Bigg Boss 18: ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा सध्या नववा आठवडा सुरू आहे. या आठवड्यातील नॉमिनेशन टास्क नुकताच पार पडला. यावेळी घरातील सदस्यांनी सहा जणांना घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट केलं. यामध्ये करणवीर मेहरा, शिल्पा शिरोडकर, चुम दरांग, दिग्विजय राठी, कशिश कपूर आणि सारा अरफीन खान यांचा समावेश आहे. या सहा जणांमधून कोण घराबाहेर होणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अशातच नवव्या आठवड्यातील ‘टाइम गॉड’ भेटला आहे.

३ डिसेंबरच्या भागात ‘टाइम गॉड’चा टास्क पार पडला. हा टास्क संपूर्णपणे नशीबावर अवलंबून होता. यामध्ये आठव्या आठवड्यातील ‘टाइम गॉड’ झालेल्या ईशा सिंहला एक अधिकार देण्यात आला होता. घरातील सदस्यांची नावं असलेलं स्पिन व्हील तिला फिरवायचं होतं. ज्या सदस्याच्या नावापुढे बाण येणार होता, त्या सदस्याला ‘टाइम गॉड’ होण्याची संधी मिळणार होती. त्यानंतर त्या सदस्याला डॉमिनोची भिंत बनवायची होती. यावेळी ईशाने पहिल्यांदा स्पिन व्हील फिरवल्यावर सर्वात आधी नाव अविनाश मिश्राचं आलं. त्याने डॉमिनोची भिंत बनवण्याचा खूप प्रयत्न केला. पण चुम दरांग, शिल्पा शिरोडकर, चाहत पांडे यांनी अविनाशची भिंत सतत पाडली. अविनाशनंतर स्पिन व्हिलवर नाव विवियन डिसेनाचं आलं. पण विवियनला देखील भिंत बनवण्यापासून रोखलं.

Image of Manmohan Singh's sister
Manmohan Singh Death : मनमोहन सिंग यांच्या बहिणीची व्यथा, आजारपणामुळे घेता येणार नाही भावाच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Video of Nagpur Mr Calendar kaka
नागपूरच्या ‘कॅलेंडर’ काकांना तोंडपाठ आहे संपूर्ण कॅलेंडर; अचूक सांगतात माहिती, VIDEO एकदा पाहाच
yogita chavan troll for celebrating christmas
ख्रिसमस सेलिब्रेशनमुळे योगिता चव्हाण ट्रोल; पती सौरभ सडेतोड उत्तर देत म्हणाला, “मराठी भाषेचा, संस्कृतीचा प्रचार…”
kedar shinde post for suraj chavan
“सूरज चव्हाण या तुमच्यातल्या माणसाला…”, दिग्दर्शक केदार शिंदे यांची पोस्ट चर्चेत
Manoj Jarange On Devendra Fadnavis
Manoj Jarange : “आता खरी मजा, हिशेब चुकता करण्याची…”, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, तर फडणवीसांनीही दिलं प्रत्युत्तर
industry minister uday samant
हिंजवडी आयटी पार्कची कोंडी : उद्योगमंत्री उदय सामंत ‘ॲक्शन मोड’वर; अधिकाऱ्यांना दिले आदेश
prevent tax evasion without any hesitation dcm ajit pawar s instructions to senior officials
हयगय न करता करचोरी, गळती रोखा; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश

हेही वाचा – नागा चैतन्य-सोभिता धुलीपाला ६५० कोटींच्या अन्नपूर्णा स्टुडिओमध्ये करणार लग्न, सुपरस्टार्स लावणार कुटुंबासह खास हजेरी, गेस्ट लिस्ट आली समोर

हेही वाचा – श्रद्धा कपूरने जुहूमध्ये भाड्याने घेतलं आलिशान अपार्टमेंट, महिन्याला एक-दोन नव्हे तर ‘इतकं’ लाख भाडं

मग करणवीर मेहरा, चाहत पांडे यांचं नाव आलं. पण दोघं देखील डॉमिनोची भिंत बनवू शकले नाहीत. अखेर ‘बिग बॉस’ने एक निर्णय घेतला. ईशा सिंहला आणखी दोनदा व्हिल फिरवण्याची संधी दिली. यावेळी ज्या दोन सदस्यांची नावं येतील त्या दोन सदस्यांमध्ये ‘टाइम गॉड’चा टास्क होईल असं जाहीर केलं. त्यानंतर रजत दलाल आणि दिग्विजय राठी या दोघांचं नाव आलं. दोघांच्या समर्थकांनी डॉमिनोची भिंत लावण्याचा खूप प्रयत्न केला. यावेळी विवियन दिग्विजयला घेऊन स्विमिंग पूलमध्ये पडला. तसंच बरेच वाद झाले. पण, करणवीर मेहराच्या एका चुकीमुळे दिग्विजय सिंह राठीची पुन्हा ‘टाइम गॉड’ होण्याची संधी हुकली.

हेही वाचा – स्वप्नील जोशी आता डॅशिंग अंदाजात झळकणार, म्हणाला, “माझ्या आजवरच्या भूमिकांपेक्षा…”

करणवीरने रागाने रजतचे रचलेले डॉमिनो फेकून दिले. याचाच फायदा ईशा सिंहने उचलला. तिने करणवीरने केलेली कृती नियमांचं उल्लंघन असल्याचं सांगत थेट रजत दलाल ‘टाइम गॉड’ झाल्याचं जाहीर केलं. रजत दुसऱ्यांदा ‘टाइम गॉड’ झाला आहे.

Story img Loader