Bigg Boss 18: ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा सध्या सहावा आठवडा सुरू आहे. या सहाव्या आठवड्याचा ‘टाइम गॉड’ रजत दलाल झाला आहे. नुकताच ‘टाइम गॉड’चा टास्क रजत, चाहत पांडे आणि शिल्पा शिरोडकरमध्ये पार पडला. यामध्ये रजत बाजी मारून ‘टाइम गॉड’ झाला. अशातच ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वात जगप्रसिद्ध कार्दशियन बहिणी सहभागी होणार असल्याची चर्चा जोरदार रंगली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

निर्माते ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वात सातत्याने प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी ट्विस्ट आणतं आहेत. सलमान खानसह ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वात सेलिब्रिटी गेस्ट होस्ट पाहायला मिळत आहेत. तसंच वीकेंड वार तीन दिवसाचा करण्यात आला आहे. शुक्रवार, शनिवार आणि रविवार वीकेंड वार होतं आहे. रविवारी सलमानच्या जागी रवि किशन घरातील सदस्यांनी शाळा घेताना दिसत आहे. एवढंच सगळं करूनही ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाला पाहिजे तसा टीआरपी मिळत नाहीये. टीआरपीच्या यादीत टॉप-१०मध्ये ‘बिग बॉस १८’ला जागा नाहीये. त्यामुळेच आता निर्मात्यांनी शोमध्ये आणखीन तडका टाकण्याचा निर्णय घेतल्याचं समोर आलं आहे.

हेही वाचा – Video: ‘आता होऊ दे धिंगाणा ३’च्या मंचावर अक्षयने रमाला केलं प्रपोज, पण रमाने दिलं जबरदस्त उत्तर; म्हणाली…

‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, अनंत अंबानी आणि राधिका अंबानीच्या लग्नात आलेल्या जगप्रसिद्ध कार्दशियन बहिणी किम कार्दशियन आणि काइली जेनर यांना ‘बिग बॉस १८’साठी विचारणा झाली आहे. तसंच या दोघींसह तिसरी बहीण केंडल जेनर ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वात सहभागी होणार असल्याचं म्हटलं जात आहे. शोमध्ये ग्लॅमरचा तडका टाकण्यासाठी निर्मात्यांनी हे पाऊल उचललं आहे. गेल्या काही दिवसांपासून निर्माते कार्दशियन बहिणीशी संवाद साधत आहेत. पण कार्दशियन बहिणी शोमध्ये सहभागी होणार की नाही किंवा फक्त दोघी बहिणी सहभागी होणार हे अद्याप निश्चित झालेलं नाही.

हेही वाचा – भगरे गुरुजींचा मुलगा लवकरच अडकणार लग्नबंधनात; लेकीने लग्नघराचा व्हिडीओ केला शेअर

Kardashian Sister

‘बिग बॉस’च्या सुत्रांनी सांगितलं की, ‘बिग बॉस’ शो ड्रामासाठी ओळखला जातो. या पर्वात आम्हाला काहीतरी ग्लॅमरस करायचं आहे. कार्दशियन बहिणींना भारतीय प्रेक्षकांसमोर आणण्यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत. यामुळे शोमध्ये नवा ट्विस्ट येईल.

हेही वाचा – ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम अभिनेत्री लवकरच अडकणार लग्नबंधनात; ‘या’ दिवशी वाजणार सनई-चौघडे

दरम्यान, किम कार्दशियन आणि काइली अनंत अंबानीच्या लग्नासाठी जुलै महिन्यात मुंबईत आल्या होत्या. यावेळी दोघींचं पारंपरिक पद्धतीने भव्य असं स्वागत करण्यात आलं होतं. तेव्हापासून कार्दशियन बहिणी खूप चर्चेत आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss 18 kim kardashian kylie jenner and kendall jenner have been approached for salman khan show pps