Bigg Boss 18: ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा आता आठवा आठवडा सुरू झाला आहे. नुकतीच ‘बिग बॉस’च्या घरातून एलिस कौशिक बाहेर पडली आहे. करणवीर मेहरा, विवियन डिसेना, दिग्विजय राठी, अविनाश मिश्रा, चाहत पांडे, कशिश कपूर आणि एलिस कौशिक हे सात सदस्य घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले होते. पण, रविवारी झालेल्या वीकेंड वारमध्ये सलमान खानने एलिस कौशिक एलिमिनेट झाल्याची घोषणा केली. यावेळी ईशा सिंह आणि अविनाश मिश्राला धक्का बसला. एलिस घराबाहेर जाताना दोघं खूप भावुक झाले होते. अशातच आता दुसऱ्याबाजूला रजत दलाल आणि दिग्विजय सिंह राठी यांच्या मैत्रीत फूट पडल्याचं समोर आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘कलर्स टीव्ही’च्या इन्स्टाग्राम पेजवर नुकताच ‘बिग बॉस १८’चा नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये रजत दलाल दिग्विजय विरोधात उभा राहिलेलं पाहायला मिळत आहे. दिग्विजय ‘टाइम गॉड’ झाल्यापासून विवियन डिसेनाच्या टीमने बंड पुकारल्याचं पाहायला मिळत आहे. विवियन, अविनाश, तजिंदर बग्गा यांनी दिग्विजय ‘टाइम गॉड’ असेपर्यंत कामं न करण्याचा बंड केला आहे. आता त्यांच्याबरोबरीने रजत दलालने देखील हाच पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळत आहे.

हेही वाचा – Video: आणखी एका नव्या मालिकेची घोषणा, दमदार प्रोमो होतोय व्हायरल; ‘ही’ अभिनेत्री झळकणार मुख्य भूमिकेत

नव्या प्रोमोमध्ये रजत दलाल दिग्विजयला काम करणार नसल्याचं सांगत आहे. त्यानंतर दोघांमध्ये कामावरून वाद होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता दोन चांगल्या मित्रांमध्ये फूट पडल्याचं दिसत आहे. हा प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी ईशा सिंहमुळे रजत आणि दिग्विजयमध्ये फूट म्हटल्याचं म्हटलं आहे.

हेही वाचा – ‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेता आणि शिवानी सोनार लवकरच अडकणार लग्नबंधनात, बॅचलर पार्टीचे फोटो आले समोर

हेही वाचा – व्याहीभोजन! ‘शिवा’चा आशू खऱ्या आयुष्यात लग्नबंधनात अडकणार; होणारी पत्नी काय काम करते? जाणून घ्या…

दरम्यान, आतापर्यंत ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वातून एलिस कौशिकसह सात सदस्य बाहेर गेले आहेत. एलिसच्या आधी गुणरत्न सदावर्ते, हेमा शर्मा, मुस्कान बामने, नायरा बॅनर्जी, शहजादा धामी, अरफीन खान हे सदस्य घराबाहेर झाले होते.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss 18 rajat dalal fight with best friend digvijay singh rathee watch video pps