Bigg Boss 18 : ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वात रेशनवरील वाद थांबायचं काही नावाच घेत नाहीये. सतत रेशनवरून कोणत्या ना कोणत्या सदस्यांमध्ये वाद होतं आहेत. अविनाश मिश्रा जेलमध्ये गेल्यापासून त्याच्याकडे रेशन वाटपाचे अधिकार आहेत. तेव्हापासून रेशनवरील वाद आणखीनच वाढले आहेत. अशातच रेशनसाठी नवा टास्क होणार आहे. ज्यामध्ये करणवीर मेहराने घेतलेल्या भूमिकेचं सध्या नेटकऱ्यांकडून खूप कौतुक होतं आहे.
‘कलर्स टीव्ही’च्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर रेशनसाठी खेळलेला टास्कचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये ‘बिग बॉस’ म्हणतात की, आज अरफीन आणि अविनाश कोणत्या सदस्याला किती रेशन मिळेल हे निश्चित करणार आहेत. पण रेशनसाठी सदस्याला वैयक्तिक वस्तू पणाला लावायला लागणार आहे. तेव्हा ईशा सिंह आईने घेतलेली वस्तू पणाला लावते. मात्र, करणवीर मेहरा वेगळाच मार्ग अवलंबतो.
करणवीर मेहरा म्हणतो, “उपाशी राहीन. चोरी करून खाईन. पण मी माझ्या पायाचं नखदेखील या (अविनाश मिश्रा) अहंकारी माणसासाठी देणार नाही.” करणच्या याच ठाम भूमिकेचं नेटकरी कौतुक करत आहेत. “करणवीर खरंच खूप छान खेळतोय”, “करणवीरने बरोबर केलं”, “जबरदस्त करणवीर”, “करणवीर खरा लीडर आहे”, “सगळ्या सदस्यांमध्ये करणवीर सर्वोत्कृष्ट सदस्य आहे”, “हा खरा खेळाडू आहे”, “करणवीर एक नंबर बोलला”, अशा नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
हेही वाचा – Video: सुव्रत जोशीने आणली ‘सवलत माझी लाडकी योजना’, नेमकी काय आहे? जाणून घ्या…
हेही वाचा – Video: खुशबू तावडेच्या लेकीचा नामकरण सोहळा घरीच साध्या पद्धतीने पडला पार, तितीक्षाने व्हिडीओ केला शेअर
दरम्यान, गेल्या आठवड्यापासून करणवीर मेहरा आणि अविनाश मिश्रामध्ये वाद सुरू आहे. अविनाशने करणवीरच्या प्रोफेशनवर भाष्य केलं होतं. ज्यानंतर खूप वाद झाला होता. अविनाशकडे रेशन वाटपाचा अधिकार आल्यानंतर त्याचं मत होतं की, करणवीरने स्वतःहून त्याच्याबरोबर बसून वादावर चर्चा केली पाहिजे. पण करणवीर ऐकतंच नव्हता. त्यामुळे अविनाशने रेशन देणं थांबवलं होतं. काही तासांनंतर करणवीर अविनाशकडे गेला आणि सर्वांसमोर त्याने बहिणीवरून केलेल्या वक्तव्याबाबत माफी मागितली. त्यानंतर अविनाशने मोजकं रेशन द्यायला सुरुवात केली. पण तेव्हापासून दोघांमधील वाद कायम आहेत.