Bigg Boss 18: ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा पाचवा आठवडा सुरू आहे. चौथ्या आठवड्यात विवियन डिसेना ‘टाइम गॉड’ म्हणजेच कॅप्टन झाला आहे. त्यामुळे सध्या त्याच्या हातात घरातील अधिकार आहेत. पण यावेळी विवियन डिसेना स्वतःच्या ग्रुपला फेव्हर करत असल्याचं दिसत आहे. घरातील कामं वाटपात देखील स्वतःच्या ग्रुपमधील सदस्यांना कमी काम देत आहे. याशिवाय इतर सदस्यांना तुम्ही किती चुकीच आहात, हे दाखवण्यासाठी सतत वाद घालत आहे. नॉमिनेशन टास्कमध्येही विवियन पक्षपाती खेळताना दिसत आहे. स्वतः ग्रुपमधील सदस्यांना सुरक्षित करताना पाहायला मिळत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

४ नोव्हेंबरच्या भागात विवियन डिसेनाने घरातील चहा पावडर जप्त केली. कारण सारा अरफीन खान चहा बनवून घेत होती. ‘टाइम गॉड’ बनल्यापासून विवियनच्या एकंदरीत वागण्यावरून नेटकरी देखील टीका करत आहेत. अशातच रुपाली भोसले विवियनच्या वर्तणुकीवरून भडकली आहे.

हेही वाचा – Bigg Boss 18: रजत दलालने शायरीतून विवियन डिसेनाच्या ग्रुपला लगावला टोला; नेटकरी म्हणाले, “एक नंबर भाई…”

अभिनेत्री रुपाली भोसलेने इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने ‘बिग बॉस’च्या १३व्या पर्वाचा विजेता दिवंगत सिद्धार्थ शुक्लाचा उल्लेख केला आहे आणि विवियनवर टीका केली आहे. रुपालीच्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.

हेही वाचा – “आजही माहेरची ओढ कायम पण वेळ कमी…”, विशाखा सुभेदारने माहेरपणाबद्दल लिहिलेल्या पोस्टने वेधलं लक्ष, म्हणाली, “बहिणीच्या उवा…”

रुपाली भोसले म्हणाली, “अरे देवा विवियन डिसेनासारखी ही अहंकारी वृत्ती का आहे? आणि इतका अहंकार का आहे? सिद्धार्थ शुक्ला हा मोठा अभिनेता होता आणि आहे. त्याचा ‘बिग बॉस’चा ज्याप्रकारे प्रवास होता, तो भारी होता. पण, विवियनचं काय?”

रुपाली भोसलेची इन्स्टाग्राम स्टोरी

हेही वाचा – Video: “गरबा संपला ताई…”, इरिनाचा ‘नगाडा संग ढोल’वरील डान्स पाहून नेटकऱ्याची प्रतिक्रिया, उत्तर देत म्हणाली, “हो मला…”

दरम्यान, अभिनेत्री रुपाली भोसलेला ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाची ऑफर आली होती, असं वृत्त हे पर्व सुरू होण्याआधी समोर आलं होतं. काही दिवसांपूर्वी दिवाळीच्या मुहूर्तावर रुपालीने आलिशान गाडी खरेदी केली. आपल्या कुटुंबियांबरोबर तिने नव्या गाडीचं स्वागत केलं. रुपालीच्या नव्या गाडीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss 18 marathi actress rupali bhosle fire on vivian dsena pps