Bigg Boss 18: ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा १४वा आठवडा सुरू झाला आहे. वाइल्ड कार्ड म्हणून सहभागी झालेली कशिश कपूर नुकतीच एविक्ट झाली आहे. त्यामुळे आता ‘बिग बॉस’च्या घरात एकही वाइल्ड कार्ड सदस्य राहिलेला नाही. आता टॉप-९मधून कोण-कोणते सदस्य अंतिम फेरीपर्यंत जातात? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अशातच घराबाहेर येताच कशिश कपूरने शिल्पा शिरोडकरवर टीका केली आहे.
‘जिओ सिनेमा’ने कशिश कपूरचा सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये कशिश कपूर म्हणाली, “माझ्या ऐवजी कोणी बाहेर जायला पाहिजे होतं तर ती ईशा सिंह होती. कारण माझ्या मते अविनाश व्यतिरिक्त ईशाचं काहीही योगदान नाही.” त्यानंतर दिग्विजयशी पुन्हा मैत्री होईल का? असं विचारल्यावर कशिश म्हणाली की, माझी दिग्विजयशी मैत्री होऊ शकत नाही. तुम्ही शो पाहिलाच असेल माझं मन साफ आहे. मला जिथे वाटलं माझ्याकडून चूक झाली, मी ती सुधारली. मी स्पष्टपणे सांगितलं, तुला माझ्याशी मैत्री करायची असेल तर कर, नसेल करायची तरीही सांग.
पुढे ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा विजेता कोण व्हायला पाहिजे? असं विचारल्यावर कशिश म्हणाली, “हे पर्व रजत दलालने जिंकलं पाहिजे. तो खूप क्यूट आहे. कारण बाहेर त्याची दहशत आहे आणि तो खरा आहे.” नंतर कशिशने शिल्पा शिरोडकरवर टीका केली.
शिल्पा शिरोडकरबद्दल कशिश म्हणाली, “मी शिल्पाबाबतीत आधीही बोलली आहे आणि आताही बोलेने. मला हीच तोंडपण बघायचं नाही. सात दिवसांमध्ये पाच दिवसांत जो मी सीन केला. मुळात तो मी केलाच नाही. पण पाच दिवसांत मी केलं आणि ५५ दिवसांत काहीच नाही केलं. मी फुटेजची भूकेली, तर असं नाही. तू तीन महिन्यांपासून एक गोष्ट ताणत आहेस. एका आईची दोन मुलं. हे खूप बोरिंग आहे.” तसंच कशिश ईशा, अविनाश, करण आणि चाहतबद्दलही बोलली.
दरम्यान, विवियन डिसेना, करणवीर मेहरा, शिल्पा शिरोडकर, चाहत पांडे, चुम दरांग, अविनाश मिश्रा, ईशा सिंह, श्रुतिका अर्जुन आणि रजत दलाल हे टॉप-९ सदस्य आहेत. यापैकी कोण ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा विजेता होईल? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
© IE Online Media Services (P) Ltd