‘बिग बॉस १८’ चा विजेता करण वीर मेहरा सध्या खूप चर्चेत आहे. सलग दोन रिॲलिटी शो जिंकणाऱ्या करण वीर मेहराच्या वैयक्तिक आयुष्याची खूप चर्चा होते. करणने दोन वेळा लग्न केले, पण दोन्ही वेळा त्याचा घटस्फोट झाला. आता त्याच्या दुसऱ्या बायकोने दुसरं लग्न केलं आहे. करणची दुसरी पत्नी निधी सेठ हिने लग्न केलं आहे. निधीने तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

करण वीर मेहरापासून घटस्फोट घेतल्यानंतर निधी सेठ तिच्या आयुष्यात पुढे गेली आहे. ती पुन्हा एकदा प्रेमात पडली आणि आता तिने लग्न केले आहे. निधीने अगदी साधेपणाने लग्न केलंं आहे. निधीचे लग्न बंगळुरू येथे मंदिरात झाले. निधीच्या पतीचे नाव संदीप कुमार आहे. निधीचा लग्नाचा लूक खूपच साधा होता. तिने गुलाबी रंगाची बनारसी साडी नेसली आणि सोन्याच्या दागिन्यांसह तिचा लूक पूर्ण केला आहे. तर, निधीच्या पतीने निळ्या रंगाचा फ्लोरल कुर्ता पायजमा घातला आहे.

https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/01/Nidhi-seth-second-marriage.mp4
निधी सेठने शेअर केलेला फोटो (सौजन्य – इन्स्टाग्राम)

फोटो शेअर करत निधीने लिहिलं, “प्रेम हा संघर्ष नसून एक सुंदर प्रवास आहे, हे तू मला सांगितलं. आपल्या वैवाहिक जीवनात ‘मी’ पेक्षा ‘आम्ही’ला जास्त महत्त्व आहे. आपलं नातं दिवसेंदिवस जास्त मजबूत होईल, असा मला विश्वास आहे. मागील दोन वर्षांपासून तू माझ्या प्रत्येक आनंदात आणि आव्हानात माझ्याबरोबर उभा राहिलास. तुझा पाठिंबा, दयाळूपणा आणि आमच्यातील सुंदर नात्याबद्दल मी कृतज्ञ आहे. माझा आधार बनल्याबद्दल, मला “होय” बोलल्याबद्दल आणि माझे जीवन प्रेमाने भरल्याबद्दल धन्यवाद. आय लव्ह यू एस.के.”

पाहा पोस्ट-

करण वीर मेहरा आणि निधी सेठ यांची पहिली भेट २००८ मध्ये एका जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान झाली होती. यानंतर त्यांची दुसरी भेट जीममध्ये झाली आणि ते एकमेकांशी बोलू लागले. नंतर एकत्र काम करत असताना निधी आणि करणवीर प्रेमात पडले आणि नंतर दोघांनी लग्न केले. रिपोर्ट्सनुसार, करण वीर मेहराचे हे दुसरे लग्न होते. त्याने २००९ मध्ये त्याची बालपणीची मैत्रीण देविकाशी लग्न केले होते, पण काही वर्षांनी त्यांचा घटस्फोट झाला होता. नंतर त्याने निधीशी लग्न केलं, पण तेही नातं टिकलं नाही आणि दोघे विभक्त झाले. आता निधीने संदीपशी दुसरं लग्न केलं आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss 18 karan veer mehra second wife nidhi seth got married in temple see photos hrc