Bigg Boss 18: ‘बिग बॉस’चं १८वं पर्व दिवसेंदिवस रंगदार होतं चाललं आहे. करणवीर मेहरा सध्या टार्गेट लिस्टमध्ये टॉप असल्याचं दिसत आहे. नुकत्याच झालेल्या ‘टाइम गॉड’च्या टास्कमध्ये श्रुतिका अर्जुनने करणवीरला दोन मुलींच्या खांद्यावर हात ठेवून आणि मागे लपून खेळ खेळत असल्याचं म्हणाली. यावेळी करणवीरने श्रुतिकाला तजिंदर बग्गासंदर्भात टोमणा मारला. जे घरातील लोकांना आक्षेपार्ह वाटलं. त्यामुळे ४ डिसेंबरच्या भागात यावरून हंगामा झाल्याचं पाहायला मिळालं. आता यावर सलमान खान काय बाजू मांडणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. अशातच करणवीरचा एक प्रोमो समोर आला आहे. ज्यामध्ये पहिल्यांदाच करणवीर मेहरा पूर्वाश्रमीच्या दोन पत्नीविषयी बोलताना दिसला आहे.
सध्या ‘बिग बॉस’च्या घरात काही खास पाहुणे येऊन सदस्यांशी संवाद साधताना पाहायला मिळत आहेत. ४ डिसेंबरच्या भागात प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माता, लेखक अनुराग कश्यपने शिल्पा शिरोडकर, विवियन डिसेना, चुम दरांग, श्रुतिका अर्जुन यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर आता ‘लल्लनटॉप’ या वृत्तसंस्थेचे पत्रकार सौरभ द्विवेदी यांनी घरातील सदस्यांशी संवाद साधला. करणवीर मेहराशी संवाद साधताना त्यांनी अनेक गंभीर प्रश्न विचारले.
सौरभ द्विवेदी म्हणाले, “माझ्याबरोबर आयुष्यात बऱ्याच अयोग्य गोष्टी झाल्या आहेत.” तेव्हा करण म्हणतो, “२१ वर्ष इथंपर्यंत पोहोचण्यासाठी खूप वेळ लागला आहे.” त्यानंतर सौरभ म्हणतात, “तुझं नातं जास्त काळ टिकलं नाही. त्यामुळे तुला टॉक्सिक बोललं जातं.” यावर करण म्हणाला की, मला याची वेदना होते की, दोघींच्या आयुष्यात मी नसतो तर खूप बरं झालं असतं. तेव्हा सौरभ विचारतात, “तू पूर्वाश्रमीच्या पत्नींबद्दल बोलतोय का?” करण म्हणतो, “हो”
त्यानंतर सौरभ पुढे करणला विचारतात की, व्यसनाधीन होऊन शांती शोधत होतास? करण म्हणाला, “एक काळ असा होता की मी व्यसनाधीन झालो होतो. एक ते दीड वर्ष तरी यात होतो. मी काही करत नव्हतो. फक्त दारू पिऊन घरात राहायचो.” यावेळी करण भावुक होताना दिसत आहे.
हेही वाचा – Bigg Boss 18: “तुला लाज वाटली पाहिजे”, रजत दलालची शिल्पा शिरोडकरवर टीका; म्हणाला, “तुझ्यात ताकद असेल तर…”
दरम्यान, करणवीर मेहरानंतर सौरभ द्विवेदी रजत दलाल, ईशा सिंह आणि चाहत पांडेशी संवाद साधला. याचे प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.