Bigg Boss 18: ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वात नुकताच ‘टाइम गॉड’चा टास्क पार पडला. यावेळी अविनाश मिश्रा, विवियन डिसेना, करणवीर मेहरा, चाहत पांडे आणि दिग्विजय सिंह यांची ‘टाइम गॉड’ होण्याची संधी हुकली. यात रजत दलालने बाजी मारली आणि तो पुन्हा एकदा ‘टाइम गॉड’ झाला. पण, ‘टाइम गॉड’ टास्कच्या वेळी करण आणि श्रुतिका अर्जुनमध्ये वाद झाले. यावेळी करणने श्रुतिकाबद्दल आक्षेपार्ह विधान केलं. यावरून रजत दलालने शिल्पा शिरोडकरवर टीका केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘कलर्स टीव्ही’ने नुकताच ‘बिग बॉस १८’चा नवा प्रोमो शेअर केला आहे. ज्यामध्ये रजत दलाल आणि शिल्पा शिरोडकरची कडाक्याची भांडणं पाहायला मिळत आहे. प्रोमोच्या सुरुवातीला रजत शिल्पाला म्हणतो की, यांच्या माणसांनी केलं तर चालतं. सकाळी त्याने चोर म्हटलं, त्यावेळेस तू काही बोललीस? जर तुम्हाला वाटतं, तुमच्याशी कोणी उलट बोलायला नाही पाहिजे. याची तुम्ही मागणी करता. तेव्हा शिल्पा म्हणाली, “मी मागणी करत नाही. कारण तू माझ्याशी बोलण्यास पात्र नाहीस.”

हेही वाचा – ‘आवेशम’ फेम मल्याळम अभिनेता ‘या’ अभिनेत्रींसह बॉलीवूडमध्ये करणार पदार्पण, इम्तियाज अली असणार चित्रपटाचे दिग्दर्शक

पुढे रजत करणवीरला निशाणा साधत म्हणाला, “कोणीतरी वीकेंडच्या वार बोलत होतं की, कोणी मुलींबाबत बोललं तर मी उभा राहीन. एडिनच्या तोंडा समोर येऊन बोलत होता. श्रुतिकाला बोलत होता. तेव्हा तोंडातून एक शब्द निघाला नाही.” यावर शिल्पा म्हणाली की, मला माहित आहे, मला काय करायचं आहे. त्यामुळे तू माझ्याशी असं बोलू नकोस. कारण तुझ्यासारखा सर्वात मोठा हिपोक्रेट्स, खोटारडा माणूस मला आतापर्यंत या घरात भेटलेला नाही.”

त्यानंतर रजत म्हणाला, “तुला अशा मुलांबरोबर राहायची लाज वाटली पाहिजे शिल्पा. तू प्रत्येक गोष्टीमध्ये बोलते, पण अशा गोष्टींमध्ये तुझं तोंड उघडतं नाहीस. कारण, ते तुझ्या जवळचे आहेत. पण, मी बोलणार. माझं तोंड आहे. तुझ्यात ताकद असेल तर बंद करून दाखव. या घरातून जेव्हा बाहेर जाईल तेव्हा बंद होईल आणि यावेळी ताठ मानेने जाईन.” यावर शिल्पा म्हणाली की, दोन आठवड्यांपूर्वी तू विवियनबद्दल बोलत होतास. आता तुझं पूर्ण समीकरण बदललं आणि विवियन बेस्ट फ्रेंड झाला. सर्वात पलटणारा माणूस तू आहेस.

हेही वाचा – Bigg Boss 18: शोमध्ये येण्याआधी शिल्पाचं बहीण नम्रता शिरोडकरशी झालं होतं भांडण, भावुक होत अनुराग कश्यपला म्हणाली, “दोन आठवडे…”

हेही वाचा – नागा चैतन्य-सोभिता धुलीपाला ६५० कोटींच्या अन्नपूर्णा स्टुडिओमध्ये करणार लग्न, सुपरस्टार्स लावणार कुटुंबासह खास हजेरी, गेस्ट लिस्ट आली समोर

दरम्यान, या आठवड्यात घरातील सदस्यांनी सहा जणांना घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट केलं. यामध्ये करणवीर मेहरा, शिल्पा शिरोडकर, चुम दरांग, दिग्विजय राठी, कशिश कपूर आणि सारा अरफीन खान यांचा समावेश आहे. या सहा जणांमधून कोण घराबाहेर होणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss 18 rajat dalal and shilpa shirodkar fight watch promo pps