Bigg Boss 18: ‘बिग बॉस १८’च्या घरात नुकतंच सलमान खानच्या वाढदिवसानिमित्ताने सेलिब्रेशन पाहायला मिळालं. सलमानचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ‘लाफ्टर शेफ’च्या नव्या पर्वातील कलाकारांनी खास हजेरी लावली होती. कृष्णा, राहूल वैद्य, रुबिना दिलैक यांनी ‘बिग बॉस १८’मधील सदस्यांबरोबर हटके खेळ खेळले. तसंच सदस्यांनी सलमानला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास परफॉर्मन्स केला. आता ‘बिग बॉस’च्या घरात नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत केलं जाणार आहे.

नवीन वर्षानिमित्ताने ‘बिग बॉस’च्या घरात काही खास पाहुणे उपस्थित राहणार आहेत. ‘बिग बॉस’च्या १७ पर्वाचा विजेता मुनव्वर फारुकी लवकरच पाहायला मिळणार आहे. यावेळी तो घरातील सदस्यांची खिल्ली उडवताना दिसणार आहे. याचा प्रोमो नुकताच समोर आला आहे.

Video of Nagpur Mr Calendar kaka
नागपूरच्या ‘कॅलेंडर’ काकांना तोंडपाठ आहे संपूर्ण कॅलेंडर; अचूक सांगतात माहिती, VIDEO एकदा पाहाच
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
yogita chavan troll for celebrating christmas
ख्रिसमस सेलिब्रेशनमुळे योगिता चव्हाण ट्रोल; पती सौरभ सडेतोड उत्तर देत म्हणाला, “मराठी भाषेचा, संस्कृतीचा प्रचार…”
kedar shinde post for suraj chavan
“सूरज चव्हाण या तुमच्यातल्या माणसाला…”, दिग्दर्शक केदार शिंदे यांची पोस्ट चर्चेत
Bigg Boss 18 Edin Rose Yamini Malhotra is evicted from salman khan show after digvijay rathee evicted
Bigg Boss 18: दिग्विजय सिंह राठीनंतर आणखी दोन सदस्य घराबाहेर; कशिश कपूर ढसाढसा रडत म्हणाली, “इथे प्रत्येकजण साप…”
Bigg Boss 18 Digvijay Singh Rathee says who will win the show
Bigg Boss 18: दिग्विजय सिंह राठीच्या मते करणवीर मेहरा नाही, तर ‘हा’ सदस्य होणार विजयी; म्हणाला…
appear in Celebrity MasterChef show coming soon
‘बिग बॉस मराठी ५’ फेम निक्की तांबोळी ‘या’ लोकप्रिय कार्यक्रमात झळकणार, सोबतीला असणार उषा नाडकर्णींसह प्रसिद्ध कलाकार
Salman Khan And Digvijay Rathee
Video : ‘बिग बॉस १८’मधून बाहेर पडताच दिग्विजय सिंह राठी झाला भावुक; खंत व्यक्त करीत म्हणाला, “लोक खूप लवकर…”

हेही वाचा – “२०२५मध्ये ट्रोलमुक्त महाराष्ट्र तरी व्हावा ही अपेक्षा”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दिग्दर्शक सचिन गोस्वामींची पोस्ट, म्हणाले, “आज राजकारणात नीतिमत्ता, सभ्यता…”

‘कलर्स टीव्ही’च्या इन्स्टाग्राम पेजवर मुनव्वर फारुकीचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये मुनव्वर रजत दलाल आणि करणवीर मेहराची खिल्ली उडवताना दिसत आहे. सुरुवातीला मुनव्वर रजतला म्हणतो की, रजत भाई, हे लोक तुला कितीही यु-टर्न, यु-टर्न म्हणू दे. हे लहान आहेत. यांनी अजून तुझी ड्रायव्हिंग कुठे पाहिलीये. त्यानंतर घरातले सदस्य जोरात हसताना. मग मुनव्वर चुमवरून करणवीर मेहराची खिल्ली उडवतो.

मुनव्वर म्हणतो, “करणभाई ईशान्य भारतात एक राज्य आहे.” तेव्हा कशिश, करण म्हणतो, “अरुणाचल प्रदेश.” यावर मुनव्वर म्हणतो, “नाही, सासर. आता भारतामधील राज्य त्याच नावाने ओळखले जातील. करणचं सासर-१, करणचं सासर -२. हे ऐकून सगळे हसू लागतात.

हेही वाचा – Video: ‘बिग बॉस मराठी’ फेम जान्हवी किल्लेकर लवकरच नव्या दमदार भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार, ‘स्टार प्रवाह’च्या मालिकेत झळकणार

हेही वाचा – Bigg Boss 18: चक्क अविनाशने चाहतला तर विवियनने श्रुतिकाला नॉमिनेशन टास्कमध्ये केलं सुरक्षित! जाणून घ्या नेमकं काय घडलं?

दरम्यान, ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा सध्या १३वा आठवडा सुरू आहे. या आठवड्यात अविनाश मिश्रा, ईशा सिंह, विवियन डिसेना, चाहत पांडे, कशिश कपूर, रजत दलाल आणि श्रुतिका अर्जुन घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले आहेत. ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाच्या महाअंतिम सोहळ्याला अवघे काही आठवडे बाकी आहेत. त्याआधी या सात सदस्यांमधून कोण घराबाहेर होतंय? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Story img Loader