त कोणालाही रेशन न देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कॅप्टन असलेल्या अरफीन खानने घरात जेवणचं बनणार नाही, असं ठरवलं. तसंच किचनमधील ड्युटीची माणसंदेखील बदलली. यादरम्यान अरफीनच्या प्रोफेशनविषयी अविनाशने भाष्य केल्यामुळे पत्नी सारा खान भावुक झाली. सारा सतत स्वतःला मारताना दिसली. तसंच यावेळी तिने भावुक होतं, एक खासगी गोष्ट सांगितली.

हेही वाचा – “बिग बॉस मराठीला तू कलंक होतास”, घनःश्याम दरवडेचा ‘तो’ व्हिडीओ पाहून अभिनेत्रीची प्रतिक्रिया; म्हणाली…

सारा म्हणाली की, आम्ही असं एक काम करतो, जे लोकांच्या आयुष्यातील योगदान आहे. यामुळे आम्हाला स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यात वेळ देता येत नाही. जेव्हा मला मुलं झाली तेव्हा अरफीनला लंडनहून भारतात यावं लागलं. कारण त्याचं सेमिनार होतं आणि ५००० हजार लोकांना त्याला हिंमत द्यायची होती. त्यामुळे आमचा तो क्षण जगायचा राहिला. लग्नाच्या १० वर्षांनंतर, दोन वेळा गर्भपात झाल्यानंतर आम्हाला जुळी मुलं झाली होती. पण मी अरफीनला जा म्हटलं. कारण लोक तुझ्यासाठी थांबली आहेत. मुलांचा जन्म हे त्याच्यासाठी स्वप्न होतं. आणि हे लोक प्रोफेशनवरून टार्गेट करतात. ‘बिग बॉस’देखील यावरून बोलतात. आमचं चुकलं, आम्ही अपयशी झालो, असं म्हणत साराने स्वतःला मारलं. साराच्या या बोलण्यावरून अरफीनला अश्रू अनावर झाले.

हेही वाचा – Video: लग्नानंतरचा राधिका मर्चंटचा पहिला वाढदिवस! अँटिलियामध्ये झालं जंगी सेलिब्रेशन, मात्र आकाश अंबानीने केक खाण्यास दिला नकार

दरम्यान, ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वात अरफीन खान आणि सारा अरफीन खान हे एकच कपल आहे. हे दोघं अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींसह दिग्गज मंडळींचे लाइफ कोच आहेत. ‘बिग बॉस १८’मध्ये येण्याआधी हृतिक रोशनने स्वतः अरफीन आणि साराची ओळख करून दिली होती. दोघं हृतिक रोशनचे खूप चांगले मित्र आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss 18 hrithik roshan life coach sara arfeen khan opens up about giving birth to her twins after two miscarriages pps