Bigg Boss 18: ‘बिग बॉस’च्या खेळात घराबाहेर जाण्यासाठी होणारा नॉमिनेशन टास्क खूप महत्त्वाचा असतो. दर आठवड्याला हा नॉमिनेशन टास्क पार पडतो. सध्या ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा नववा आठवडा सुरू आहे. या नवव्या आठवड्यातील नॉमिनेशन टास्क नुकताच पार पडला. या नॉमिनेशन टास्कमध्ये नेहमीप्रमाणे वाद झाले. एडिन रोजने करणवीर मेहराला शिवीगाळ केली. असा बराच ड्रामा नुकत्याच झालेल्या नॉमिनेशन टास्कमध्ये पाहायला मिळाला.

नेहमी प्रमाणे नॉमिनेशन टास्कमध्ये ‘टाइम गॉड’ला विशेष अधिकार देण्यात आला. नवव्या आठवड्यात ईशा सिंह ‘टाइम गॉड’ आहे. त्यामुळे तिला घराबाहेर जाण्याच्या नॉमिनेशन टास्कमधून तीन जणांना सुरक्षित करण्याचा अधिकार दिला. ईशाने आपल्या जवळच्या मित्रांना सुरक्षित केलं. पण, यावेळी तिने शिल्पा शिरोडकरचा विश्वासघात केला.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

हेही वाचा – Video: आळंदीचा चैतन्य देवढे गाजवतोय ‘इंडियन आयडल’चं १५वं पर्व, नाना पाटेकरांनी त्याची ‘ही’ कृती पाहून जोडले हात, पाहा व्हिडीओ

शिल्पा शिरोडकर जेवढी करणवीर मेहराच्या ग्रुपबरोबर असते. तेवढीच ती विवियनच्या ग्रुपबरोबरही असते. तिचे ईशाबरोबर चांगले संबंध आहेत. त्यामुळे नॉमिनेशनमध्ये ईशा शिल्पाला सुरक्षित करेल अशी सर्वांना आशा होती. पण, ईशाने ते चित्र पटवलं. तिने शिल्पाला नॉमिनेशनपासून सुरक्षित केलं नाही. विवियन डिसेना, अविनाश मिश्रा आणि यामिनी मल्होत्रा या तिघांना ईशाने नॉमिनेशन टास्कमध्ये सुरक्षित केलं.

हेही वाचा – Video: “कसे आहात पुणेकर?” दिलजीत दोसांझने कॉन्सर्टमध्ये मराठीत साधला संवाद, म्हणाला, “मुलगी शिकली…”

नॉमिनेशन टास्कमध्ये करणवीर मेहराला अधिक टार्गेट केलं गेलं. रजत दलालने करणवीर मतभेद करत असल्याचा आरोप केला. तर अविनाशने खोटं व्यक्तिमत्त्व, व्हिक्टिम कार्ड खेळत असल्याचा करणवर आरोप केला. एवढंच नव्हे तर विवियन देखील यात सामील होता. यावेळी एडिन रोजने करणवर शिवीगाळ केली. शिल्पा शिरोडकरने त्याला धोका दिला, जे त्याच्या इतर कोणत्या मित्राने केलं नाही, असं एडिनने म्हटल्यामुळे करणवीरचा पारा चढला. दोघांमध्ये भांडणं झाली. तेव्हा एडिनने करणला शिव्या दिल्या, असा संपूर्ण ड्रामा नॉमिनेशन टास्कमध्ये पाहायला मिळाला.

हेही वाचा – Video: “ही माझी साथी, सवंगडी…”, सई ताम्हणकरने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवरील लाडक्या व्यक्तीबद्दल केला खुलासा

नवव्या आठवड्यात घराबाहेर जाण्यासाठी सहा सदस्य नॉमिनेट झाले आहेत. चुम दरांग, दिग्विजय राठी, सारा अरफीन खान, कशिश कपूर, शिल्पा शिरोडकर आणि करणवीर मेहरा या सहा जणांवर घराबाहेर जाण्याची टांगती तलवार आहे. गेल्या आठवड्यात दोन सदस्य घराबाहेर जाणारं असल्याचं ‘बिग बॉस’ने जाहीर केलं होतं. पण तसं झालं नाही. फक्त वाइल्ड कार्ड सदस्य म्हणून सहभागी झालेली अदिती मिस्त्री बेघर झाली. त्यामुळे आता नवव्या आठवड्यात सहा जणांपैकी कोण घराबाहेर होणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

दरम्यान, आतापर्यंत ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वातून अदिती मिस्त्रीसह आठ सदस्य बेघर झाले आहेत. अदितीच्या आधी एलिस कौशिक, गुणरत्न सदावर्ते, हेमा शर्मा, मुस्कान बामने, नायरा बॅनर्जी, शहजादा धामी, अरफीन खान हे सदस्य घराबाहेर झाले होते.