Bigg Boss 18 : ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा आता दुसरा आठवडा सुरू आहे. नुकताच दुसऱ्या आठवड्यातील दुसरा नॉमिनेशन टास्क पार पडला आणि एक, दोन नव्हे तर १० सदस्य घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले. कोण-कोण सदस्य नॉमिनेट झाले? नेमका नॉमिनेशन टास्क काय होता? जाणून घ्या…
नॉमिनेशन टास्कसाठी एक ‘खतरा नगरी’ तयार करण्यात आली होती. या ‘खतरा नगरी’त तांडव एक्सप्रेस होती; या एक्सप्रेसमध्ये खाऊ घेऊन सदस्यांना पटकन चढायचे होते. जे दोन सदस्य शेवटी चढणार होते, ते थेट नॉमिनेट होणार होते. त्यानंतर हेच दोन नॉमिनेट झालेले सदस्य दुकानदार होऊन इतर सदस्यांपैकी कोणत्या दोन जणांना खाऊच पाकिट न देऊन एक्सप्रेसमध्ये चढण्यासाठी उशीरा करण्याची संधी होती. यावेळी नॉमिनेट न झालेल्या सदस्यांनी दुकानदार झालेल्या दोन जणांची मनधरणी करून त्यांच्याकडून खाऊच पाकिट मिळवायचं होतं.
हेही वाचा – Video: ‘बिग बॉस मराठी’ फेम जान्हवी किल्लेकरचा शाहरुख खान आणि काजोलच्या गाण्यावर सुंदर डान्स, पाहा व्हिडीओ
‘खतरा नगरी’मधील नॉमिनेशन टास्क सुरू होण्यापूर्वी ‘टाइम ऑफ गॉड’ म्हणजेच कॅप्टन अरफीन खानला दोन सदस्यांना घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट करायचं होतं. यावेळी अरफीनने तजिंदर पाल सिंह बग्गा आणि मुस्कान बामने या दोघांना नॉमिनेट केलं. त्यामुळे तजिंदर आणि मुस्कान दोघंजण पहिले दुकानदार झाले. त्यानंतर रजत दलाल आणि चाहत पांडे नॉमिनेट होऊन दुकानदार झाले. असे एकूण १० सदस्य घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले आहेत.
हेही वाचा – Bigg Boss 18 : ‘बिग बॉस १८’चा पहिला कॅप्टन झाला ‘हा’ सदस्य; असा पार पडला कॅप्टन्सीचा टास्क
Nomination Task Promo #BiggBoss18pic.twitter.com/AhnmS2Dq73
— #BiggBoss_Tak? (@BiggBoss_Tak) October 15, 2024
तजिंदर बग्गा, मुस्कान बामने, रजत दलाल, चाहत पांडे, श्रुतिका अर्जुन, हेमा शर्मा, शिल्पा शिरोडकर, करण वीर मेहरा, एलिस कौशिक आणि अविनाश मिश्रा या १० सदस्यांवर आता घराबाहेर जाण्यासाठी टांगती तलावर आहे. यापैकी कोणता सदस्य घराबाहेर होतोय? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
हेही वाचा – राहा कपूर बाबा रणबीरला ‘या’ टोपण नावाने मारते हाक, आलिया भट्टने केला खुलासा
दरम्यान, याआधी ‘बिग बॉस १८’मधून १९वा सदस्य गाढवाला बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर गुणरत्न सदावर्ते हे घराबाहेर झाले. त्यांना कन्फेशन रुममध्ये बोलवून काही वेळासाठी घराबाहेर जाण्यास सांगितलं. कारण मुंबई उच्च न्यायालयात सदावर्ते यांचा मराठा आरक्षणासंदर्भात खटला प्रलंबित आहे.