Bigg Boss 18: ‘बिग बॉस’च्या १८ पर्वात सध्या फॅमिली वीक सुरू आहे. त्यामुळे बरेच भावनिक क्षण पाहायला मिळत आहे. १ आणि २ जानेवारीला विवियन डिसेना, चाहत पांडे, अविनाश मिश्रा, ईशा सिंह, शिल्पा शिरोडकर या सदस्यांच्या कुटुंबातील मंडळी आले होते. यावेळी कुटुंबातील मंडळींनी प्रत्येक सदस्याला सल्ला दिला. तर काहींनी नाराजी व्यक्त केली.

३ जानेवारीच्या भागात उर्वरित सदस्यांच्या कुटुंबातील मंडळींनी घरात एन्ट्री घेतली. चुम दरांग, रजत दलाल, करणवीर मेहरा, कशिश कपूर आणि श्रुतिका अर्जुन या सदस्यांच्या कुटुंबातील मंडळी ‘बिग बॉस’च्या घरात आले. यावेळी रजत दलाल आपल्याला आईला पाहून भावुक झाला, तर श्रुतिकाने थेट पती अर्जुनच्या अंगावर उडी घेतल्याचं पाहायला मिळालं. यादरम्यान, रजतच्या आईने चुम आणि करणवीरसमोर आपलं स्पष्ट मत मांडलं. मेडल आणि घडलेल्या घटनांवरून चुम आणि करणवीरने रजतवर टीका केली होती. त्यावरून रजतच्या आईने नाराजी व्यक्त केली. पण, चुम आणि करणवीरने रजतच्या आईची माफी मागितली. हसत-खेळत होत असलेल्या फॅमिली वीकमध्ये एविक्शन झाल्याचं समोर आलं आहे.

Raj Thackeray should come to Sangamner to see why Balasaheb Thorat was defeated says MLA Amol Khatal
माजी मंत्री थोरात यांचा पराभव का झाला ते पाहण्यासाठी राज ठाकरेंनी संगमनेरात यावे – आमदार अमोल खताळ
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Colors Marathi Bigg Boss Marathi season 5 will be re-broadcasted
Bigg Boss Marathi 5: पुन्हा एकदा तोच राडा अन् ‘भाऊचा धक्का’ पाहायला मिळणार; तारीख, वेळ जाणून घ्या…
Bigg Boss marathi Ankita Prabhu Walawalkar invite to raj Thackeray for wedding
‘बिग बॉस मराठी’ फेम अंकिता वालावलकरने राज ठाकरेंना दिलं लग्नाचं निमंत्रण, होणाऱ्या पतीसह गेली होती ‘शिवतीर्था’वर
Image Of Devendra Fadnavis And Eknath Shinde
Devendra Fadnavis : “आता फडणवीस त्याचे उट्टे काढत आहेत”, ठाकरेंच्या खासदाराचे शिंदे-फडणवीस यांच्याबाबत खळबळजनक दावे
Bigg Boss 18 Fame Rajat Dalal talk about chahat pandey and controversy
Video: चाहत पांडेचं नाव ऐकताच रजत दलालने जोडले हात, विनंती करत म्हणाला…
Bigg Boss 18 Chum Darang Talking In Marathi Language Video Viral
Bigg Boss 18: “खूप छान…”, चुम दरांगने मराठीत साधला संवाद, विवियन डिसेनाच्या सक्सेस पार्टीबद्दल म्हणाली…
Bigg Boss 18 Vivian Dsena not invited to karan veer Mehra and Shilpa shirodkar for success party video viral
Bigg Boss 18: दोस्त दोस्त ना रहा! विवियन डिसेनाने सक्सेस पार्टीला करण-शिल्पाला दिलं नाही आमंत्रण, फोटो अन् व्हिडीओ व्हायरल

हेही वाचा – Video: पती अभिषेक बच्चन अन् लेकीबरोबर मुंबईत परतली ऐश्वर्या राय; मराठीत म्हणाली असं काही की…, पाहा व्हिडीओ

फॅमिली वीकमध्ये चुम दरांगच्या आईने रजतबाबत एक भविष्यवाणी केली होती. जी खरी ठरली आहे. चुमच्या आईने रजतला विचारलं होतं की, तुला आता घरामध्ये सर्वात जास्त जवळचं कोण वाटतं? रजत म्हणाला, नातं म्हणून बघायला गेलं तर, ईशाबरोबर जे बहिणीचं नातं आहे. त्यामुळे सध्या ती जवळची आहे. त्यानंतर चुमची आई हसत म्हणाली, “वाईट वाटून घेऊ नकोस. तुला ज्या व्यक्ती जवळच्या वाटतात, त्या व्यक्ती नॉमिनेट होऊन घराबाहेर होतात. बाहेर जे दिसतं तेच सांगतेय.” आता हे सत्यात उतरलं आहे. रजत दलालच्या जवळची व्यक्ती फॅमिली वीकमध्ये एविक्ट झाली आहे.

फॅमिली वीकमध्ये घराबाहेर झालेली व्यक्ती ईशा सिंह नसून कशिश कपूर आहे. ‘बिग बॉस तक’ या एक्स अकाउंटवरून माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे आता रजतच्या ग्रुपमध्ये असलेली एकच व्यक्ती सुरक्षित आहे, ती म्हणजे चाहत पांडे.

हेही वाचा – ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत जहागीरदारांच्या घरी येणार नवी पाहुणी; कोण आहे ती? पोस्टर पाहून नेटकऱ्यांच्या कमेंट्स

हेही वाचा – अस्सल गावरान प्रेमगीत येणार प्रेक्षकांच्या भेटीला; पुष्कर जोग आणि अभिनेत्री पूजा राठोड ‘बायडी’ गाण्यात दिसणार एकत्र, पोस्टरने वेधले लक्ष

दरम्यान, कशिश कपूरने वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वात सहभाग घेतला होता. दिग्विजय सिंह राठीबरोबर तिची एन्ट्री झाली होती. वाइल्ड कार्ड सदस्यांपैकी ती एकमेव या स्पर्धेत टिकली होती. पण, आता कशिश कपूर एविक्ट झाली आहे.

Story img Loader