Bigg Boss 18 : हिंदी ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. सलमान खानचा पहिला प्रोमो आल्यापासून सतत ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वात सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची नाव समोर येत आहेत. ६ ऑक्टोबरला यंदाच्या पर्वाचा ग्रँड फिनाले होणार आहे. अशातच ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वात सहभागी होण्यासाठी सर्वाधिक मानधन घेणाऱ्या स्पर्धकाच्या नावाची चर्चा सुरू आहे. एका अभिनेत्रीचं नाव समोर आलं असून या अभिनेत्रीसाठी दिवसाला पाच लाखांहून अधिक पैसे मोजले जाणार आहेत. ही स्पर्धक नेमकी कोण आहे? जाणून घ्या…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

टेलिव्हिजनवरील लोकप्रिय वादग्रस्त शो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘बिग बॉस’ विविध भाषांमध्ये आहे. सध्या मराठीसह, कन्नड ‘बिग बॉस’ सुरू आहे. ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व चांगलंच गाजत आहे. पण या पर्वाचा शेवट आणि हिंदी ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाची सुरुवात एकाच दिवशी होणार आहे. ६ ऑक्टोबरला ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा महाअंतिम सोहळा होणार असून हिंदी ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा ग्रँड प्रीमियर असणार आहे.

हेही वाचा – Video: “आपली नावं मोठी आहेत, त्यामुळे आपला वापर झालाय”, अभिजीतबरोबर गप्पा मारताना निक्की तांबोळीचं विधान; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

काही दिवसांपूर्वी ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वातील पहिल्या निश्चित स्पर्धकाच्या नावाचा खुलासा झाला. ‘खतरों के खिलाडी’च्या १४व्या पर्वात रोहित शेट्टीने या पहिल्या निश्चित स्पर्धकाच्या नावाची घोषणा केली. ही स्पर्धक म्हणजे अभिनेत्री निया शर्मा. ‘नागिन’, ‘सुहागन चुडैल’, ‘एक हजारों मे मेरी बहना है’ या मालिकांमध्ये झळकलेली निया आता ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वात पाहायला मिळणार आहे. यंदाच्या पर्वातील महागडी स्पर्धक ही दुसरी-तिसरी कोणी नसून निया शर्माचं आहे. याबाबत ‘बिग बॉस ताजा खबर’च्या इन्स्टाग्राम पेजवर पोस्ट शेअर करण्यात आली आहे.

‘बिग बॉस ताजा खबर’ने दिलेल्या माहितीनुसार, निया शर्माने ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वात सहभागी होण्यासाठी ५ ते ५.५ कोटी रुपयांची मागणी केली आहे. त्यामुळे निया ही यंदाच्या पर्वातील सर्वाधिक मानधन घेणारी स्पर्धक आहे. माहितीनुसार, नियाला प्रत्येक भागासाठी ५.४ लाख रुपये दिले जाणार आहेत. एवढंच नव्हे नियाबरोबर १४ आठवड्यांचा करार झाला आहे. तसंच ‘दैनिक भास्कर’ने दिलेल्या सूत्रांनुसार, ‘बिग बॉस’च्या निर्मात्यांनी नियाबरोबर फक्त १५ दिवसांचा करार केला आहे. पण अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती चॅनेलकडून देण्यात आलेली नाही.

हेही वाचा – ‘सारं काही तिच्यासाठी’ फेम खुशबू तावडे दुसऱ्यांदा झाली आई, गोंडस मुलीला दिला जन्म

‘या’ नावाची चर्चा

‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वात झळकणाऱ्या ११ स्पर्धकांच्या नावाची सध्या चर्चा सुरू आहे. निया शर्मासह शोएब इब्राहिम, धीरज धूपर, नायरा बनर्जी, शिल्पा शिरोडकर, मीरा देवस्थळे, सायली साळुंखे, शांति प्रिया, अविनाश मिश्रा, देव चंद्रिमा सिंघा रॉय, चाहत पांडे हे स्पर्धक यंदाच्या पर्वात सहभागी होणार असल्याचं म्हटलं जात आहे.

‘बिग बॉस १८’ची थीम

यंदाच्या ‘बिग बॉस’च्या पर्वात बरंच वेगळं काहीतरी पाहायला मिळणार आहे. भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ यावर आधारित ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाची थीम आहे. त्यामुळे नेमकं शोमध्ये काय असणार आहे? याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss 18 nia sharma is highest paid contestant for salman khan show pps