Bigg Boss 18 : ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वात एकूण १८ सदस्य सहभागी झाले आहेत. यापैकी आतापर्यंत एक सदस्य घराबाहेर झाला आहे. हे सदस्य म्हणजे वकील गुणरत्न सदावर्ते. आपल्या अनोख्या अंदाजाने, स्टाइलने प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे गुणरत्न सदावर्ते १५ ऑक्टोबरला ‘बिग बॉस’च्या घराबाहेर झाले. पण त्यांच्या अचानक जाण्याने प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. अशातच हिंदी ‘बिग बॉस’च्या १०व्या पर्वात कॉमनर म्हणून झळकलेल्या अभिनेत्याने गुणरत्न सदावर्ते यांच्यासाठी एक पोस्ट शेअर केली आहे; जी सध्या व्हायरल होतं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१५ ऑक्टोबरच्या भागात अचानक गुणरत्न सदावर्तेंना कन्फेशन रुममध्ये बोलवून काही वेळासाठी घराबाहेर जाण्यास सांगितलं. कारण न्यायालयात सदावर्तेंसंबंधित काही खटले प्रलंबित आहेत. त्यामुळे त्यांना घराबाहेर काढणं आवश्यक होतं. माहितीनुसार, मराठा आरक्षणासंदर्भातील प्रकरणावरील सुनावणीमुळे गुणरत्न सदावर्तेंना ‘बिग बॉस’मधून बाहेर काढण्यात आलं आहे. पण, प्रेक्षकांसह अनेक जणांना गुणरत्न सदावर्तेंची आठवण येत आहे.

हेही वाचा – दुसऱ्यांदा आई झाल्यानंतर खुशबू तावडेने पहिल्यांदाच चिमुकल्या लेकीसह शेअर केले फोटो, नाव केलं जाहीर

‘बिग बॉस’च्या १० पर्वात झळकलेल्या मनु पंजाबीने गुणरत्न सदावर्तेंसंदर्भात एक्सवर पोस्ट शेअर केली आहे. मनु पंजाबीने लिहिलं आहे, “गुणरत्नजी तुमची आठवण येत आहे. परत या. कारण तुम्ही डाकूच्या खानदानातून आहात.” मनु पंजाबीच्या या पोस्टवर काही नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहे. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “ते परत येतील आणि टॉप-५मध्ये जातील, अशी मला आशा आहे.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “गुणरत्नजींची आठवण येत आहे.”

हेही वाचा – Bigg Boss 18 : अविनाश मिश्रा घराबाहेर नाही तर गेला जेलमध्ये? दिला मोठा अधिकार

हेही वाचा – Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंच्या पत्नींना हिंदी ‘बिग बॉस’साठी झाली होती विचारणा, नकार देण्याचं कारण देत म्हणाल्या…

गुणरत्न सदावर्तेंनंतर अविनाश मिश्राचं झालं एलिमिनेशन!

दरम्यान, गुणरत्न सदावर्ते घराबाहेर गेल्यानंतर अविनाश मिश्राचं एलिमिनेशन झाल्याचा प्रोमो समोर आला आहे. पण दुसऱ्या बाजूला अविनाश घराबाहेर झाला नसून त्याला ‘बिग बॉस’ने जेलमध्ये ठेवल्याचं म्हटलं जात आहे. तसंच अविनाशला रेशन देण्याचा महत्त्वाचा अधिकार दिला आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss 18 manu punjabis post went viral after gunaratna sadavarte left the salman khan show pps