Bigg Boss 18 : हिंदी ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा ग्रँड प्रिमियर रविवारी ( ६ ऑक्टोबरला ) पार पडला. यंदा एकूण १८ सदस्य ‘बिग बॉस’च्या घरात गेले असून त्यांच्याबरोबर एक गाढवदेखील आहे. हे गाढव १९वा सदस्य असल्याचं सलमान खानने सांगितलं. पण हे गाढव ‘बिग बॉस १८’मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झालेले अॅड. गुणरत्न सदावर्तेंचं असल्याचं समोर आलं आहे. गुणरत्न सदावर्ते यांच्या या पाळीव गाढवाचं नाव ‘मॅक्स’ आहे. मात्र हे गाढव गुणरत्न सदावर्तेंचं नेमकं आहे का? हे आजच्या भागात स्पष्ट होईल. पण गुणरत्न सदावर्तेंनी ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री केल्यानंतर काय घडलं? ते काय म्हणाले? हे वाचा…
सलमानने गुणरत्न सदावर्तेंची ‘अशी’ करून दिली ओळख
अभिनेत्री ईशा सिंहनंतर गुणरत्न सदावर्तेंची ‘बिग बॉस १८’मध्ये जबरदस्त एन्ट्री झाली. यावेळी सलमानने ईशाला सदावर्तेंची अशी ओळख करून दिली की, हे गुणरत्न सदावर्ते आहेत. बोल्ड आणि डॅशिंग पर्सनालिटीमुळे संपूर्ण महाराष्ट्र यांना ओळखतो. त्यानंतर गुणरत्न यांनी स्वतः ईशाला ओळख करून दिली. यावेळी ते म्हणाले, “मी असा वकील आहे, ज्याचं कौतुक सलमान खानने केलं आहे. मी हे म्हणेन की, ना पेशी होगी ना गवाही होगी. अब तुम हमारे क्लाइंट बनगो तो जो भी हुज्जत होगी ओ खतम होगी.” गुणरत्न सदावर्तेंची ही डायलॉगबाजी ऐकून सलमान खानला हसू अनावर झालं. तो जोरजोरात हसू लागला. त्यानंतर सलमानने पुन्हा एकदा गुणरत्न यांना तो डायलॉग बोलायला सांगितला. यावेळी गुणरत्न म्हणाले, “सलमान, रिअॅलिटी शोमध्ये रिटेक होत नाही.” तेव्हा भाईजान म्हणाला, “तुम्ही घरात जाल तेव्हा खूप मजा येणार आहे. तुमचं ह्यूमर खूप चांगलं आहे”
पुढे सदावर्ते म्हणाले की, मी अयोध्येत काम केलं आहे. मी मुंबईत कायदेशीर राज्य केलं आहे. मी गुंड्याच्या खानदानातून आलो आहे. आमचा आवाज पोहोचण्याआधी नाव पोहोचलं जातं. डंके की चोट पर मी बोलतो, मी गुणरत्न सदावर्ते आहे. राजे, राजवाडेपेक्षाही उच्चस्थानी वर्ते असतात. हे ऐकून तर सलमान जोरजोरात हसला आणि पुन्हा म्हणाला की, घरात गेल्यानंतर खूप मजा येणार आहे. त्यानंतर सलमान ईशाला सदावर्तेंसंदर्भात प्रश्न विचारायला सांगितले.
ईशा गुणरत्न यांना विचारते की, तुमच्याबद्दल थोडं काही सांगू शकता का? तेव्हा ते म्हणतात, “लहानपणी आईने डॉक्टर बनण्यासाठी सांगितलं. म्हणून मी दातांचा डॉक्टर झालो. त्याला डेंटल सर्जर म्हटलं जातं. त्यानंतर वडील म्हणाले की, तू वकील हो. तर मी वकील झालो. आता या शोमुळे सलमानबरोबर मी अभिनेता झालो. हा माझा थोडक्यात इथंपर्यंत पोहोचण्याचा प्रवास आहे. पुढे ईशाने विचारलं, “या पर्वात टाइम तांडव थीम आहे. तर तुमची स्ट्रॅटर्जी काय आहे?” यावर गुणरत्न सदावर्ते म्हणाले, “हा डोक्याचा खेळ आहे. सध्या एआयचा काळ आहे. पण हे तंत्रज्ञान माणसांना जसं पुढे नेत जाईल, तशी समस्या निर्माण करेल. त्यामुळे हे सांगण्याचा माझा प्रयत्न आहे.”
सलमानच्या ‘या’ गाण्यामुळे गुणरत्न यांना झाला होता त्रास
त्यानंतर सलमान खान ईशाला म्हणाला, “सदावर्तेंकडे असलेल्या ज्ञानाचा वापर करून घे.” तेव्हा सदावर्ते म्हणाले, “ये पब्लिक हैं सब जानती हैं” पुढे त्यांनी सलमानला एक किस्सा सांगितला. ते म्हणाले, “सलमान जे ‘कबुतर जा जा’ गाणं होतं ना ते खूप त्रास देत होतं. जेव्हा मी मेडिकलचा विद्यार्थी होतो. रॅगिंगच्या वेळी सनिअर्स त्या गाण्यावर नाचायला लावलाचे. पण सलमानपर्यंत पोहोचण्यासाठी खूप प्रदीर्घ काळ लागला. चलो फिर मिलेंगे” मग गुणरत्न सदावर्ते ‘बिग बॉस’च्या घरात गेले आणि सर्वांना भेटले. त्यानंतर काही वेळासाठी एकटे फिरताना दिसले. मग रजत दलालने गुणरत्न यांची भेट घेतली आणि विचारलं, “तुम्ही नक्की डॉक्टर आहात की वकील?” यावर गुणरत्न सदावर्ते म्हणाले, “आईने डॉक्टर बनवलं आणि वडिलांनी वकील.”
‘बिग बॉस १८’मधील १८ सदस्य कोण आहेत?
गुणरत्न सदावर्तेंसह चाहत पांडे, शेहजादा धामी, अविनाश मिश्रा, शिल्पा शिरोडकर, तेंजिदर पाल सिंह, श्रुतिका अर्जुन, नायरा बनर्जी, चुम दरंग, करण मेहरा, रजत दलाल, मुस्कार बामने, अरफीन खान, सारा अरफीन खान, ईशा सिंह, हेमा शर्मा, विवियन डिसेना, एलिस कौशिक हे १८ सदस्य यंदाच्या पर्वात सहभागी झाले आहेत. यांच्यासोबतीला गाढव असणार आहे.