Bigg Boss 18: ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वात सातत्याने नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहे. टीआरपी वाढवण्यासाठी निर्मात्यांकडून सतत काहींना काहीतरी केलं जात आहे. १६ दिवसांपूर्वी दिवाळीच्या मुहूर्तावर दोन वाइल्ड कार्ड सदस्यांनी एन्ट्री झाली. त्यानंतर आता एक-दोन नव्हे तर आणखी तीन वाइल्ड कार्ड सदस्यांनी एन्ट्री झाली आहे. अदिती मिस्त्री, एडिन राज, यामिनी मल्होत्रा या तिघीजणी वाइल्ड कार्ड म्हणून ‘बिग बॉस १८’मध्ये सहभागी झाल्या आहेत. याआधी ‘बिग बॉस’च्या सातव्या आठवड्यातील नॉमिनेशन टास्क पार पडला. यामध्ये नेमकं काय घडलं? कोण सात सदस्य घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले? जाणून घ्या…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेहमीप्रमाणे नॉमिनेशनची दोर टाइम गॉडच्या हाती होती. या आठवड्याचा टाइम गॉड रजत दलाल आहे, त्यामुळे नॉमिनेशनची महत्त्वाची दोर त्याच्या हाती गेली. ‘बिग बॉस’ने अनेक पदार्थ घरामध्ये पाठवले होते. त्या पदार्थांपैकी जितके पदार्थ रजत दलालला भरवले जातील, तितके सदस्य नॉमिनेट करण्याची संधी होती. एक पदार्थ भरवला तर एक नॉमिनेट आणि पाच पदार्थ भरवले तर पाच जणांना नॉमिनेट करण्याचा अधिकार सदस्यांना होता. पण किती पदार्थ खायायचे हे रजत दलालच ठरवणार होता.

हेही वाचा – Bigg Boss 18: “हे काय चाललंय?” सलमान खानच्या शोमधील तीन हॉट वाइल्ड कार्डची एन्ट्री पाहून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया, पाहा प्रोमो

रजतने चाहत पांडे, शिल्पा शिरोडकर, अविनाश मिश्रा, सारा अरफीन खान आणि ईशा सिंह यांना पाच सदस्यांना नॉमिनेट करण्याचा अधिकार दिला. तर इतरांना दोन आणि तीन सदस्यांना नॉमिनेट करण्याचा अधिक दिला. यामधील विवियन डिसेनाकडून रजतने नॉमिनेट करण्याचा अधिकार हिसकावून घेतला. त्याच्या हातून कोणताही पदार्थ न खाण्याची इच्छा रजतने व्यक्त केली.

हेही वाचा – “एका काकूंनी त्यांच्या मुलीची ओळख करून दिली अन्…”; ‘आई कुठे काय करते’ फेम अभिषेक देशमुखने सांगितला किस्सा, म्हणाला, “हा यश…”

सातव्या आठवड्यात घराबाहेर जाण्यासाठी एकूण सात सदस्य नॉमिनेट झाले आहेत. करणवीर मेहरा, विवियन डिसेना, दिग्विजय राठी, अविनाश मिश्रा, चाहत पांडे, कशिश कपूर आणि एलिस कौशिक हे सात सदस्य नॉमिनेट झाले आहेत. या सात सदस्यांमधून एकजण घराबाहेर जाणार आहे.

हेही वाचा – Video: “माणसं माझ्या पाया पडतात आणि म्हणतात…”, अप्पांनी सांगितलं ‘आई कुठे काय करते’ मालिकेमुळे त्यांना काय मिळालं?

दरम्यान, गेल्या आठवड्यात कोणताही सदस्य घराबाहेर झाला नाही. त्यामुळे या आठवड्यात दोन सदस्य एविक्ट होतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. आतापर्यंत गुणरत्न सदावर्ते, हेमा शर्मा, मुस्कान बामने, नायरा बॅनर्जी, शहजादा धामी, अरफीन खान हे सदस्य घराबाहेर झाले आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss 18 karan veer mehra vivian dsena avinash mishra chahat pandey digvijay rathee kashish kapoor nominated pps