Bigg Boss 18: ‘बिग बॉस’च्या घरात भांडणाशिवाय एक दिवस पार पडत नसतो. नेहमी कोणत्या ना कोणत्या सदस्याचं भांडण होतं असतं. सध्या कशिश कपूर आणि अविनाश मिश्राचं भांडण खूप चर्चेत आलं आहे. याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून नेटकरी ट्रोल करताना दिसत आहेत. पण दोघांमध्ये नेमकं काय झालं? जाणून घ्या…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

२३ डिसेंबरच्या भागात नॉमिनेशन टास्क पार पडला. त्यानंतर काही सदस्य डायनिंग टेबल जवळ बसले होते आणि अविनाश-ईशा किचनमध्ये जेवण बनवत होते. यावेळी कशिशने अविनाशवर आरोप लावला की, त्याने तिच्याबाबतीत अपमानास्पद वक्तव्य केलं आहे. हे प्रकरण तेव्हा वाढलं, जेव्हा रजतने करण, शिल्पाला सांगितलं की, अविनाश ईशा आणि कशिशबरोबर मिळून प्रेमाचं त्रिकुट बनवण्याचा प्रयत्न करत आहे.

हेही वाचा – ‘फुलाला सुगंध मातीचा’ फेम समृद्धी केळकरने कुटुंबासह ‘असा’ साजरा केला वाढदिवस, फोटो शेअर करत म्हणाली…

रजतने सांगितलं, “अविनाश कशिशला म्हणतं होता की, शोमध्ये फ्लेव्हरची कमी आहे. प्रेक्षकांना नवीन फ्लेव्हर खूप आवडेल. तो कशिशबरोबर रोमँटिक अँगल बनवू इच्छित होता.” यावेळी रजतने अविनाशवर लोकांचं लक्ष केंद्रीत करण्यासाठी स्ट्रॅटजी बनवण्याचा आरोप केला. मग हा मुद्दा रजतने अविनाशसमोर मांडला. त्यावेळी कशिश आणि अविनाशमध्ये जोरदार भांडण झालं.

कशिश म्हणाली की, अविनाश तिच्याबरोबर फ्लर्ट करत होता. यावेळी तो नवीन फ्लेव्हरविषयी म्हणाला होता. त्यानंतर कशिशने अविनाशला मुलींच्या सतत मागे लागणारा पुरुष असा टॅग दिला. यावेळी अविनाशने आपला दृष्टीकोन मांडला. त्यानंतर कशिश संतापली आणि म्हणाली, “तुला मी कानाखाली देईन. तू हृतिक रोशन नाहीयेस.” मग हे भांडण वाढत गेलं. अखेर शेवटी अविनाशने ही गोष्ट म्हटल्याचं मान्य केलं.

हेही वाचा – Bigg Boss 18: चुम दरांग झाली नवी ‘टाइम गॉड’, घरात झाला राडा; करणवीर मेहरा-रजत दलालमध्ये जोरदार भांडण

हेही वाचा – Bigg Boss 18: नॉमिनेशन टास्कमध्ये श्रुतिका अर्जुनला दिला ‘हा’ महत्त्वाचा अधिकार; विवियन डिसेना, चाहत पांडेसह सात सदस्य झाले नॉमिनेट

दरम्यान, गेल्या आठवड्यात मिड वीक एविक्शन आणि डबल एविक्शन पाहायला मिळालं. मिड वीक एविक्शनमध्ये दिग्विजय सिंह राठी घराबाहेर झाला. त्यानंतर डबल एविक्शनमध्ये एडिन रोज, यामिनी मल्होत्रा बेघर झाल्या. दिग्विजय, एडिन, यामिनी हे तिन्ही वाइल्ड कार्ड सदस्य होते. आता वाइल्ड कार्ड सदस्यांमधील एकजण म्हणजे कशिश सध्या ‘बिग बॉस’मध्ये पाहायला मिळत आहे.