Bigg Boss 18: ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा १४वा आठवडा सुरू झाला आहे. वाइल्ड कार्ड म्हणून सहभागी झालेली कशिश कपूर नुकतीच एविक्ट झाली आहे. त्यामुळे आता ‘बिग बॉस’च्या घरात एकही वाइल्ड कार्ड सदस्य राहिलेला नाही. आता टॉप-९मधून कोण-कोणते सदस्य अंतिम फेरीपर्यंत जातात? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अशातच घराबाहेर येताच कशिश कपूरने शिल्पा शिरोडकरवर टीका केली आहे.

‘जिओ सिनेमा’ने कशिश कपूरचा सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये कशिश कपूर म्हणाली, “माझ्या ऐवजी कोणी बाहेर जायला पाहिजे होतं तर ती ईशा सिंह होती. कारण माझ्या मते अविनाश व्यतिरिक्त ईशाचं काहीही योगदान नाही.” त्यानंतर दिग्विजयशी पुन्हा मैत्री होईल का? असं विचारल्यावर कशिश म्हणाली की, माझी दिग्विजयशी मैत्री होऊ शकत नाही. तुम्ही शो पाहिलाच असेल माझं मन साफ आहे. मला जिथे वाटलं माझ्याकडून चूक झाली, मी ती सुधारली. मी स्पष्टपणे सांगितलं, तुला माझ्याशी मैत्री करायची असेल तर कर, नसेल करायची तरीही सांग.

Maharashtrachi Hasya Jatra Fame Actor wedding
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये झळकलेल्या अभिनेत्याने बांधली लग्नगाठ! पत्नी सुध्दा आहे अभिनेत्री, ‘या’ लोकप्रिय मालिकेत केलंय काम
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Rohit Roy recalls surprising daughter Kiara
अमेरिकेत शिकतेय प्रसिद्ध अभिनेत्याची एकुलती एक लेक; म्हणाला, “मी २० तास प्रवास करून गेलो अन् ती…”
Akshaya Hindalkar
दीड वर्ष चालता येत नव्हतं, हातातली मालिका गेली अन्…; ‘पुन्हा कर्तव्य आहे’ फेम अभिनेत्रीचा झालेला अपघात, म्हणाली…
sai tamhankar arrange diwali pahat for loved ones
मुंबईत ४५ व्या मजल्यावर आहे सईचं आलिशान घर! लेकीच्या घरी आली लाडकी आई; ‘द इलेव्हन्थ प्लेस’मध्ये रंगली दिवाळी पहाट
R Madhavan Dubai Home Video
आर माधवनचं दुबईतील घर पाहिलंत का? मराठमोळ्या पत्नीबरोबर दिवाळीची पूजा, सरिताच्या मराठी लूकने वेधलं लक्ष
Bigg Boss 18 Vivian Dsena Is Upset With salman khan and Kamya Panjabi
Bigg Boss 18: “…तर माझ्याजागी दुसऱ्याला बोलवा”, सलमान खान-काम्या पंजाबीने सुनावल्यानंतर विवियन डिसेना नाराज; म्हणाला, “तेव्हा मी बंडखोर..”
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…

हेही वाचा – Video: ‘टाइमपास’ दिग्दर्शक रवी जाधव यांनी घेतलं नवं आलिशान घर, वास्तुशांतीचे खास क्षण शेअर करत म्हणाले, “गावातील छोट्याशा घरातून…”

पुढे ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा विजेता कोण व्हायला पाहिजे? असं विचारल्यावर कशिश म्हणाली, “हे पर्व रजत दलालने जिंकलं पाहिजे. तो खूप क्यूट आहे. कारण बाहेर त्याची दहशत आहे आणि तो खरा आहे.” नंतर कशिशने शिल्पा शिरोडकरवर टीका केली.

शिल्पा शिरोडकरबद्दल कशिश म्हणाली, “मी शिल्पाबाबतीत आधीही बोलली आहे आणि आताही बोलेने. मला हीच तोंडपण बघायचं नाही. सात दिवसांमध्ये पाच दिवसांत जो मी सीन केला. मुळात तो मी केलाच नाही. पण पाच दिवसांत मी केलं आणि ५५ दिवसांत काहीच नाही केलं. मी फुटेजची भूकेली, तर असं नाही. तू तीन महिन्यांपासून एक गोष्ट ताणत आहेस. एका आईची दोन मुलं. हे खूप बोरिंग आहे.” तसंच कशिश ईशा, अविनाश, करण आणि चाहतबद्दलही बोलली.

हेही वाचा – Bigg Boss 18: चाहत पांडेच्या आईने ‘बिग बॉस’च्या निर्मात्यांना दिलं खुलं आव्हान, २१ लाखांचं बक्षीस केलं जाहीर; का, कशासाठी? जाणून घ्या…

दरम्यान, विवियन डिसेना, करणवीर मेहरा, शिल्पा शिरोडकर, चाहत पांडे, चुम दरांग, अविनाश मिश्रा, ईशा सिंह, श्रुतिका अर्जुन आणि रजत दलाल हे टॉप-९ सदस्य आहेत. यापैकी कोण ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा विजेता होईल? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Story img Loader