Bigg Boss 18 Winner Karan Veer Mehra : ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा महाअंतिम सोहळा १९ जानेवारीला पार पडला. ६ ऑक्टोबर २०२४ पासून सुरू झालेलं ‘बिग बॉस’चं १८वं पर्व चांगलंच गाजलं. वाइल्ड कार्ड सदस्यांसह एकूण २३ सदस्य या पर्वात सहभागी झाले होते. यामधील करणवीर मेहराने ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. पण, सलमान खानने करणवीरचं नाव विजेता म्हणून घोषित करताच चुम दरांग, शिल्पा शिरोडकर व्यतिरिक्त इतर सदस्यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. याचा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाच्या महाअंतिम सोहळ्याला वकील गुणरत्न सदावर्ते आणि दिग्विजय सिंह राठी हे दोघं अनुपस्थित होते. बाकीचे सर्व सदस्य उपस्थित राहिले होते. या उपस्थित असलेल्या काही सदस्यांना रजत दलाल, तर काहींना विवियन डिसेना विजेता व्हावा असं वाटतं होतं. पण, रजत तिसऱ्या स्थानावरून बाद झाला. त्यानंतर विवियन आणि करण यांच्यातला कोण विजेता होणार? याची धाकधूक सुरू होती. उपस्थित असलेल्या काही सदस्यांना विवियन डिसेनाला ‘बिग बॉस १८’ची ट्रॉफी मिळावी अशी इच्छा होती. मात्र तसं काही घडलं आहे. प्रेक्षकांच्या भरघोस मतांनी करणवीर मेहरा ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा विजेता ठरला.

हेही वाचा – ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अभिनेता व्यवसाय क्षेत्रात करणार पदार्पण, व्हिडीओ शेअर करत म्हणाला…

सलमान खानने करणवीर मेहराचं नाव विजेता म्हणून घोषित करताच चुम दरांग आणि शिल्पा शिरोडकरला खूप आनंद झाला. दोघी एकमेकींना मिठी मारून उड्या मारून लागल्या. पण, इतर सदस्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. त्यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडलेला पाहायला मिळाला. याचा व्हिडीओ ‘मिस सिने टॉक’ या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ खूप चर्चेत आला आहे.

हेही वाचा – ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेला रामराम केल्यानंतर तेजश्री प्रधान ‘या’ आश्रमात घालवतेय दिवस, वासराबरोबरचा फोटो शेअर करत म्हणाली…

हेही वाचा – Video: ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील इंद्राचा लेकीबरोबर आशा भोसलेंच्या ‘या’ लोकप्रिय गाण्यावर भन्नाट डान्स, पाहा व्हिडीओ

‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा विजेता करणवीर मेहराच्या कामाबद्दल बोलायचं तर, त्याने २००४मध्ये ‘रिमिक्स’च्या माध्यमातून टेलिव्हिजनच्या विश्वात पाऊल ठेवलं. त्यानंतर करणने ‘बीवी औ में’, ‘रागिणी एमएमएस २’, ‘मेरे डॅड की मारुती’ आणि ‘इट्स नॉट दॅट सिंपल’ यामध्ये पाहायला मिळाला. माहितीनुसार, करणवीर मेहराकडे जवळपास १२ कोटींची संपत्ती आहे. तसंच दिल्लीत त्याचं एक आलिशान घर झालं.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss 18 salman khan announced karan veer mehra as a winner chum darang and shilpa shirodkar became happy pps