Bigg Boss 18: ‘बिग बॉस’चं १८वं पर्व जोरदार सुरू आहे. नुकतंच ‘बिग बॉस’च्या घरात तीन वाइल्ड कार्ड सदस्यांची एन्ट्री झाली आहे. या तीनही वाइल्ड कार्ड सदस्यांनी आपल्या हॉट आणि बोल्डनेसने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अदिती मिस्त्री, एडिन राज, यामिनी मल्होत्रा या तिघीजणी वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वात सहभागी झाल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वात अशी एक सदस्य आहे, जिने ९०चं दशकात आपल्या बोल्ड आणि घायाळ अदांनी बॉलीवूड गाजवलं. पण काही काळानंतर तिची लोकप्रियता कमी झाली. मग तिने लग्न करून लंडन गाठलं आणि ती गृहिणी झाली. वैवाहिक जीवनात ती व्यग्र झाली. पण आता ‘बिग बॉस’चं १८वं पर्व गाजवतं आहे. अशी ही लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे शिल्पा शिरोडकर.

हेही वाचा – संजनाकडून काय घेऊन जाणार? अभिनेत्री रुपाली भोसले म्हणाली, “खऱ्या आयुष्यात…”

१९८९मध्ये रमेश सिप्पींच्या ‘भ्रष्टाचार’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या शिल्पा शिरोडकरचा आज वाढदिवस आहे. ती आता ५१ वर्षांची झाली आहे. यानिमित्ताने शिल्पाला मोठी बहीण नम्रता शिरोडकरने वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनेत्री नम्रता शिरोडकरने आपल्या लाडक्या बहिणीला शुभेच्छा देण्यासाठी जुन्या फोटोंचा खास व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने लिहिलं आहे, “जगातील सर्वोत्कृष्ट बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मी तुला ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वात दररोज पाहत आहे. तू जबरदस्त खेळत आहेत. तू घरी ट्रॉफी घेऊन येण्यासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत.”

हेही वाचा – “आम्ही आमचं कर्तव्य पार पाडलं, आता पुढील पाच वर्षे…”, मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, पोस्ट करत म्हणाले…

हेही वाचा – AR Rahman Divorce : २९ वर्षांचा संसार मोडला; ए. आर. रेहमान व सायरा बानू होणार विभक्त, जारी केलं निवेदन

दरम्यान, शिल्पा शिरोडकरची सख्खी बहिणी नम्रता शिरोडकर ही देखील अभिनेत्री आहे. १९९३ साली फेमिना मिस इंडियाचा खिताब तिने जिंकला होता. नम्रता ही दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूची पत्नी आहे. त्यामुळे शिल्पा महेश बाबूची मेव्हूणी आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss 18 namrata shirodkar birthday wish to sister shilpa shirodkar pps