Bigg Boss 18 : बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाच्या ग्रँड प्रिमियरला अवघे काही तास बाकी आहेत. ‘बिग बॉस’च्या चाहत्यांमधील उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कारण ‘बिग बॉस १८’चे नवनवीन प्रोमो पाहून सध्या अनेक चर्चा रंगल्या आहेत. कोण-कोण कलाकार ‘बिग बॉस’च्या या खेळात सहभागी होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. पण अशातच एका अभिनेत्रीने मोठा झटका दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘बिग बॉस १८’चा पहिला प्रोमो आल्यापासून ही अभिनेत्री यंदाच्या पर्वात सहभागी होणार असल्याची चर्चा सुरू होती. एवढंच नाहीतर ‘खतरों के खिलाडी’च्या १४व्या पर्वाच्या ग्रँड फिनालेमध्ये रोहित शेट्टीने ही अभिनेत्री ‘बिग बॉस १८’मध्ये सहभागी होणार असल्याचं जाहीर केलं होतं. ‘बिग बॉस’च्या यंदाच्या पर्वातील ही पहिली निश्चित स्पर्धक असल्याचं रोहित शेट्टीने सांगितलं होतं. पण ऐनवेळेला, ग्रँड प्रिमियर काही तासांवर असताना या अभिनेत्रीने सलमान खानच्या बहुचर्चित शोला नकार दिल्याच समोर आलं आहे. याबाबत अभिनेत्रीने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली आहे.

हेही वाचा – रिया चक्रवर्ती, भारती सिंगसह ‘बिग बॉस ओटीटी’ विजेत्याला दिल्ली पोलिसांचा समन्स, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या…

‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वासाठी पहिली निश्चित झालेली स्पर्धक होती अभिनेत्री निया शर्मा. ‘नागिन’, ‘सुहागन चुडैल’, ‘एक हजारों मे मेरी बहना है’ या मालिकांमध्ये झळकलेली निया ‘बिग बॉस १८’मध्ये पाहायला मिळणार असल्यामुळे चाहत्यांमध्ये एक वेगळीच उत्सुकता होती. पण नियाने ५ ऑक्टोबरला मध्यरात्री चाहत्यांची माफी मागत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आणि ‘बिग बॉस’मध्ये सहभागी होणार नसल्याचं स्पष्ट केलं.

अभिनेत्री निया शर्माने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं की, मी चाहत्यांना नाराज केलं आहे. यासाठी मी माफी मागते. जबरदस्त पाठिंबा, प्रेम आणि विलक्षण प्रोत्साहन पाहून मी खरोखर भारावून गेले आहे. यामुळे मला एकदा घरामध्ये जाण्यास भाग पाडले आणि गेल्या १४ वर्षांत मी काय कमावलं याची जाणीव करून दिली. मी असं म्हणू शकत नाही की, याचा मी आनंद घेतला नाही. पण मला दोष देऊ नका. ती मी नव्हते. निया शर्माची ही पोस्ट सध्या तुफान व्हायरल झाली आहे. अनेक जण हा पब्लिसिटी स्टंट असल्याचं म्हणत आहेत.

Nia Sharma Post

हेही वाचा – Bigg Boss 18 : ‘बिग बॉस’च्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं, शोच्या पहिल्याच दिवशी टॉप-२ फायनलिस्टचा केला खुलासा, कोण आहेत? जाणून घ्या…

दरम्यान, काही दिवसांपूर्वी नियाने ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वात सहभागी होण्यासाठी ५ ते ५.५ कोटी रुपयांची मागणी केल्याचं समोर आलं होतं. नियाला प्रत्येक भागासाठी ५.४ लाख रुपये दिले जाणार म्हटलं जातं होतं. एवढं नव्हे तर तिच्याबरोबर १४ आठवड्यांचा करार झाल्याची चर्चा होती. पण नियाच्या पोस्टने या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. निया ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वात सहभागी होत नसल्यामुळे चाहते नाराजी व्यक्त करत आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss 18 nia sharma not going in salman khan show pps