Bigg Boss 18: ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा सध्या १४व्या आठवडा सुरू आहे. महाअंतिम सोहळ्याला अवघे काही दिवस बाकी आहेत. त्यामुळे उर्वरित सदस्यांमध्ये चुरस पाहायला मिळत आहे. नुकताच नॉमिनेशन टास्क पार पडला. या टास्कमध्ये नियम उल्लंघन झाल्यामुळे तीन सदस्य नॉमिनेट झाले. नॉमिनेशन टास्कमध्ये नेमकं काय घडलं? जाणून घ्या…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

७ जानेवारीच्या भागात नॉमिनेशन टास्क पाहायला मिळाला. ज्यामध्ये तीन टीम करण्यात आल्या होत्या. एका टीममध्ये करणवीर मेहरा, शिल्पा शिरोडकर, चुम दरांग, दुसऱ्या टीममध्ये विवियन डिसेना, ईशा सिंह, अविनाश मिश्रा आणि तिसऱ्या टीममध्ये रजत दलाल, श्रुतिका अर्जुन, चाहत पांडे अशा टीम ‘बिग बॉस’ने केल्या होत्या. या प्रत्येक टीमला १३ मिनिट ‘टाइम बुथ’मध्ये बसायचं होतं. मागे दोन आणि पुढे एक खुर्ची देण्यात आली होती. मागच्या दोन खुर्चीवर बसलेल्या सदस्यांना कानावर हेडफोन लावून बसायचं होतं. तर पुढे असलेल्या सदस्याला वेळ मोजायची होती. यावेळी पुढे बसलेल्या सदस्याला इतर टीममधील सदस्यांनी सतत बोलून त्यांना अडथळा निर्माण करायचा होता. जी टीम बरोबर १३ मिनिट ‘टाइम बुथ’मध्ये बसणार होती, ती टीम नॉमिनेशनपासून सुरक्षित होणार आहे. जी टीम १३ मिनिटांपेक्षा अधिक वेळ बसेल ती टीम थेट नॉमिनेट होणार होती.

हेही वाचा – तेजश्री प्रधानची ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतून एक्झिट! आता मुक्ताच्या भूमिकेत झळकणार ‘ही’ अभिनेत्री

सर्वात आधी विवियन, ईशा आणि अविनाशची टीम ‘टाइम बुथ’मध्ये गेली. यावेळी करण, शिल्पा, रजत यांनी अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. पण विवियन, ईशा आणि अविनाशने व्यवस्थितरित्या टास्क पूर्ण केला. त्यानंतर रजत, श्रुतिका आणि चाहत ही टीम ‘टाइम बुथ’मध्ये बसण्यासाठी गेली. यादरम्यान रजतने नियमाचं उल्लंघन गेलं. मागे बसलेल्या सदस्यांना वेळ मोजायची नव्हती. तरीही रजतने वेळ मोजून पुढे बसलेल्या चाहत पांडेला १३ मिनिट होताच खोकून हिंट दिली. त्यामुळे ‘बिग बॉस’ने नियमाचं उल्लंघन केल्यामुळे रजतच्या टीमला थेट नॉमिनेट केलं. म्हणजेच १४व्या आठवड्यात रजतसह श्रुतिका अर्जुन, चाहत पांडे नॉमिनेट झाले आहेत. त्यामुळे आता या तिघांपैकी कोणता सदस्य अंतिम आठवड्यात पोहोचणार नाही, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

हेही वाचा – Bigg Boss 18: ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वातील टॉप-९ सदस्यांमध्ये कोण आहे सर्वाधिक श्रीमंत? जाणून घ्या संपत्ती

दरम्यान, लवकरच ‘तिकीट टू फिनाले’ टास्क होणार आहे. विवियन डिसेना, करणवीर मेहरा, चुम दरांग, शिल्पा शिरोडकर, अविनाश मिश्रा आणि ईशा सिंह यांच्यामध्ये ‘तिकीट टू फिनाले’ टास्क होणार आहे. त्यामुळे या सहा जणांपैकी कोण ‘तिकीट टू फिनाले’ जिंकणार हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss 18 rajat dalal shrutika arjun and chahat pandey is nominated pps