Bigg Boss 18: ६ ऑक्टोबर २०२४पासून सुरू झालेला ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा प्रवास आता शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचला आहे. ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाच्या महाअंतिम सोहळ्याला अवघे एक आठवडा बाकी राहिला आहे. १९ जानेवारीला ‘बिग बॉस’चा महाअंतिम सोहळा रंगणार असून या पर्वाचा विजेता घोषित होणार आहे. त्यामुळे सध्या टॉप-९पैकी कोण सदस्य विजयी होईल? यासंदर्भात तर्क-वितर्क लावला जात आहे.
‘बिग बॉस’च्या घरात सध्या विवियन डिसेना, करणवीर मेहरा, अविनाश मिश्रा, ईशा सिंह, श्रुतिका अर्जुन, शिल्पा शिरोडकर, चुम दरांग, चाहत पांडे आणि रजत दलाल हे सदस्य आहेत. या सदस्यांमधील कोणता सदस्य सर्वाधिक श्रीमंत आहे आणि टॉप-९ सदस्यांची एकूण संपत्ती किती आहे? जाणून घ्या…
‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वातील टॉप-९ सदस्यांपैकी सर्वाधिक श्रीमंत शिल्पा शिरोडकर आहे. ९०च्या दशकात आपल्या ग्लॅमरस, हॉट आणि बोल्डनेसने बॉलीवूड गाजवणारी शिल्पा शिरोडकर १०वी नापास असली तरी तिच्या मोठ्या बहिणीपेक्षाही ती अधिक श्रीमंत आहे. १९८९मध्ये रमेश सिप्पी यांच्या ‘भ्रष्टाचार’ चित्रपटातून शिल्पाने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. त्यानंतर तिने बरेच चित्रपट केले. पण काही काळानंतर तिने बॉलीवूडला रामराम केला. लग्न करून ती लंडनमध्ये स्थायिक झाली. अशा या लोकप्रिय शिल्पा शिरोडकरची एकूण संपत्ती २३७ कोटी आहे.
हेही वाचा – Video: ऐश्वर्या नारकर यांनी अश्विनी कासारबरोबर केला सुंदर डान्स, पाहा व्हिडीओ
शिल्पानंतर नंबर लागतो ईशा सिंहचा. ‘इश्क सुभान अल्लाह’, ‘एक था राजा एक थी राणी’, ‘सिर्फ तुम’ यांसारख्या लोकप्रिय मालिकेत झळकलेली ईशा सिंह २५ कोटींची मालकीण आहे. या यादीत तिसऱ्या नंबरवर आहे विवियन डिसेना. अनेक हिंदी मालिकेत काम करणाऱ्या विवियन डिसेनाची संपत्ती २० कोटी आहे. तर रजत दलाला १७ कोटींचा मालक आहे. करण मेहराकडे १२ ते १५ कोटींची संपत्ती आहे.
हेही वाचा – Bigg Boss 18: करणवीर मेहराने रिलेशनशिपवरून चाहत पांडेला डिवचलं, अभिनेत्रीने रागाच्या भरात केलं ‘हे’ कृत्य
तसंच अविनाश मिश्रा, श्रुतिका अर्जुनकडे ५ ते ७ कोटींची संपत्ती आहे. त्यानंतर शेवटी नंबर लागतो चुम दरांग आणि चाहत पांडेचा. चुम ३ कोटी, तर चाहत २ ते ३ कोटींची मालकीण आहे.