Bigg Boss 18: ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा महाअंतिम सोहळा १९ जानेवारीला होणार आहे. त्यामुळे नुकतंच ‘मिड वीक एविक्शन’ झालं असून श्रुतिका अर्जुन बेघर झाली आहे. त्यामुळे आता वीकेंडच्या वारला रजत दलाल आणि चाहत पांडेमधून कोण एविक्ट होतंय? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. सध्या दुसऱ्या बाजूला विवियन डिसेना खूप चर्चेत आहे. त्याचा खेळाबद्दल बोललं जात आहे.
काही दिवसांपूर्वी विवियन डिसेनाची कानउघडणी करण्यासाठी काम्या पंजाबी ‘बिग बॉस’च्या घरात आली होती. तेव्हा काम्या विवियनला म्हणाली की, तू काय केलंस? इतके वर्ष तुला ‘बिग बॉस’मध्ये बोलावलंत होते. आला नाहीस. मग यावर्षी का आलास? विवियन फुस्स..थंडा…मी तुझा खेळ पाहून खूप निराज आहे. आता असं वाटलं, नूरन आली आणि डॅमेज कंट्रोल केलं. जर विवियन अविनाशचं ऐकलं नसतं तर क्रॉन्ट्रोब्युशन चांगलं असतं.
त्यानंतर आता काम्या पंजाबीने विवियनच्या अध्यात्माबाबत भाष्य केलं आहे. नुकतंच तिने ‘टेली मसाला’ या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. यावेळी तिला विचारलं की, विवियनच्या नमाज पठणाविषयी सध्या बोललं जात आहे. तो ‘बिग बॉस’च्या घरात नमाज पठण करतो. विवियन खूपच आध्यात्मिक व्यक्ती आहे. ‘शक्ती’ मालिकेच्या सेटवर पण असाच होता का? यावर काम्या म्हणाली, “हो, तो नेहमी पूजा-अर्चा, पंडित या सगळ्या गोष्टींवर खूप विश्वास ठेवायचा. त्याचा महाकालवर खूप विश्वास होता. धार्मिक गोष्टींवर त्याचा नेहमीच अधिक विश्वास असतो. ठिक आहे. माणूस बदलतो. त्याने नंतर धर्म बदलला.”
हेही वाचा – Bigg Boss 18: महाअंतिम सोहळ्याच्या १० दिवसांआधी झालं ‘मिड वीक एविक्शन’, कमी मतांमुळे ‘हा’ सदस्य घराबाहेर
“मी पण प्रत्येक धर्माचा आदर करते. मला याबाबत काहीही वाटतं नाही. ईदमध्ये इफ्तार पण करतो, दिवाळीही साजरी करतो. ईदची पार्टीपण करते. पण स्वतः एक-दोन वेगळा रोजा ठेवला आहे. मी मनापासून प्रत्येक धर्माचा आदर करते. पण, विवियन खूप महाकालला मानायचा,” असं काम्या म्हणाली.
पुढे काम्या पंजाबीला विचारलं की, नूरनमुळे विवियने धर्मांतर केल्याचं म्हटलं जात आहे…तुला काय वाटतं? याबाबत काम्या म्हणाली की, ही त्यांची वैयक्तिक गोष्ट आहे. मी काहीही बोलू शकत नाही. तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे.
© IE Online Media Services (P) Ltd