Bigg Boss 18: छोट्या पडद्यावरील वादग्रस्त रिअॅलिटी शो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘बिग बॉस’चं यंदा १८वं पर्व सुरू आहे. ६ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा आता सहावा आठवडा आहे. नुकतीच सहाव्या आठवड्यातील नॉमिनेशन प्रक्रिया पार पडली. नेहमी प्रमाणे याही नॉमिनेशन प्रक्रियेत वाद पाहायला मिळाले. एकूण सात सदस्य घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले आहेत.
सहाव्या आठवड्यात झालेल्या नॉमिनेशन प्रक्रियेसाठी ‘बिग बॉस’च्या घरात एक गाव उभं केलं होतं. ज्या गावात दोन घरं होती. त्या दोन घरातील सदस्यांनी प्रत्येकी दोन सदस्यांना नॉमिनेट करायचं होतं. यावेळी विवियन डिसेना पोस्टमन होता. या पोस्टमनला फोन करून सदस्याला नॉमिनेट करणाऱ्या दोन सदस्याची नावं सांगायची होती. त्यानंतर विवियनला नॉमिनेट केलेल्या सदस्यांची नावं पत्रात लिहायची होती. पण, त्याच्याकडे एक महत्त्वाचा अधिकार होता. त्याला कोणत्याही सदस्यांचं पत्र फोडून त्यांनी केलेले नॉमिनेशन बाद करायचं होतं.
हेही वाचा – Video: प्रवीण तरडेंसाठी कुशल बद्रिकेने लिहिलेल्या कविता ऐकून विजू माने वैतागले, म्हणाले…
विवियनने करणवीर मेहरा, रजत दलाल, दिग्विजय सिंह राठी यांनी केलेलं नॉमिनेशन रद्द केलं. एकूण सात सदस्यांवर आता घराबाहेर जाण्यासाठी टांगती तलवार आहे. करणवीर मेहरा, चुम दरांग, श्रुतिका अर्जुन, कशिश कपूर, रजत दलाल, दिग्विजय राठी, तजिंदर सिंह बग्गा या सात सदस्यांमधून कोण एविक्ट होतंय? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
हेही वाचा – “तुमचं वजन किती?” विचारणाऱ्या चाहत्याला ऐश्वर्या नारकरांनी दिलं भन्नाट उत्तर, म्हणाल्या…
दरम्यान, गेल्या पाचव्या आठवड्यात ‘बिग बॉस १८’च्या घरातून अरफीन खान एविक्ट झाला. हृतिक रोशनसह अनेक सेलिब्रिटींचा लाइफ कोच असलेला अरफीन कमी मतांमुळे घराबाहेर झाला. यावेळी त्याची पत्नी सारा खानने रडून गोंधळ घातला होता. आतापर्यंत ‘बिग बॉस १८’च्या घरातून गुणरत्न सदावर्ते, हेमा शर्मा, मुस्कान बामने, नायरा बनर्जी, शहजादा धामी हे पाच सदस्य एलिमिनेट झाले आहेत.