Bigg Boss 18: ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा महाअंतिम सोहळा १९ जानेवारी होणार आहे. अवघे ११ दिवस बाकी राहिले आहेत. त्यामुळे सध्या कोण विजयी होणार? याची चर्चा सुरू आहे. अशातच दुसऱ्या बाजूला चाहत पांडेच्या नातेसंबंधाबाबत चर्चांना उधाण आलं आहे. काही दिवसांपूर्वी चाहत पांडेच्या आईने ‘बिग बॉस’च्या निर्मात्यांना खुलं आव्हान दिलं होतं. चाहतच्या बॉयफ्रेंडचं नाव आणि फोटो दाखवल्यास २१ लाखांचं बक्षीस देईल, अशी तिची आई म्हणाली होती. त्यानंतर एका अभिनेत्याने चाहतच्या बॉयफ्रेंडबद्दल खुलासा केला आहे.
नेमकं काय घडलं होतं?
काही दिवसांपूर्वी ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा ‘फॅमिली वीक’ झाला होता. यावेळी चाहत पांडेच्या आईची अविनाश मिश्राला ‘स्त्रीलंपट’ म्हणाली होती. तसंच तिच्या आईने दावा केला होता की, चाहतने कोणाला डेट केलं नाही आणि ती कोणाला डेट करणारही नाही. माझ्या इच्छेनुसार ती लग्न करेल. यावरून गेल्या वीकेंडच्या वारला सलमान खानने एक फोटो दाखवत चाहतबाबत खुलासा केला. या फोटोमध्ये तिच्याबरोबर एक केक होता. ज्यावर लिहिलं होतं, ‘नात्याला ५ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने शुभेच्छा…माझं प्रेम.’ याशिवाय सलमानने चाहत एका गुजराती मुलाला डेट करत असल्याची हिंट दिली. तेव्हापासून चाहत पांडे नातेसंबंधामुळे खूप चर्चेत आली.
त्यानंतर चाहतची आई एका मुलाखतीमध्ये म्हणाली की, चाहतने एका सहकलाकाराच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने केक ऑर्डर केला होता. एका पडद्यामागे ८० लोक काम करत असतात. यावेळी प्रत्येकाचा वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस साजरा केला जातो. त्यामुळे चाहतने इतर कोणासाठी तो केक ऑर्डर केला होता. जर ‘बिग बॉस’ने चाहतच्या बॉयफ्रेंडचा फोटो आणि नाव शोधून काढलं तर मी २१ लाखांचं बक्षीस देईल.
चाहतच्या आईच्या या घोषणेनंतर अभिनेता कमाल खानने एक फोटो शेअर करत चाहतचा बॉयफ्रेंड असल्याचा खुलासा केला आहे. फोटो शेअर करत कमाल खान म्हणाला की, चाहत पांडेच्या आईने ‘बिग बॉस’ला चाहता बॉयफ्रेंड शोधण्याचं आव्हान दिलं आहे. मी फक्त ‘बिग बॉस’ची मदत करत आहे. या फोटोत चाहत एका अभिनेत्याबरोबर पाहायला मिळत आहे. मानस शहा असं या अभिनेत्याचं नाव आहे.
हेही वाचा – लग्नाआधी अंकिता वालावलकर भेटली योगिता चव्हाणला; फोटो पाहून ‘डीपी दादा’ची प्रतिक्रिया, म्हणाला, “पचणार नाही…”
Since #ChahatPandey mother challenges @ColorsTV @BiggBoss to find out Chahat’s boyfriend, so I am helping them.? pic.twitter.com/a2zwimQBDM
— KRK (@kamaalrkhan) January 6, 2025
दरम्यान, सध्या ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा १४ आठवडा सुरू आहे. या आठवड्यात तीन सदस्य नॉमिनेट झाले आहेत. रजत दलाल, श्रुतिका अर्जुन आणि चाहत पांडे यांच्यावर घराबाहेर जाण्यासाठी टांगती तलवार आहे. त्यामुळे आता या तीन जणांपैकी कोण अंतिम आठवडा सुरू होण्याआधी एविक्ट होतंय? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.